पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी दीक्षांत सोहळा 558 विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

इमेज
कराड , (लक्ष्मीपुत्र ) -   कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा  8  वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक  10  मे रोजी सकाळी  10  वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे .  या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी .  विद्यासागर राव उपस्थित राहणार असून ,  कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ .  वेदप्रकाश मिश्रा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत . या सोहळ्याला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश भोसले ,  कृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ . सौ .  नीलिमा मलिक आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .  या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील  558  विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ .  एम .  व्ही . घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ .  सौ .  आर .  के . गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे . याबाबत प्रस...

कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठीच दोन माजी चेअरमनचा आटापिटा. . . . . डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते व इंद्रजीत मोहिते यांच्यावर डागली तोफ

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र ) -   कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याची घाई झालेल्या माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि डॉ .  इंद्रजीत मोहिते यांचा सहकाराचा अभ्यास कच्चा आहे .  सहकार कायद्यातील  97  व्या घटनादुरुस्तीनुसार कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत असताना ,  विरोधक मात्र राजकीय हेतूने मुद्दे उपस्थित करून सभासदांची दिशाभूल करण्याची धडपड करत आहेत .  या दोन्ही माजी चेअरमनचा हा आटापिटा निव्वळ कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना .  डॉ .  अतुल भोसले यांनी केली .  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन  2019-20 गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूक करार शुभारंभ व सभासद मोफत साखर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते . व्यासपीठावर चेअरमन डॉ .  सुरेश भोसले , संचालक गुणवंतराव पाटील ,  जितेंद्र पाटील , धोंडिराम जाधव ,  संजय पाटील ,  पांडुरंग होनमाने , दिलीपराव पाटील ,  कार्यकारी सूर्यकांत दळवी , बहेचे उपसरपंच मनोज पाटील ,...

सहकार क्षेत्रामुळे कराड तालुका सुजलाम सुफलाम, अविनाश मोहिते हे कृष्णाकाठचे उमदे व हरहुन्नरी नेतृत्व पण स्वतःच्या अक्कल हुशारीवर राजकारण करण्यापेक्षा विघ्नसंतोषी तथाकथित सल्लागाराच्या सल्ल्याने करताहेत राजकारण

इमेज
कराड तालुक्यात तीन सहकारी साखर कारखाना, एक खाजगी साखर कारखाना आहे. साखर कारखानदारीमुळे कराड तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे. आदरणीय स्व. पी. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले, माजी आमदार विलासकाका पाटील (उंडाळकर)यांनी कराड तालुक्यात सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. या सर्वांना मार्गदर्शन व सहकार्य केले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. केवळ सहकारी साखर कारखाने नव्हे तर दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायटी,सहकारी बँका, पतसंस्था, कुकुटपालन संस्था व शेतीपूरक अनेक संस्था कराड तालुक्यात कार्यरत आहेत.सहकार क्षेत्रामुळे कराड तालुक्यात अनेक रोजगाराचे स्रोत निर्माण झालेले आहेत. यामुळे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न कधी सतावत नाही. दरम्यान सहकारी क्षेत्रातील गटबाजी व राजकारणाच्या ध्रुवीकरणामुळे काही वेळेला अनेक कामगारांवर हेतूपुरस्सर व राजकारणातील संकुचितपणामुळे अन्याय केला जातो.ही वस्तुस्थिती आहे हे कोणीही नाकारत नाही. आपल्या सोयीच्या राजकारणासाठी स्वताच्या मर्जीतील सेवकांची भरती करणे व विरोधकांच्या सेवकांना संस्थेबाहेर...