शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी
शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी शिवसेनेचे दोन मंत्री कराड शहरात येऊन गेल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विजयबापू शिवतारे व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे कराड दौऱयावर आले होते. या मंत्र्यांच्या दौर्यामुळे कराडमधील प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती देण्याचे आदेश मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. तर येत्या तीन महिन्यांमध्ये कराड एसटी बसस्थानकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी हमी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.कराडच्या दृष्टीने हे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने कराड तालुक्यात शिवसेनेबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली जात आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार आता सातारा - सांगली संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी लक्ष घालून कामांना गती देणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कराडमध्ये बैठक घेऊन नियोजन केले आहे. कराड विमानतळ विस्तारीकरण...