कराड- घरगुती सिलेंडरची दरवाढविरोधात कराडमध्ये बी सी ,ओ बी सी सेलच्यावतीने निदर्शने करण्यात आली ,मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात पत्रकामध्ये मस्ती आल्यामुळे , निर्ढावलेल्या अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे केंद्र शासनाने घरगुती सिलेंडरची दरवाढ केली,सामान्य माणूस भरडून जात आहे म्हणून राज्यशासनाने १२ सिलेंडर देण्याची मागणी मंत्री अनिल देशमुख यांनी केली व अर्थंमन्त्री जयंतराव पाटील यांनी सहमती दर्शविली, मात्र निर्ढावलेल्या मुख्यंमत्र्यानी सहानुभूती दाखवली नाही असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भानुदास माळी यांनी केला आहे सांगा पाहू ,अशा राजकारणी लोकांना जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावयाची आहे का ?फुकटची प्रसिद्धी हवी ?आपली उंची,आपले पद,म्हणजे जनतेच्या हक्कासाठी मिळालेली जहागिरी आहे?किहीही बोलले,कोणाबद्दलही अपशब्द वापरला तर आपणाला कोणी विचारणार नाही ?अशा खुळचट कल्पनेत वावरणारे ,खुशाल चेंडूं ,राजकीय लोकांना त्यांची जागा ,लायकी जनतेने दाखवायला पाहिजे .माळी नामक लोक सुंदर बागेची,सुगंधी फुलांची काळजी घेतात ,पण हे माळी...