पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मलकापुर नगरपरिषद निवडणुकीत नामदार विरुद्ध आमदार गटांमध्ये लढत होणार

इमेज
मलकापूर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे आता मलकापूरमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. वास्तविक निवडणुका म्हटल्या की आरोप-प्रत्यारोप होणार. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवी असते, यामध्ये काही गैर आहे असे नाही. दरम्यान आरोपाची पातळी घसरली नाही पाहिजे, याचे भान मात्र सर्वांनीच पाळले पाहिजे.कसे असेल मलकापूर निवडणुकीतील राजकीय चित्र. याचा विचार केला गेला तर माजी मुख्यमंत्री व विद्यमान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले या दोघांच्या गटामध्ये मलकापूरमध्ये राजकीय संघर्ष पहावयास मिळेल. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सांभाळणार आहेत माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे. तर डॉ. अतुल भोसले यांच्या बाजूने ज्येष्ठनेते, शेतीमित्र अशोकराव थोरात गड लढणार आहेत. दरम्यान काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत मलकापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पहावयास मिळणार आहे. काँग्रेस व भाजपाने आत्तापर्यंत उमेदवारांची चाचपणी केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अर्ज भरण्याच्या दिवसापासू...

विकास निधीतून "विकास" करणारे दोन आमदार एक नामदार

इमेज
सातारा जिल्हा हा राजकीय व सामाजिक दृष्ट्या जागृत आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आमदार विकास निधी आणण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत हे निदर्शनास येत आहे शासन स्तरावरून विकास कामासाठी निधी आणलेला पाहता आमदार बाळासाहेब पाटील आमदार शंभूराज देसाई णि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कोठेही कमी पडले नाहीत हे निदर्शनास येत आहे सर्वसामान्य जनतेला प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. दोन आमदार व एक नामदार यांनी आपल्या मतदारसंघासाठी शासनाकडून आणलेला निधीचा गौरव झाला पाहिजे. कराड शहराची हद्दवाढ झाली आहे. या हद्दवाढ विभागात अनेक विकासकामे करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी प्राप्त होणे आवश्यक होते. याकरिता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी वाखानरोड व बैलबाजार परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविला आहे. या नागरी सुविधांसाठी ३ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तो लवकरच प्राप्त होईल आणि हद्दवाड भागांमध्ये विकास कामांचा धूमधडाका सुरू होईल. याचबरोबर...

खासदर छत्रपती उदयनराजे यांचे काय करायचे ते आम्ही ठरवू - शरद पवार / दैनिक सामना 26 डिसेंबर 2018

इमेज
कराड  - सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपशी  वाढणारी सलगीबाबत विचारले असता "याची चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, खासदार उदयनराजे भोसले यांचे काय करायचे ते ठरवू असे खासदार शरद पवार म्हणाले. आमदारविक्रमसिह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पाटण येथे आल्यानंतर खासदार शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत  खासदार शरद पवार यांना  विचारले असता ते म्हणाले, एखाद्या समुहाबाबतच्या सामाजिक आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावयाचा असल्यास राष्ट्रपती नोटिफिकेशन काढून निर्णय घेऊ शकतात. केंद्र सरकारने याबाबत घटनादुरुस्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ही घटनादुरुस्ती लक्षात घेतलेली आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत काही घटना तज्ञांनी माझ्याकडे शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाबाबत कार्यवा...

टेंभू योजना दुष्काळी तालुक्यांना वरदायिनी / दैनिक सामना /कराड वार्तापत्र - गोरख तावरे

इमेज
पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यातील तालुके अद्यापही पाण्याविना वंचित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणांची संख्या आहे. धरणांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याने पश्चिम महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राचे वरदायिनी असलेले कोयना धरण पाटण तालुक्यांत आहे. टेंभू योजनाही कराड तालुक्यातील टेंभू गावात आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या  4 हजार 88 कोटी 94 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. टेंभू योजनेचा अल्प फायदा कराड तालुक्याला होणार आहे . कारण तालुक्यांतील दोन गावांचा समावेश या योजनेमध्ये आहे. तर टेंभू योजनेमध्ये पाणी अडविल्याने पाण्याचा फुगवटा कराड शहरातील कृष्णा नदीला येत असतो. पाणी अडवल्यामुळे नदीमध्ये मिसळणारे इतर सांडपाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असतो. टेंभू योजनेमुळे अवर्षण प्रवण भागातील 240 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. दोनशे चाळीस गावातील नागरिकांना या योजने...

बा विठ्ठला पंढरपूर वासियांना सद्बुद्धी दे . . !

इमेज
पंढरपूरचा विठ्ठल हा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. कष्टकऱ्यांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. लाखो वारकरी दरवर्षी अनवाणी पायाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. याचा विचार करून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अत्याधुनिक सोयी सुविधेसह भक्त निवास बांधले आहे. विशेष म्हणजे आयजीबीसी या संस्थेने या इमारतीला मानाकन दिले असून पहिली “ग्रीन बिल्डींग” ठरली आहे. या भक्त निवासामध्ये सुमारे १२०० भाविक मुक्काम करू शकतील, अशी उभारणी केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दूरदृष्टीने भक्तनिवासाची उभारणी केली आहे. याचा रास्त अभिमान व आनंद वारकरी संप्रदायातील वारकऱयांना झाला. मात्र स्थानिक पंढरपूरकर वासियांना याचा आनंद झालेला दिसत नाही. भक्त निवासाची चर्चा होण्यापेक्षा भक्तनिवास लोकार्पण सोहळ्याचे राजकारण नाट्यावर चर्चा सुरू आहे. डॉ. अतुल भोसले यांनी लोकार्पण सोहळ्यासाठी कराड मधून कार्यकर्ते कार्यक्रमासाठी वारकरी म्हणून आणले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. याचा अर्थ असा होतो की, ज...

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या समस्या सोडविणार प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांची हमी सह्य़ाद्री विश्रामगृहावर बैठक संपन्न

इमेज
मुंबई  (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या समस्याबाबत सघटनेच्या राज्य पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून व अडचणी समजावून घेवून त्या सोडवण्यासाठी स्वत: लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याची हमी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांनी दिली.तर पत्रकार व वृत्तपत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या बैठकीसाठी मुंबई येथे १६ ते २१ डिसेंबर या सहा दिवसांच्या महाराष्ट्र दौच्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचेसोबत सह्याद्रि अतिथीगृहावर बैठक होऊन महाराष्ट्रातील छोटय़ा व मध्यम वृत्तपत्राबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्राभर सुरू असलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, संघटक गोरख तावरे, संघटन सचिव नेताजी मेश्राम, नागपुर विभागीय अध्यक्ष मुंकुंद जोशी उपस्थीत होते. ...

दि.कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअरर्स असोसिएशन संस्थेचा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’ जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता सुनिल कृशिरे, यांना जाहिर दिपक रैनाक यांची पत्रकार परिषदेत घोषणा

इमेज
कराड दि.१८ (लक्ष्मीपुत्र ) - दि.कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअरर्स असोसिएशन संस्थेच्या 51 व्या अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’ जलसंधारण पुणे तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जलसंधारण महामंडळाचे ( संभाजीनगर ) मुख्य अभियंता सुनिल कृशिरे, यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष दिपक रैनाक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी उपाध्यक्ष राजेश पटेल, सचीव सचीन सुर्यवंशी, खजिनदार विजय गायकवाड, अजित पाटील, प्रकाश पाटील, रविराज शिंदे, श्रीधर इनामदार, दिग्वीजय जानुगडे, धैर्यशिल यादव, अजिंक्य पाटील उपस्थितीत होते. सुनिल कुशिरे यांना इमेज वेलफेअर अचिव्हर्स फोरमकडून मानाचा” राष्ट्रीय जलसिंचन अवॉर्ड" ने गौरविण्यात आले होते अशा कर्तबगार अभियंत्यास दि. कराड आर्किटेक्स अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने देण्यात येणारा “ सर विश्वेश्वरय्या पुरस्कार, मानपत्र देवून कर्तव्यदक्ष प्रशासकाच्या समर्पित कारकिर्दीचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा 20 डिसेंबर रोजी सायं. 5.वा. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन, या ठिकाणी आयोजित केला आहे. महसुल व बांधक...

दिवाळी अंकांची गोडी कायम रहावी- माजी राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील

इमेज
कराड दि.१० (लक्ष्मीपुत्र)   -  दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्‍ट्य असून या अंकांचे महत्‍त्‍व आणि गोडी कायम राहण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत ,  असे आवाहन सिक्‍कीमचे माजी राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. दिवा प्रतिष्‍ठान आणि कराडवैभव चॅरिटेबल फाऊंडेशनच्‍या संयुक्‍त विद्यमाने राज्‍यातील दिवाळी अंकांच्‍या संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन व स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍यस्‍तरीय दिवाळी अंक पुरस्‍कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे संपन्‍न झाला. तयावेळी  ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील ,  दिवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये ,  चंद्रकांत शेवाळे ,  अॅड .  धनंजय सिंहासने ,  शिवाजी धुरी ,  दीपक अरबुणे हे उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी दिवाळी अंकांचे महत्‍त्‍व विशद करतांना सांगितले की ,  मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की ज्‍या भाषेचे साहित्‍य संमेलन होते ,  नाट्य संमेलन होते ,  काव्‍य संमेलन होते. एखाद्या सणानिमित्‍त विशेष अंक प्रकाशित करण्‍याची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा मराठी भाषे...

उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात देशात "सह्याद्रि" अव्वल

इमेज
कराड - पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचे जाळे सकारात्मक दृष्टीने चांगले विणले गेले आहे. कराड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकारी सोसायटी प्रत्येक गावात कार्यरत आहेत. दूध संस्था, पतसंस्था, सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने कार्यक्षमपणे काम करताहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, व खाजगी जयवंत शुगर हे चार साखर कारखाने शेतकऱयांचा ऊस गाळप करून त्यांना अधिक चांगला दर देण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन २०१७-१८ सालासाठी देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक "सह्याद्री"ला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून सह्याद्री कारखान्याची निर्मिती झाली आणि याची पूर्ण जबाबदारी स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी इमाने इतबारे सह्याद्री कारखान्याची निकोप वाढ केली आणि सह्याद्री कारखान्याने कार्यक्षेत्रात...

कराड उत्तरची कासवगतीने; तर दक्षिणची हालचाल गतीमान

इमेज
सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघ असणारा कराड तालुका हा एकमेव तालुका आहे. कराड दक्षिण व कराड उत्तर अशी या विधानसभा मतदारसंघाची विभागणी झालेली आहे. उत्तर मतदार संघापेक्षा कराड दक्षिण मतदारसंघात राजकीय हालचाली नेहमीच जोरदारपणे सुरू असतात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटातील टोकाचे मतभेद सर्वश्रूत आहेत. कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे व धैर्यशील कदम सातत्याने धडका देत आहेत.   कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विभागलेला मतदार संघ आहे. कराड, कोरेगाव, सातारा या तालुक्यांचा समावेश या मतदार संघात आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कराड उत्तर मतदार संघात राजकीय संघर्ष आहे. पण तो अतिशय टोकाला कधीही जात नाही. ठराविक मर्यादेपर्यंत आरोप - प्रत्यारोप होतात, प्रश्नाला उत्तर दिले जाते दरम्यान भाषेच...

शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी

इमेज
शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी  शिवसेनेचे दोन मंत्री कराड शहरात येऊन गेल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विजयबापू शिवतारे व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे कराड दौऱयावर आले होते. या मंत्र्यांच्या दौर्यामुळे कराडमधील प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती देण्याचे आदेश मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. तर येत्या तीन महिन्यांमध्ये कराड एसटी बसस्थानकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी हमी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.कराडच्या दृष्टीने हे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने कराड तालुक्यात शिवसेनेबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली जात आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार आता सातारा - सांगली संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी लक्ष घालून कामांना गती देणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कराडमध्ये बैठक घेऊन नियोजन केले आहे. कराड विमानतळ विस्तारीकरण...

शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी

इमेज
शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी  शिवसेनेचे दोन मंत्री कराड शहरात येऊन गेल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विजयबापू शिवतारे व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे कराड दौऱयावर आले होते. या मंत्र्यांच्या दौर्यामुळे कराडमधील प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती देण्याचे आदेश मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. तर येत्या तीन महिन्यांमध्ये कराड एसटी बसस्थानकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी हमी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.कराडच्या दृष्टीने हे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने कराड तालुक्यात शिवसेनेबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली जात आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार आता सातारा - सांगली संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी लक्ष घालून कामांना गती देणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कराडमध्ये बैठक घेऊन नियोजन केले आहे. कराड विमानतळ विस्तारीक...

100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन

इमेज
100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन कराड  दि.१4 ( लक्ष्मीपुत्र )   -  महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 14 ऑगस्टला १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण १९०४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.   कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली.  प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100...

100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन

इमेज
  कराड  दि.१4 ( लक्ष्मीपुत्र )   -  महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 14 ऑगस्टला १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण १९०४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.   कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली.  प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणा-या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये दि.14 ऑगस्टला सकाळीच 100 टीएमसी पाणीसाठयाचा ...

कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती द्या - विजय शिवतारे कराडच्या पत्रकारांच्यावतीने मंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार

इमेज
कराड दि.११ (लक्ष्मीपुत्र) -  कराड विमानतळ विस्तारीकरणातील बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावून विमानतळ विस्तारीकरणाला गती द्या, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना केली.   श्री विठ्ठल रूक्‍मिणी समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी श्री.विजय शिवतारे यांची भेट घेवून स्वागत केले. सातारा जिल्हय़ाचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांचा कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला.दैनिक  लोकसत्ताचे प्रतिनिधी विजय पाटील, दैनिक सामनाचे प्रतिनिधी गोरख तावरे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी हेमंत पवार,दैनिक सकाळचे प्रतिनिधी सचिन देशमुख, मुक्त पत्रकार  प्रमोद तोडकर उपस्थित होते. पालकमंत्री श्री. विजय शिवतारे येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. आज सकाळी श्री.विजय शिवतारे यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडून विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी 28 बाधित खातेदारांशी कालच बैठक झाल्याचे सांगून त्यांना पुनर्वसन पॅकेजसंदर्भात माहिती दिल्याचे स्पष्ट केले. 28 बाधित खातेदारांी सकारा...

इंदुर अभ्यास सहल हा दीर्घकाळ स्मरणात राहणारा सहवास

इमेज
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम आलेल्या इंदूर या शहरास कराड नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली आहे. आपले कराड स्वच्छ व सुंदर असावे यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील लोकांनी पाहणी करून अभ्यास दौरा करून आलेले आहेत. इंदूरमधिल पाहून आलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न व्हावा हीच एक अपेक्षा या दृष्टीने कराडमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर एकांडे यांनी थोडक्यात घेतलेला मागोवा. . . . . . कराड ते इंदुर या लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणालाही कसलाही ञास होणार नाही कंटाळा येणार नाही याची सर्वंकश काळजी घेत मुख्याधिकारी मा.यशवंत डांगे यांनी केलेले नेटके नियोजन.... महिला सदस्यांचा सुरक्षित वावर, पुरुष सदस्यांवरची आवश्यक ती बंधने,चर्चेचा व संवादाचा उत्तम दर्जा,दिलखुलास करमणूक, चहा पाण्यापासुन ब्रेकफास्ट,भोजन व निवास व्यवस्था दर्जेदार... जाता - जाता मोरगावचा मोरेश्वर शिर्डीचे साईबाबा,महेश्वर, ओंकारेश्वर,उज्जैनचा महाकालेश्वर,रांजणगावचा सिध्दिविनायक,महाराष्र्टाचा अभिमान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी दर्शनाने एक वेगळीच ...