पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रकारांसाठी खुशखबर

( बेरक्याच्या  वतीने  ) पत्रकारांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे, राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व माहिती कार्यालये आणि कामगार आयुक्त कार्यालयांना कामाला लावले आहे. वृत्तपत्र मालकांचा दबाव आता झुगारला गेला आहे. नव्या वर्षात, २०१२ मध्ये नवा आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारी २०१३ मध्ये वृत्तपत्र मालकांनी अडवून ठेवलेल्या मजीठीया वेतन आयोगाच्या  अंमलबजावणीबाबतच्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरू होईल. तत्पूर्वी सध्या प्रत्येक वृत्तपत्र आपल्या पत्रकारांना किती वेतन देत आहे, याची माहिती कामगार आयुक्तालयाकडून घेतली जात आहे. देशभरातून अशी माहिती गोळा केली जात आहे.   महागाई वाढली, सर्वांचे वेतन वाढले, पत्रकार आणि मीडियाशी संबंधित व्यक्तींचे वेतन मात्र पूर्वीइतकेच राहिले आहे.  पत्रकारांच्या वेतनवृद्धीसंबंधी मजीठिया वेतन बोर्डाची नियुक्ती तीन वर्षांपूर्वी सरकारने केली. बोर्डाने आपल्या शिफारसींचा अहवाल ३१ डिसेंबर २०१० रोजी सरकारला सादर केला. मात्र,  मजीठिया वेतन बोर्डाने पत्रकारांच्या वेतनाबाबत सुचवलेल्या शिफारसी   21 महिने उलटून गेल्यानंतरही अद...

पेड न्यूज - खंडणी वसुली

पत्रकारितेत सध्या काय चालले आहे ? पेड न्यूज ,खंडणी वसुली ,बातमी छापायला  आणि न छापायला भिकार्डी  पत्रकारांची फौज निर्माण करणारी संपादक मंडळी कशाचाही मुलाहिजा न ठेवता ,गावो -गावी  खंडणी वसुली करणारी माणसांची पत्रकार म्हणून नेमणूक करीत आहेत. टीळक - आगरकरांची पत्रकारिता राहिली नाही . हे मान्य, मात्र अलीकडच्या काळातील एखाद्या चांगल्या संपादकाचा वारसा सांगावे  , असे नाव नाही ,असे नाही पण वारसदारानीच   खंडणी वसुलीचा धंदा सुरु केल्यावर नाव घ्यायला प्रामाणिक पत्रकारांना  लाज वाटते आहे . प्रामाणिक पत्रकारिता करणारे स्वाभिमानाने काही पत्रकार  टीळक - आगरकरांचे नाव घेतात ही चांगली  बाब होय .समाजातील गुन्हेगारीतेवर लिहिताना आपण काय करतो आहोत याचे भान खंडणी वसुली करणारी वृत्तपत्र ठेवत नाहीत ,आपणाकडील खंडणीबाबतचे  लक्ष विचलित करण्यात हे संपादक - पत्रकार माहीर आहेत .गुन्हेगारीचे मी समर्थन करीत नाही, पण उखळ माथ्याने पत्रकारितेचा वापर करीत  खंडणी वसुली करणारे विकृत संपादक - पत्रकार समाजाची दिशाभूल करी...

पत्रकारितेचा खंडणीखोर

पश्चिम महाराष्ट् मधील  पत्रकारितेचा  खंडणीखोर  कोण ? याचा शोध कोण घेणार ?  पत्रकारितेचा वापर स्वहितासाठी करणारा बदमाश कोण? याची उतरे कोण देणार ? सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या गावातील पत्रकाराचा प्रश्न आहे ? 

यशवंत ज्योतीचे स्वागत

इमेज
यशवंत ज्योतीचे स्वागत करताना लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील ,नगराध्यक्षा उमा हिंगमिरे , जि .प.च्या सभापती निलमताई पाटील ,रविंद्र बेडकिहाळ ,प्रा. अशोक चव्हाण ,गोरख तावरे ,सचिन देशमुख ,सचिन शिंदे , मोहन कुलकर्णी , राजा मंगसुळींकर ,शरद गाडे, अमोल जाधव,

शिवसेनाप्रमुख यांचे दर्शन घडो !

इमेज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन देशातील जनतेला  लवकर घडो ! अनेकांचा श्वास त्यांना पाहण्यासाठी  थांबला आहे.तमाम जनता साहेबांचे खणखणीत बोल ऐकण्यासाठी आणि आशीर्वादासाठी मातोश्री बाहेर थांबली आहे.

लक्ष्मिपुत्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

इमेज
 लक्ष्मिपुत्र दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराड येथे १३नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.१२८पानांचा अंक आपल्या हाती देताना आनंद होत आहे.यावेळी लक्ष्मिपुत्र चे संपादक गोरख तावरे ,आनंदराव पाटील(नाना) , मदनराव भोसले(दादा ),पत्रकार  सचिन देशमुख ,देवदास मुळे ,बसवेस्वर चेणगे , 
HAPPY DIWALI.  दीपावली शुभेच्छा ! आपल्या जीवनात आनंद सदोदीत राहो,सुख -समृद्धी ,यश प्रत्येक क्षणी आपणास मिळत राहो ही सदिच्छा ! गोरख तावरे ,कराड  ९३२६७११७२१/ ९४२३५०२३५५ laxmiputra.krd@gmail.com

आदर्श पायवाट

इमेज
आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाले.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची सर्व नेत्यांनी कौतुक केले,आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्याचाच आदर्श ,संयमी ,शांत ,लोकहिताच्या पायवाटेने आमदार बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

दुर्गधी विचारांची लागण

कराड- घरगुती सिलेंडरची दरवाढविरोधात कराडमध्ये बी सी ,ओ बी सी सेलच्यावतीने निदर्शने करण्यात आली ,मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात पत्रकामध्ये मस्ती आल्यामुळे ,  निर्ढावलेल्या अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे केंद्र शासनाने घरगुती सिलेंडरची दरवाढ केली,सामान्य माणूस भरडून जात आहे म्हणून राज्यशासनाने १२ सिलेंडर देण्याची मागणी मंत्री अनिल देशमुख यांनी केली व अर्थंमन्त्री जयंतराव पाटील यांनी सहमती दर्शविली, मात्र निर्ढावलेल्या मुख्यंमत्र्यानी सहानुभूती दाखवली नाही असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भानुदास माळी यांनी केला आहे सांगा पाहू ,अशा राजकारणी लोकांना  जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावयाची आहे का ?फुकटची प्रसिद्धी हवी ?आपली उंची,आपले पद,म्हणजे जनतेच्या हक्कासाठी मिळालेली जहागिरी आहे?किहीही बोलले,कोणाबद्दलही अपशब्द वापरला तर आपणाला कोणी विचारणार नाही ?अशा खुळचट कल्पनेत वावरणारे ,खुशाल चेंडूं ,राजकीय लोकांना त्यांची जागा ,लायकी जनतेने दाखवायला पाहिजे .माळी नामक लोक  सुंदर बागेची,सुगंधी फुलांची काळजी घेतात ,पण हे माळी...
मराठी कलाकारांच्यासोबत यशवंतराव चव्हाण ,साहेबांच्या अनेक आठवणी आहेत .याची चर्चा व्हावी ,यशवंतराव साहेबांच्या आठवणी आमच्या मेलवर पाठवावेत - laxmiputra.krd@gmail.com
इमेज
नाठाळांच्या माथी. .... कराडचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे ,कृष्णा नदीवरील पुलाचे उदघाटन झाले ,लोकांची चांगली सोय झाली .पण ऐका पुलाचे दोनदा  उदघाटन कशासाठी ? याचे आकलन कराडकराना झाले नाही . श्रेयवादाचे राजकारण, मुख्यमंत्र्यांना विरोध ,का आणखी काय? याचा खुलासा झाला नाही .या झालेल्या राजकारणाचा लोकांच्यावर काहीही परिणाम झाला नाही .कराडचे राजकारण पाटणच्या दिशेने असे खेदाने म्हणावे लागेल . राज्याला ,देशाला नेतृत्व देणारं कराड. उलटया दिशेने प्रवास करीत आहे ,अशी लोक भावना निर्माण होत आहे .याचा सर्वानी  विचार करणे आवश्यक आहे .शांत ,संयमी ,पारदर्शक ,विचारी ,लोक भावनेचा आदर करणारी येथील राजकीय मंडळी आहेत .मग कुजके-नासके ,विकृत राजकारणाची पेरणी करणारी मंडळी धुतल्या तांदळासारखी आहेत असे नाही .झालेल्या घटनेतून चांगला बोध घ्यावा ,अन्यथा तुकारामांच्या .....नाठाळांच्या माथी ....प्रमाणे कराडकर उत्तर देतील. 
इमेज
जयवंत शुगरचा तृतीय गळीत हंगाम शुभारंभ झाला असून तीन लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.डॉ. सुरेश भोसले म्हणाले ,एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यांनी प्रयत्न करावा .डॉ.अतुल भोसले म्हणाले ,तारळी येथे आठ टी. एम.सी. चे धरणामुळे वीस हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. शेतकरी व लोकांचा फायदा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,सभासद व शेतकरी यांनी सहकार्य करावे .   
इमेज
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा करिष्मा कायम राहिला ,कारण राजकारणातही प्रामाणिकपणाने काम करता येते ,याचा आदर्श बाबांनी राज्याला घालून दिला आहे .यामुळे माध्यमांसमोर  खुल्या मनाने जातात ,टीकाटिप्पणी करण्यापेक्षा शासनाने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत ,ते आम जनतेपर्यंत जावेत  ,असा प्रयत्न  नेहमी बाबांचा असतो .
लक्ष्मिपुत्र नावाने आम्ही गेल्या चार वर्षापासून दीपावली अंक प्रकाशित करीत आहोत .लक्ष्मिपुत्र यावर्षी १६० पानाचा प्रकाशित करण्याचा मनोदय आहे.विविध विषयावर लेखण केलेल्या मित्रांनी दर्जेदार लेखन आमच्या ई -मेलवर पाठवावे .laxmiputra.krd@gmail.com
पत्रकारांवर ह्ल्ल्ये होतात हे निषेधार्थ आहे .बीड येथील पत्रकार संजय मालानी यांच्यावर झालेल्या हल्याचा प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध करीत आहोत .केवळ निषेधाने हा प्रश्न सुटणार नाही ,एस . एम .देशमुख हल्ल्याविरोधी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत .यात अद्याप फारसे यश आले नाही ,१६ पत्रकार संघटना असूनही शासन या पत्रकारांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष का करीत आहे ? याविषयावर गंभीरपणे पत्रकारांनी , पत्रकार संघटनानी विचार केलेला आहे असे मला वाटत नाही .संजय मालानी यांच्यावर हल्ला का झाला ? पत्रकार आणि पत्रकार संघटनांची  भीती ,दबाव राहिला नाही का ? शासन पत्रकारांवरील हल्ल्यची दखल घेत नाही ? या प्रश्नांचा शोध घेणे आवश्यक आहे .असे माझे मत आहे . टिळक -आगरकर यांची पत्रकारिता राहिली नाही , समाजप्रबोधन , लोकहित ,लोक चळवळ यांचा आणि पत्रकारितेचा दुरान्वेयेही संबंध राहिलेला नाही . गुंड वृत्तीचे लोक  पत्रकारावर हल्ला करण्याचे धाडसच कसे करतात ? आता एका हाताने टाळी वाजत नाही .माझे ते खरे म्हणण्यापेक्षा  खरे ते माझे म्हणावे हि समाजाची अपेक्षा  आह...

सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ

                                   सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ                                                      फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व  वृत्तपत्र जगात काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले आहेत .याची गोळा -बेरीज...
फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व  वृत्तपत्र जगात काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले आहेत .याची गोळा -बेरीज करावी असे मनापासून वाटते .सत्कार्याला साथ अन अन्यायाला लाथ या न्यायाने पत्रकारीता केली आहे .
कराड -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेकांना शंका होती कि ,राज्यातील प्रश्नाचा त्यांना अनुभव नाही ,आघाडीचे सरकार कसे चालविणार ? मात्र गेल्या दोन वर्षात जे निर्णय घेतले ,लोकांची कामे केली ,अनेक अडचणी आल्या त्याच्यावर बाबानी मात केली .आणि आपली क्षमता दाखऊन दिली आहे .यामुळे राजकारणातील मात्तबर अव्वाक झाली आहेत राजकीय निरीक्षकाना  हे कोडे लवकर उलघडले नाही. म्हणून थोडे सोपे करून सांगतो आहे , कराडच्या मातीचा गुण हा प्रामाणिक ,पारदर्शक ,निस्वार्थी काम करण्याचा  आहे .सुधारककार गोपाळ गणेश आगरकर ,यशवंतराव चव्हाण यांची नावे अभिमानाने घेतली जातात .अशा महान विभूतीनच्या कर्मभूमीतील पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आहेत .जनहितासाठी चांगले निर्णय घेताना मागे हटत नाहीत .मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण( बाबा )राज्याला मिळालेली देणगी आहे असे  म्हटल्यास वावगे होणार नाही .
इमेज
दिल्लीतील फोटो - फिरावयास गेल्यानंतर माझा मित्र विश्वास शिंदे आणि मी
रंगात खेळताना रक्तात हात ओले .... त्या ओलेपणाचा अपराधी मीच माझा ... सांगू कुणाला गुन्हा काय झाला ....रंगात बेहोश होऊनी खेळ मीच केला ...केला तर केला तुझ्या बापाचे काय गेले ...केला गुन्हा मी जाहीरही केला ...                                                                                                                                    ...

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या सारखी सडेतोड ,प्रामाणिक ,बुद्धिवादी पत्रकारिता करणे गरजेचे आहे ,परंतु पत्रकारीता सध्या व्यावसाईकपने केली जात आहे .यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे .स्वहिताला महत्व देणारी माणसं पत्रकारितेत आल्यानंतर आणि वृत्तपत्राचे मालक ,संपादक त्याच वळणाची असल्यावर काय करायचे ?या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा घेऊन कराडमधून गेली २५ वर्ष प्रामाणिक पत्रकारीता करीत आहे .सुधारककार आगरकर कराडचे याचे पूर्ण भान असणारी कराडमधील पत्रकार आहेत .हि आनंदाची बाब होय .मात्र ,याला काही अपवाद आहे व्यावसाईक पत्रकारितेचे नाव देऊन नालायक,बदमाश, स्वहिताचा विचार करून पत्रकारितेला बदनाम करीत आहेत .आमची भूमिका सकारात्मक पत्रकारिता करणारे मित्राच्या पाटीशी उभे राहणे ,अशी आहे