सोशल मिडीयावर एकच नारा. . . . मतदान मी केले ! तुम्ही ही करा !
आज २३ एप्रिल २०१९ रोजी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये प्रत्येक मतदार मतदान करून आल्यानंतर बोटावर शाई दाखवून मी मतदान केले, आपण ही मदान करा ! असे आवाहन करीत आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा "राजा" असतो आणि तो राजा आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणे आवश्यक आहे. गतकाळात सातारा लोकसभा मतदार संघांमध्ये खासदार म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, याचे अवलोकन मतदारांनी यापूर्वीच केलेले आहे. तेव्हा प्रत्येक मतदाराने त्याचा सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्तरावर व निवडणूक आयोगाने मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी जनजागृती केलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला गेलेला आहे.सध्या होऊ घातलेली लोकसभेची निवडणुक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक...