सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९-२० सालामधील ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, विद्यमान खासदार मा.श्री श्रीनिवासजी पाटीलसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार रामराजे नाईक निंबाळकरसाहेब, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.आमदार श्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री मा.प्रा.डॉ.एन.डी.पाटीलसाहेब यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०१९ रोजी दुपारी २.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला आहे.अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती उद्योगाला अधिक विकसित करणारे तंत्रज्ञान व संशोधन यासाठी कृष...