पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून गोरख तावरे यांची निवड

इमेज
कराड (प्रतिनिधी) - असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून कराड येथील राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटेचे राज्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, प्रविण पाटील, रंगराव शिपुकडे, अल्ताफ संन्दी, तेजस्विनी सुर्यवंशी, ए. आय. मुजावर, अनिल आपटे, राजश्री सुर्यवंशी उपस्थित होते. आप्पासाहेब पाटील यांनी गोरख तावरे यांना नियुक्तीपत्र देऊन यथोचित सत्कार केला. असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून कराडचे साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख काशिनाथ तावरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष के.डी. चन्दोलाजी यांच्या सहमतीने लॉनसिंग टेनन, राष्ट्रीय सचिव यांनी नियुक्ती केली आहे. असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेचे कार्य भरीव व गतीमान होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. वृत्तपत्रक्षेत्रातील प्रदिर्घ अनुभवाचा या संघटनेच्या वाढीसाठी व वृत्तपत्राच्या समस्या सोड...

पृथ्वीराजबाबांनी जेवढी कामे केली नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त कामे अतुलबाबांनी केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या खिशातली डायरी माझ्याच्याकडे, पृथ्वीराजबाबांना डॉ. अतुल भोसले याचा इशारा

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - खासदारकीच्या पोटनिवडणुकीमध्ये छ. उदयनराजे महाराज राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणार अाहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी जेवढी कामे पाच वर्षांमध्ये केली नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त कामे अतुलबाबांनी केली असून, जनतेची पाच वर्षांमध्ये आम्ही काय सेवा केली ते सांगण्यासाठी महाजनदेश यात्रा निघाली आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष अाहे. बाबा तुम्ही आवाज दिल्यावर वीस हजार जनसमुदाय आज येथे पुढे उभा आहे व माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला आधे उधर जाओ, आधे इधर अशी अवस्था निर्माण झाल्याचा टोला पृथ्वीराजबाबा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कराड येथील शिवाजी स्टेडियम महाजनदेश यात्रा आल्यानंतर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ना.डॉ. अतुलबाबा भोसले, ना. शेखर चरेगावकर, ना. नरेंद्र पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. सुरेशबाबा भोसले, श...

आघाडीकडे बारा वाजविण्याची ताकद आम्हाला कोणी गृहीत धरु नये - राजेंद्रसिंह यादव

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - जन-मन-धनाने कराड शहरासह तालुक्याचा विकास करण्याची यशवंत आघाडीचे ध्येय काल-आज आणि उद्या राहणार आहे.दिखावा आम्हाला कधी जमला नाही, आणि जमणारही नाही.आम्हाला जेथे मान-सन्मान मिळेल तेथ आम्ही राहणार असून लवकरच आमचा निर्णय जाहिर करु, असे सांगत राजेंद्रसिंह यादव म्हणाले, संघर्ष आमच्या पाचवीला पूजला असून, लढणे हे आमच्या रक्तात आहे. आम्हाला कोणी गृहीत धरु नये, आमच्या आघाडीकडे एखाद्याचे बारा वाजवण्याची ताकद आहे असा टोला कार्यकर्ता निर्धार मेळाव्यानिमित्त्त  विरोधकांना लगावला. राजेंद्रसिंह यादव मित्र मंडळ व यशवंत जनशक्ती विकास आघाडी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात राजेंद्रसिंह यादव बोलत होते.यावेळी बांधकाम समिती सभापती हणमंतराव पवार, नियोजन समिती सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान, आरोग्य समिती सभापती गजेंद्र कांबळे, नगरसेवक अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, सुप्रिया खराडे, आशा मुळे, संगिता देसाई उपस्थित होत्या. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड ही यशवंतराव चव्हाणसाहेबांची कर्मभूमी आहे.कराड शहरातील नागरीकांनी यशवंत विचारां...