प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिवाकर रावते यांनी घेतली कणखर भूमिका
एसटी महामंडळ अतिशय डबघाईला आले होते. त्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न मंत्री दिवाकर रावते यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर परिवहन खाते खडबडून जागे झाले आहे. अनेक निर्बंध खाजगी प्रवासी वाहतुकीबरोबरच एस टी महामंडळावरही घालण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता शासकीय विभागांमध्ये शिस्त नसते, ती शिस्त आणण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने केलेला आहे. राज्यातील एसटी बससह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक व सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत. वास्तविक पाहता हे निर्णय महाराष्ट्रातील तमाम एसटीने अथवा खासगी वाहनाने प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी म्हणजेच प्रवाशांना सुखकारक प्रवास व्हावा, यासाठी एसटी महामंडळाची स्थापना झालेली आहे. एसटी महामंडळाच्यावतीने प्रवाशांना सर्वाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्या...