मोर कावळा (गोरख तावरे) पाण्याचा वाहता प्रवाह अन् हिरवीगार झाडी मनाला मोहीत करत असते.श्रावन संपला आणि बरेच दिवस रखडलेली पार्टी कुठे करायची याचे चर्वित चर्चा झाली.अखेर चांदोली धरणाच्या पायथ्याशी जाण्याचे निश्चीत आहे.कडक श्रावणाच्या पर्वनीला पुर्णविराम देवून रंगीत संगीत पार्टीत मनमुराद आनंद लूटता आला.यात काय विशेष. असेच वाटेल,विशेष तर आहे म्हणूनच तर अनुभव सांगणेचा मोह आवरता येत नाही.चांदोली परिसरात गेल्यानंतर गर्द हिरव्या झाडीने मन आनंदी तर झालेच पण मोरांच्या दर्शनाने आनंद द्विगुणीत झाला.चांदोलीच्या निसर्गात मन प्रसन्न झाले.वाहत्या पाणी प्रवाहाच्या कडेला आमची मैफील स्थानापन्न झाली आणि मोर मनाच्या हिंदोळयावर नाचत असतानाच आमच्या सहभोवती काळया कावळयांनी रिंगणच केले.काव काव करीत राहिल्याने आम्हा सर्वांचे लक्ष त्यांचेकडे गेले.अरे वा पहा कावळे .....इकडे तिकडे चोहीकडे पहावे तिकडे कावळेच कावळे..! तेव्हा हे कावळे पुराण होते असे. तसा हा अनुभव वेगळा,कावळेच कावळे आपल्या शेजारी असताना त्यांचे कोण बरे कौतुक करेल.आमचेकडे फरसाना होता.एका मित्रांने उत्सुकते कावळयांना फरसाना खाण्यासाठी फेकला तर सर...