पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिनेते नाना पाटेकर यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारबाबत बॉलीवूडचा कृतघ्नपणा

इमेज
हिंदी - मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच मराठी नाट्य रंगमंचावर आपल्या अभिनयाने गारुड घातलेल्या नाना पाटेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान या अंत्यसंस्कारावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत अनेक मान्यवर कलाकारांनी काम केले यापैकी एक ही कलाकार हजर राहिला नाही ही दुर्दैवी घटना आहे. एक मराठी कलाकार एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळतो आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. मात्र ज्या सहयोगी कलाकारांसोबत त्यांनी काम केले, त्या कलाकारांना नाना पाटेकर यांच्या मातोश्री गेल्याचे दुःख नसावे किंवा वेदना होत नसाव्यात हे माणुसकी नसणारा प्रकार म्हणावा लागेल. नाना पाटेकर यांचा स्वभाव पाहता ते स्वच्छ, स्पष्ट व तडाखेबंद बोलणारे आहेत. वास्तविक पाहता कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत, असे नाही मात्र चुकीला चुक म्हणत असत. याचा अर्थ इतरांना दुखावण्याचा बहुधा त्यांचा उद्देश नसावा मात्र, जे सहयोगी कलाकारानी त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा ऋणानुबंध दीर्घकाळ आहे. नानांना घडवण्यामध्ये त्यांच्या आईचा महत्त्वाचा वाटा आहे. आई गेल्याच...

चौथास्तंभ कोणता ?

इमेज
लोकशाहीचा चौथास्तंभ अधिक सक्षम झाला की कमकुवत झाला ? यावर चर्चा होणे आवश्यक आहे. दरम्यान लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून नक्की कुणाला संबोधायचे ? प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया की सोशल मीडिया ? हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता वृत्तपत्रांचे माध्यम अलीकडच्या काळामध्ये बदलते आहे. प्रिंटिंग वृत्तपत्रांबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. प्रसार माध्यमांची गतिमान बदलांचा स्वीकार समाजमन करीत आहे. लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून मीडियाचा वारंवार उल्लेख होत असतो, वास्तविक पाहता कायद्यान्वये घटनेमध्ये अधिकार प्राप्त झालेला नाही. लोकशाहीमधील इतर जे तीन स्तंभ आहेत, त्यांना घटनेच्या कक्षेमध्ये अनेक अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. दरम्यान मीडिया हा लोकांचे मत व्यक्त होणारा चौथास्तंभ म्हणून लोकशाहीचा चौथास्तंभ मीडियाला संबोधले जात आहे. काळानुरूप माध्यमांमध्ये अनेक बदल होत आहेत हे बदल प्रत्येक माध्यम स्वीकारीत आहे. वृत्तपत्र हे प्रिंटिंग मीडिया माध्यम आहे, यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रिंटिंग करण्याचे तंत्रज्ञान बदलले आहे, लाखो प...

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.

इमेज
नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे - भारतीय जनता पार्टी ७४७७ नीलम धनंजय येडगे राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ७७४७ (विजयी) प्रभाग क्रमांक १ अ, सर्वसाधारण महिला - गीतांजली शहाजी पाटील (काँग्रेस), - ८४३ (विजयी) मनीषा मच्छिंद्रनाथ शिंदे (भाजपा), - ६४१ प्रभाग क्रमांक१ ब, सर्वसाधारण पुरुष - नारायण उर्फ नितीन विष्णुपंत काशीद (शिवसेना), - ६९० प्रशांत शिवाजी चांदे (काँग्रेस), - ७९४ (विजयी) प्रभाग क्रमांक २अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - नाझिया समीर मुल्ला (काँग्रेस) - ४१२ नूरजहान राजू मुल्ला (भाजपा) - ७२७ (विजयी) प्रभाग क्रमांक २ ब, सर्वसाधारण पुरुष - विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश (भाजपा) - ६८९ (विजयी) मोहन सकाराम शिंगाडे (काँग्रेस), - ४५० प्रभाग क्रमांक ३ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग - किशोर कृष्ण शेडगे (काँग्रेस), - १०४९ (विजयी) मनोज ज्ञानदेव येडगे (भाजपा), -९९५ प्रभाग क्रमांक ३ ब, सर्वसाधारण महिला - आनंदी मोहन शिंदे (काँग्रेस), - १०६७ (विजयी) उमा प्रमोद शिंदे (भाजपा) - ९७२ (समान मते मिळालेमुळे चिट्टी प्रक्रिया करण्यात आली.)   प्रभाग क्...

शिवसेना - भाजपा युतीबाबत काय होईल ?

इमेज
आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. जे प्रारंभी लोकसभेच्या निवडणुका होतील आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना-भाजपची युती होणार ! याचेही आता संकेत मिळत आहेत. फक्त आता युती होण्याची औपचारिकता बाकी आहे की काय ? असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शिवसेने-भाजप यांच्यात पूर्वीप्रमाणे युती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवलेल्या आहेत. अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहत नाही. हे ही बरोबर आहे, कारण शिवसेना "अकेले चलोरे" चा नारा पूर्वीपासून देत आहे. यामुळे मैत्रीसाठी शिवसेना हात पुढे करणार नाही. शिवसेनेबरोबर मैत्रीची आवश्यकता व गरज सध्या भारतीय जनता पार्टीला आहे, हे मात्र निश्चित. लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीमध्ये बोलणी सुरू आहे. अनेक जागांवर त्यांचे एकमत झाले आहे. दरम्यान याच धरतीवर शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर जागा वाट...

श्यामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांचा विजय निश्‍चित होणार ! शामराव शिंदे उर्फ अण्णा यांनी घेतली प्रचारात आघाडी

इमेज
मलकापुर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग 9 मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणारे शामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्यक्ष मतदारांना भेटून माझी उमेदवारी कशासाठी, हे पटवून दिले आहे. त्याचबरोबर श्यामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना प्रभाग ९ मधून वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान माझ्यासह सहयोगी उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय होईल असा विश्वास शामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांनी व्यक्त केला आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शामराव खंडेराव शिंदे, स्वाती संदीप पवार, अश्विनी संतोष हिंगसे यांनी आघाडी घेतली असून प्रभाग 9 मधून आमचा विजय निश्चित होणार असा विश्वास शामराव खंडेराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मलकापूर शिंदे यांचे गाव म्हणून सुपरिचित आहे. त्याचबरोबर शामराव खंडेराव शिंदे हे राजकारण-समाजकारणात आघाडीवर असतात. समाजातील विविध घटकातील लोकांच्या सुखदुःखात शामराव अण्णा नेहमी सहभागी असतात. गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्...

मलकापूरची नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळणार कोणाला ? भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय कांग्रेस पार्टीला मिळणार सत्ता

इमेज
मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकमेकांवर खरमरीत अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. मलकापूरच्या मतदारांनी दोन्हीकडचे एकमेकावरील आरोप ऐकलेले आहेत. उमेदवारांचे म्हणणे ऐकले आणि आता मतदार राजा मलकापूरचा निर्णय घेणार आहे यामुळे 27 तारखेला मतदान होईल. निकालानंतर मतदार राजाने कोणता निर्णय घेतला हे स्पष्ट होईल. मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक पक्ष चिन्हांवर होत आहे. दोन राजकीय पक्षांमधील सत्तासंघर्ष प्रसार सभांच्या माध्यमातून समोर आला आहे. वास्तविक पाहता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले. एकाने आरोप करायचा दुसऱ्यांनी त्या आरोपाचे खंडन करायचे, असा प्रचाराचा प्रकार या ठिकाणी दिसून आला. दरम्यान वैयक्तिक टीका अनेकांना झोंबली आहे. वैयक्तिक टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र वैयक्तिक टीका टिप्पणीमुळे दुखावल्याने निकालानंतर व्यक्तिगत संबंध सुधारतील का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एक ते नऊ प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. वास्तविक पाहता महिलांना 50 टक्क...

नूरजहाँ मुल्ला व दिनेश रैनाक प्रचंड मताधिक्‍याने विजय होणार तर नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या डॉ. सारिका गावडे यांना संधी मिळणार - राजू मुल्ला

इमेज
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग २ अ मधून नूरजहाँ राजू मुल्ला व प्रभाग २ ब मधून विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्‍याने निवडून द्यावे असे आवाहन ओबीसी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला यांनी केले आहे.मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या डॉ. सारिका प्रशांत गावडे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया राजू मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. मलकापूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांना जनसेवेची संधी देतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मलकापूर शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक म्हणून नावलौकिक असलेले राजू मुल्ला यांच्या पत्नी नूरजहाँ मुल्ला या सध्या पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवीत आहेत. पारदर्शकतेने व्यवसाय करून मलकापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे हे दाम्पत्य कौतुकास पात्र आहे. गरीब गरजू लोकांना नेहमी मदतीचा हात देणारे व अनेकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजू मुल्ला...

नूरजहॉ मुल्ला यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद /प्रभाग 2 मधील दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील - राजू मुल्ला/ भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. सारिका गावडे यांना जनसेवेची संधी मिळेल !

इमेज
मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून नूरजहॉ राजू मुल्ला या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग २ मधून नूरजहॉ मुल्ला यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे मी व माझे सहकारी प्रभाग २ मधून विक्रम अशोक चव्हाण आम्ही दोघे या प्रभागातून निवडून येणार असा विश्वास नूरजहॉ मुल्ला यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. मलकापूरच्या इतिहासातील विशेष घटना म्हणजे 52 वर्षांमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला तो नूरजहान मुल्ला यांना. मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या डॉ. सारिका प्रशांत गावडे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया नूरजहॉ मुल्ला व राजू मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. मलकापूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांना जनसेवेची संधी देतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून ...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत उपोषणाला बसलेल्या पंचायत समिती सदस्यांना न्याय मिळावा

इमेज
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया घातला आणि सत्तेचे केंद्रीकरण झाले होते, त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाजातील सामान्य लोकांना सत्तेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे, समाजातील सामान्य लोक सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजेत, समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून वावरता आले पाहिजे, यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि एक हाती असणारी सत्ता सर्वांना समप्रमाणात मिळावी यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्य असा होता. सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे समाजातील अनेक घटक सत्तेपासून लांब होते, त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि विकासाचा महामेरू सर्वत्र उधळू लागला. केवळ विशिष्ट समाजानेच सत्ता उपभोगायची आणि इतरांनी पाहत राहायची ही परिस्थिती राहिली नाही. लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामुळे अनेक छोटे-छोटे लोकप्रतिनिधी आपापल्या गावापुरते, आपल्या विभागातील काम करू लागले, स्थानिक स्वराज्य सं...

आमदार शंभूराजे देसाई यांची जनतेप्रती असणारी संवेदनशीलता

इमेज
महाराष्ट्राच्या राजकारणातील पोलादी पुरुष म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा उल्लेख केला जातो. नुकताच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारकाचे उदघाटन दौलतनगर (ता. पाटण) येथे मोठ्या दिमाखदार समारंभात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली. लोकनेते  बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकाळामध्ये म्हणजेच विविध खात्याचे मंत्री असताना सर्वसामान्य लोकांना फायदा झाला पाहिजे व गरीब, गरजू लोकांना राज्य शासनातर्फे मदत झाली पाहिजे, त्याचबरोबर आर्थिक दुर्बलांना शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी घेतलेल्या निर्णयांचा या ठिकाणी ऊहापोह करण्यात आला. वास्तविक पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सारखा लोहपुरुष पुन्हा महाराष्ट्रात झालाच नाही असे म्हणावे लागेल. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गतकाळामध्ये महाराष्ट्र शासनातील विविध मंत्रिपदाचा कार्यकाळामध्ये केलेल्या कामात नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. तेव्हा त्यांना मानणारे नव्हे तर तत्कालीन परिस्थितीत विरोधक असणारे स...

भाजपा विरुद्ध काँग्रेस उमेदवार एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून सज्ज / 6 अपक्ष नशीब आजमावताहेत / शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाणासह मैदानात

इमेज
मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या ठिकाणी सभा घेऊन निवडणुकीला रंगत आणली आहे.वास्तविक पाहता काँग्रेसकडून अद्याप प्रचार सभांचा धडाका दिसून येत नाही. वास्तविक पाहता प्रत्येक राजकीय पक्षाची प्रचार मोहीम व प्रचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणे, मतदारांना आपली भूमिका पटवून सांगणे व लोकशाहीतील अमुल्य "मत" आपल्याच पक्षाला मिळवणे यासाठी प्रत्येकाने केलेल्या रचनेप्रमाणे मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रचार सभाचा शुभारंभ दोन्ही पक्षांनी केला आहे. प्रचारसभा शुभारंभमध्ये वास्तविक पाहता याचवेळी एकमेकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. आता त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता केलेल्या आरोपांचे खंडन करायचे का ? केलेल्या विकास कामांबाबत बोलायचे ? असा विचार होताना मलकापूरमध्ये दिसतो आहे. मलकापूर नगरपालिका नव्याने स्थापन झाल्यामुळे, आता...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून डान्सबारबाबत निर्णय होईल - मंत्री रणजीत पाटील

इमेज
कराड दि.१८(लक्ष्मीपुत्र) - डान्सबार संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखून, सखोल अभ्यास केला जाईल, या निर्णयाचा पुरेपूर उपयोग करून शासन डान्सबारचा निर्णय होईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिला. मलकापूर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री रणजीत पाटील कराड येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर उपस्थित होते. डान्सबार बाबत अधिक बोलताना मंत्री रणजीत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे कॉफी माझ्यापर्यंत आलेली नाही, त्यामध्ये असे दिसते की सुप्रीम कोर्टाला आम्ही सुचवलेला वेळा सुप्रीम कोर्टाने मान्य केलेल्या आहेत. ७ ते ११.३० वाजेपर्यंत असायला हवेत, बीभत्सपणा त्याच्यातला जसा की, नोटा अंगावरती शॉवर करतात किंवा पैसे उधळले जातात ते होऊ नये, यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. हे करायचे असेल तर तुम्ही टीप द्या, डान्सबार मालक व सेवकांसोबत करार व्हायला पाहिजे. त्यांच्या दोघांचा करार असला तर आपल्...

मलकापूर नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू

इमेज
कराडला लागून असणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून 27 जानेवारी रोजी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण विरोधात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांचे गट एकमेका विरुद्ध दंड थोपटून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक मैदानात उतरला आहे. तर डॉ. अतुल भोसले यांचा गट भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. परस्पर विरोधी दोन्ही राजकीय पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभाच्या सभा संपन्न झाल्या आहेत. या सभांमध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत. नगरपंचायतीची नगरपरिषद होण्यावरून दोन्ही गटांमध्ये श्रेयवादाचे राजकारण यापूर्वीच गाजले होते. दरम्यान आता नगरपरिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष दिसून येत आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण केंद्रामध्ये मंत्री असल्यापासून मलकापूर ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदेला आपल्यापरीने विकास निधी देत आहेत. ...

अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेला संवाद "अरे काय म्हणतोस"

इमेज
अभिनेते नाना पाटेकर यांची आगंतुकपणे भेट झाली. नियोजित कार्यक्रमासाठी हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीचा प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर व अभिनेता मकरंद अनासपुरे कराडमध्ये दाखल झाले आणि त्याच वेळी माझी व त्यांची भेट झाली. नामवंत दोन्ही कलावंत कराडमध्ये दाखल झाल्यामुळे कराडकर यांच्यावतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत केले. कराडच्या शासकीय विश्राम ग्रहावर मुक्कामासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे होते. मूळचा बनवडी येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेला गणेश थोरात हा नाम संस्थेचे काम करतो. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची निवास व भोजन व्यवस्था पाहण्याची जबाबदारी गणेश थोरात यांच्याकडे होती. या निमित्ताने गणेश थोरात यांची ओळख झाली. नाना पाटेकर यांनी एक काळ मराठी रंगभूमीवर अनेक नाटकांमधून भूमिका करून त्या भूमिका गाजल्या आहेत. त्याचबरोबर रंगभूमीनंतर मराठी चित्रपट व हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना भुरळ घातली व नाना पाटेकर यांच्या दमदार संवादाने अनेकांच्या मनामध्ये नाना पाटेकर घर करून राहिला आहे. तर अभिनयाबरोबरच समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त हेत...

शिवम प्रतिष्ठानचे गेले अठरा वर्षांपासून सुरू असणारे प्रबोधन चळवळीचा लोकजागर, युवा संमेलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसे पोहोचले पोचले ? प्रबोधनाची चळवळ अविरत कशी सुरू राहिली !

इमेज
शिवम प्रतिष्ठानच्या प्रबोधन चळवळीला आज भेट देण्याचा योग आला. नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कराड अध्यक्ष सुधीर एकांडे, माजी नगरसेवक श्रीश पेंढारकर आणि मी स्वतः घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठान आयोजित केलेल्या संमेलना ठिकाणी जाऊन भेट देवून आलो, जे पाहिले, त्याचा लेखाजोखा, शब्दात प्रकट करण्याचा केलेला प्रयत्न. तुम्हाला केव्हा ना, केव्हा तरी, शिवम प्रतिष्ठानच्या या संमेलनस्थळी जावे अशी मनस्वी इच्छा होईल. प्रतिष्ठानने उभे केलेल्या अप्रतिम, सुंदर व प्रोत्साहनात्मक, रचनात्मक ठिकाणी भेट द्यावे, अशी इच्छा प्रकट कराल, हे नक्कीच. घारेवाडी (ता. कराड) येथे गेल्या अठरा वर्षांपासून रुदय युवा संमेलन सुरू आहे. ते अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शिवम प्रतिष्ठाने अथक परिश्रम घेतले आहेत. त्याचबरोबर वैचारिक प्रबोधन व्हावे, यासाठी शिवम प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. यासाठी राबणारे अनेक हात आहे. या हाताना समाजाने सलामच केला पाहिजे. धुळोबाच्या डोंगरात शिवम प्रतिष्ठानने उभे केलेले काम महाराष्ट्रासाठी आदर्शवत असेच आहे. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ...

कराड जिल्हा व्हावा अशी मनस्वी इच्छा असणाऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. कराड तालुक्याचा "कराड" जिल्हा होईल ! आता कराड जिल्हा होणार !

इमेज
स्वतंत्र कराड जिल्ह्या असावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून कराडकर करत आहेत. कराड जिल्हा करताना त्याला लागून असणऱ्या तालुक्यांचा  कराड जिल्ह्यामध्ये  समावेश करावा आणि कराड जिल्हा करावा. अशी वेगवेगळ्या पद्धतीने यापूर्वी मागणी करण्यात आली आहे. तसेच कराड जिल्हा करताना लागूनच असणारे कडेगाव, पलूस, पाटण, वाळवा, शिराळा,  तालुक्यांचा समावेश करता येतो, अशा पद्धतीने शासनस्तरावर प्रयत्न अनेकांनी यापूर्वी केला आहे. दरम्यान याला म्हणावे असे यश आलेले नाही. वास्तविक पाहता कराड जिल्हा झाला पाहिजे का ? तर नक्कीच कराड जिल्हा झाला पाहिजे ! कारण सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा कराड तालुका आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल देणारा कराड तालुका आहे. त्याचबरोबर कराड तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व कराड दक्षिण विधानसभा मतदार संघचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर लागून असणाऱ्या तालुक्‍यांचा ही विकास सर्वार्थाने करावयाचा असेल तर कराड जिल्हा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कराड जिल्हा करण्यासाठी आपण शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करू,...

कोकणच्या प्रवेशद्वारावरील कराडचेेे बसस्थानक सज्ज

इमेज
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने राखीव निधी ठेवला होता. या निधीमधून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये एसटी स्टँड उभारणीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी दिला होता. गेल्या अनेक वर्षापासून सदर एसटी स्टँड चे बांधकाम सुरू होते. कराड शहरातील हे मध्यवर्ती एसटी स्टँडचे काम पूर्ण झाल्यानंतर सात जानेवारी रोजी कराड एसटी स्टँडचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी अजित शिंदे व त्यांचे बंधू डॉ. शिंदे यांनी आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ चालक - वाहकांच्या निवासासाठी आपल्या स्वखर्चातून व्यवस्था कराड एसटी स्टँडच्या दुमजल्यावर केलेले आहे. याचेही उद्घाटन आज परिवहन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सर्व सोईनियुक्त अत्याधुनिक बसस्थानक शहर व तालुक्यातील प्रवाशांसाठी आता सज्ज झाले आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ही अधिक सुविधा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आहे. आत्तापर्यंत कराड शहरांमध्ये ज्या ज्या वास्तू निर्माण झाल्या त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तस...

सहकार क्षेत्राबद्दल युती सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सहकाराबद्दल सकारात्मकता दाखवली पाहिजे आणि सहकाराला मदतीचा हात दिला पाहिजे

इमेज
सरकारकडून सहकारासाठी कोणताही प्रतिसाद नाही वास्तविक पाहता सरकारने सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल अशा पद्धतीने सहकार्य केले पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे ग्रामीण भागाची प्रगती झालेली आहे. यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते यांनी सहकार सक्षमपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. केवळ पक्षीय राजकारणाचा विचार न करता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागाचा उत्कर्ष झाला आहे हे कोणीही नाकारणार नाही. ग्रामीण भागाचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवायचा असेल तर सहकार क्षेत्राला मदतीचा हात सरकारने दिला पाहिजे. कारण अलिकडच्या काळामध्ये सरकार सहकार क्षेत्राला मदत करत नाही ही वस्तुस्थिती अनेक आमदार आपापल्या मतदारसंघांमध्ये सांगताहेत. नुकतेच आमदार बाळासाहेब पाटील यांनीही सरकारकडून सहकारासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायटी यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या संस्था ग्रामीण भागामध्ये काम करताहेत स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीमुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण व...