कराड नगरपालिका राजकारणातील नशीबवान विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (दादा)
कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या वेगळ्या कामकाज पद्धतीने कराडकरांच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण केले आहे. कराड नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जयवंत पाटील यांना अनेक प्रकारच्या संधी मिळालेल्या आहेत. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न जयवंत पाटील यांनी केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग असो अथवा वॉर्ड यामधून निवडून येण्याची किमया सातत्याने जयवंत पाटील यांनी करून दाखवलेली आहे. कराड नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील कार्यरत आहेत.नगरपालिका राजकारणातील नशीबवान जयवंत पाटील (दादा) म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सहज अनेक पदे जयवंत पाटील यांच्याकडे चालून आलेली आहेत. कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. मात्र जयवंत पाटील हे नशीबवान आहेत. गतकाळामध्ये जयवंत पाटील यांच्याकडे चालून नगराध्यक्षपद आले आणि या पदावर असताना जयवंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. कराड एसटी स्टँडला लागून असणारा खोकीधारकांचा प्रश्न आणि कराडचा मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा ...