पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
सातारा जिल्हयाच्या निधीला भाजपा सरकारची कात्री मनोहर शिंदेमुळे पृथ्वीराजबाबा बदनाम (गोरख तावरे) सातारा जिल्हयातील विकास निधीबाबत भाजप सरकार व्देष भावनेतून विकास कामात अडथळा आणून जनतेची गैरसोय करीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेला 24 कोटी विकास निधी व काम थांबविली आहेत.सत्तेची फळे चाखणारा सातारा जिल्हा सध्या सत्तेच्या बाहेर आहे.लोकप्रतिनिधीना विकासकामे करण्यासाठी कॅबिनेट, राज्यमंत्र्यांकडून निधी आणावा लागतो.मात्र, काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करावा लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. भाजप, शिवसेनेला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात खिंडार पाडता न आल्याने येथे राष्ट्रवादीने वर्चस्व राखले, तर कॉंग्रेसला फारशे यश आले नाही. केवळ शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केरून शिवसेनेला जागा मिळवून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्...

विकास कामांसाठी आमदारांचा "कस" लागणार

इमेज
विकास कामांसाठी आमदारांचा "कस" लागणार (गोरख तावरे) विधानसभा निवडणूकीचे रणसंग्राम शांत झाल्यानंतर आता विकास कामांचा मागोवा घेवून सातारा जिल्हयातील नवनिर्वाचित आमदारांना काम करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनांचा धुमधडाका करून सातारा जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,पालकमंत्री शशिकांत शिंदे व आमदारांनी मंजूर केलेल्या कामांचे काय होणार हाही प्रश्न ऐरणीवर आहे. आघाडी शासनाचा पराभव झाला व भाजपप्रणीत सरकार सत्तास्थानी आहे. दरम्यान कराड दक्षिण उत्तर मतदार संघातील आमदारांच्या विकास कामाचा दृष्टीकोण,कामाची पध्दत,टेंडरपध्दतीत हस्तक्षेप नसने यामुळे कराड तालुक्याचा विकासाला फारशी अडचण येणार नाही.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे तर बाळासाहेब पाटील हे उत्तरचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.पृथ्वीराजबाबांनी गेल्या चार वर्षात सोळाशे कोटीचा निधी कराड दक्षिणला दिला आहे.तर गेल्या पंधरा वर्षात आमदार बाळासाहेब पाटील यांनीही कोट्यावधीचा निधी देवून अनेक विकिस काम केली आहेत.इतर तालुक्यातील निधीबाबत काय होणार?भाजप व शिवसेनेच्या विरोधात नेहमी राजकीय बोंब...

उत्कृष्ठ संसदपटू शंभूराज देसाई पुन्हा आमदार...!

इमेज
उत्कृष्ठ संसदपटू शंभूराज देसाई पुन्हा आमदार...! (गोरख तावरे) कराडला लागून पाटण तालुका आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी विजयश्री मिळवला आहे.देसाई विरोधी पाटणकर हे या तालुक्यातील पारंपारीक विरोधक आहेत.विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव करून यापुर्वी शंभूराज देसाई  आमदार झाले होते.गतवेळी केवळ पाचशे मतानी पराभव झाल्यानंतर शंमूराज देसाई हे नाराज व नाउमेद न होता दुस-यादिवसापासून कामाला लागले होते याचमुळे किमान 18हजाराचे मताधिक्य मिळवून शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजीत उर्फ बच्चू पाटणकर यांना धुळ चारत दणदणीत यश मिळवले आहे. गतवेळच्या आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून छाप पाडणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे विधिमंडळातही अनेक नेत्यांच्या कौतुकाचा विषय ठरले होते. त्यांच्या विधिमंडळातील कामकाजामुळे त्यावेळचे विरोधी नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभावित झाले होते. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी काँग्र...
आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र.... साहेब.......आज तुमची प्रकर्षाने आठवण येत आहे.कारण तुमची व सामान्य जणांची अशी एकत्रीत असणारी "शिवसेना"ही संघटना मा.उध्दव ठाकरे चांगल्या व तुमच्याच विचाराने ,त्याचपध्दतीने चालवित आहेत.याबाबत काळजी नसावी,पण ज्या भाजपाला आपल्या महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते,शिवसेना जोषात व मराठी माणसाच्या मनामनात,आक्रमकपणे वाटचाल काल -आज-उद्याही करीत आहे व राहील.यात कोणीही कमी पडणार नाही व मागे हटणार नाही.ज्या भाजपाकडे कोणी ढुंकुन पाहात नव्हेते,त्यावेळी "साहेब"तुम्ही भाजपाला मैत्रीचा हात देवून महाराष्ट्रात भाजपाची ओळख निर्माण करून दिलीत."भगवा" महाराष्ट्र विधानसभेवर फडकावयाचाच हा तुमचा प्रबळ आत्मविश्वास होता,तो "साहेब"तुम्ही एक वेळ खरा करून दाखविलात याचा रास्त अभिमान व स्वाभिमान आहे.भाजपाला सोबत घेवूनच युतीचे सरकार केले होते. दुस-या वेळीही विधानसभेवर "भगवा"फडकावयाचाच याची "साहेब"  तुम्ही घोषणा केली होती.शिवसेना-भाजप यांची एकत्रित सत्ता असावी ही तर आपली इच्छा.यासाठी शिवसैनिकांनी जी...