कराडची आण-बाण-शान राहीली पाहिजे
जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये "किंतू" नको....येणारा अधिकारी वादात नको येणाऱ्या काळात नगरपालिकेची सत्ता हवी म्हणून बदलीचा आटापिटा कराड (लक्ष्मीपुत्र) - नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी भुसावळ येथे असणारे रमाकांत डाके यांना नेमणूक देण्यात आले आहे. यशवंत डांगे यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र यशवंत डांगे यांची कामकाज पद्धती व कार्यक्षमपणा लोकप्रतिनिधींना पसंत पडला नाही. इतकेच काय मंत्रालय स्तरावर "प्रतिष्ठापणाला लावून अखेर यशवंत डांगे यांच्या मुदत वाढीचा आदेश रद्द करून नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून रमाकांत डाके यांच्याकडे पदभार द्यावा. यासाठी ठरावीक महाशयांनी प्रतिष्ठापणाला लावून फारच आटापिटा केला आहे. येणाऱ्या काळात या "प्रतिष्ठित" गटाला कराड नगरपालिकेची सत्ता हवी बर का ? याचसाठी केला बदलीचा अट्टाहास. शासकीय अधिकारी आहे. म्हटल्यावर बदली होणारच. यात वेगळेपण असे काहीच न...