पोस्ट्स

सातारा जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला शकीला शेख ही 89 बटालियनमध्ये दाखल

इमेज
सातारा जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला शकीला शेख ही 89 बटालियनमध्ये दाखल  शकीला शेख याचे आज कोळे गावांमध्ये जंगी स्वागत करत मिरवणूक मोठ्या उत्साहात कराड (लक्ष्मीपुत्र) - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली.  2019 मध्ये कोरोनोचा प्रादुर्भाव वाढल्याने रिझल्ट दोन वर्षे पुढे करण्यात आले.व तोच रिझल्ट जानेवारी 2021 मध्ये लागला, आणि कोळे येथील शकीला शेख उत्तीर्ण झाली, त्याच बरोबर मार्च 2021 मध्ये जोईनिंग लेटर प्राप्त झाले. जोईनिंग लेटर प्राप्त होताच रिपोर्टिंगसाठी (ट्रेनिंग) पंजाबला बोलवण्यात आले. 1 एप्रिल 2021 मध्ये पंजाबमध्ये ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण करून 89 बटालियनमध्ये पंजाब येथे पोस्टिंग मिळाले आणि पंधरा दिवसांच्या सुट्टीवर बारा महिन्यांनी शकीला शेख ही आपल्या कर्मभूमी कोळे येथे परतली.आणि कोळेगावच्या आन-बान-शानमध्ये एक मानाचा तुरा रोवला गेल्याने शकीला शेख हिची सर्व धर्म समभाव अशी ओळख असलेल्या कोळेगावांमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात...

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल

इमेज
काँग्रेसचे एन. पाटील यांच्यासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल सूनेला शिवीगाळ, मारहाण करत 1 कोटीची मागणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड (लक्ष्मीपुत्र) - कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा व मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेला शिवीगाळ करून मारहाण करत 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौ. आदिती राजेश पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सौ. आदिती राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरे व नणंद यांनी संगनमत करुन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात ग...

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

इमेज
कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल कराड (लक्ष्मीपुत्र) :- कराड शहरात लावलेल्या हार्दिक अभिनंदन फलक संदर्भात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी झाल्यानंतर उमेश आनंदराव शिंदे यांनी कराड शहरातील विविध भागात हार्दिक अभिनंदनांचे फलक लावले होते. हे फलक लावताना कराड नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान याबाबत कराड नगरपरिषद प्रशासनाने उमेश शिंदे यांना नोटीस बजावून याबाबत खुलासा मागितला होता. अखेर आज सोमवार दिनांक 12 जुलै रोजी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.  कराड शहरात वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड, शुभेच्छा फलक लावणेस जनरल कमेटी ठराव क्रमांक 11/264 दिनांक 17/01/2019 अन्वये बंदी घालण्यात आलेली आहे. उमेश शिंदे (अध्यक्ष अतुल भोसले युवा प्रतिष्ठान) यांनी फ्लेक्स बोर्ड अनाधिकृतपणे व विनापरवाना लावल्याने त्यांना पाच जुलै रोजी नोट...

सही करताना हाताला लकवा भरतोय का ?

इमेज
सही करताना हाताला लकवा भरतोय का ?   स्वच्छ व सुंदर कराडला केवळ "सही"मुळे गालबोट लावण्याचा कृतघ्नपणा  कराड (लक्ष्मीपुत्र) :- पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना  अनेक फाईलींवर पृथ्वीराज चव्हाण सही करत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, सही करताना हाताला लकवा भरतोय का ? वास्तविक अशीच परिस्थिती कराडच्या नगराध्यक्षांची झाली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक नगराध्यक्षा का सही करत नाहीत ?  त्यामुळे त्यांना कोणता प्रश्न, कोणी विचारावा, असा प्रश्नच निर्माण झाला आहे.  केवळ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी घंटागाडी निविदा प्रक्रियेच्या फाईलवर सही न केल्यामुळे आज कराड शहरातील कचरा उचलला गेला नाही. तर याला केवळ नगराध्यक्षाच जबाबदार असल्याचे लोकभावना निर्माण झाली असून आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी आरोग्याचा प्रश्न भीषण होऊ नये, यासाठी आज सकाळपासून याबाबत सजगता दाखवली.  कराडमधील स्वच्छतेसाठी ठेकेदार नियुक्त केला जातो. पहिल्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेक...

पत्रकारांचा वाटाडय़ा - गोरख तावरे

इमेज
  दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार व प्रसारमाध्यम साप्ताहिक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांचा आज वाढदिवस. कराडमध्ये गेली 30 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करणारे गोरख तावरे हे दैनिक "सामना"च्या रोखठोक शैलीतील आहेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी "सामना"मध्ये पत्रकारितेस प्रारंभ केला. तत्पूर्वी स्थानिक दैनिकांतून ते पत्रकारिता करत होते. सामनाच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता बहरली. सामनात त्यांची वार्तापत्रे ही सातारा जिल्हय़ाच्या राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण करत असायची. लिहताना हयगय करायची नाही. नाठाळांच्या माथी हाणू काठी या उक्तीनुसार गोरख तावरेंनी पत्रकारितेत वाटचाल केली. आपले स्वत:चे दैनिक असावे, या इच्छेने त्यांनी  राजसत्य या साप्ताहिका ची  निर्मिती केली. या माध्यमातून कराड शहरासह जिल्हय़ातील वृत्त प्रसारित केले. याबरोबरच लक्ष्मीपूत्र हे दैनिक ही सुरू केले.   छोटे, लहान वृत्तपत्र चालवताना गोरख तावरे यांना या वृत्तपत्रांच्या अडचणी लक्षात आल्या. साखळी, बडय़ा वृत्तपत्रांच्या ताकदीपुढे छोटय़ा वृत्तपत्रांचा निभाव ...

कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात प्रथम..सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचाचा सन्मान

इमेज
  कराड  - स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आल्याची घोषणा केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाला आहे. मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक मिळवला. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या अनुषंगाने कराड शहरात विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर सर्वेक्षण सर्वेक्षणच्या अनुषंगाने...

कराडची आण-बाण-शान राहीली पाहिजे

इमेज
जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये "किंतू" नको....येणारा अधिकारी वादात नको येणाऱ्या काळात नगरपालिकेची सत्ता हवी म्हणून बदलीचा आटापिटा                  कराड (लक्ष्मीपुत्र) - नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी भुसावळ येथे असणारे रमाकांत डाके यांना नेमणूक देण्यात आले आहे. यशवंत डांगे यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र यशवंत डांगे यांची कामकाज पद्धती व कार्यक्षमपणा लोकप्रतिनिधींना पसंत पडला नाही. इतकेच काय मंत्रालय स्तरावर "प्रतिष्ठापणाला लावून अखेर यशवंत डांगे यांच्या मुदत वाढीचा आदेश रद्द करून नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून रमाकांत डाके यांच्याकडे पदभार द्यावा. यासाठी ठरावीक महाशयांनी प्रतिष्ठापणाला लावून फारच आटापिटा केला आहे. येणाऱ्या काळात या "प्रतिष्ठित" गटाला कराड नगरपालिकेची सत्ता हवी बर का ? याचसाठी केला बदलीचा अट्टाहास.                   शासकीय अधिकारी आहे. म्हटल्यावर बदली होणारच. यात वेगळेपण असे काहीच न...

मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करावी अन्यथा कोरोना काळात आंदोलन

इमेज
मुदतवाढीने "कोरोना"कामाची शाब्बासकी नंतर १७ दिवसात बदली "कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा बदली मुदतवाढ पुन्हा बदली शासनाचा अजब कारभार            कराड (लक्ष्मीपुत्र) - कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुदतवाढ मिळूनही अचानक झालेली बदली रद्द करावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.कोरोना काळातही याचे तीव्र पडसाद उमटतील व नाईलाजाने कराडकरांना शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक विश्वनाथ ढापरे यांनी दिला आहे."कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा १७ दिवसात बदली करण्यात आली असल्याने शासनाचा अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे.            २३ जुलै रोजी शासन आदेशानुसार कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना शासन आदेश एमसीओ- २०२०/प्र,क्रमांक ४९/नवि १४(७१) व १४(५७) दि,७/७/२०२० नुसार एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या अवघे राज्य कोरोना या भीषण साथीशी मुकाबला करत आहे. या साथी मध्ये कराड शह...

पाटणमध्ये विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरू

इमेज
              मोरगिरी (लक्ष्मीपुत्र) दिपक मांडावकर -  पाटण शहरातील सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसत आहेत. यातून होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण आणत कोरोनाचा संभाव्य पादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व नगरपंचायतीने कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे. आज रविवारी पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात पुन्हा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पोलिस आणि नगरपरिषदेने कारवाईची भुमीका सुरु कसली आहे.                पोलिसांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली असून अनेक नागरिक पाटणमध्ये खरेदीसाठी येत असतात.  सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणे, मास्क न घातलेल्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देणे, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून घेणे, अशांवर ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. चौकट -   व्यवसायिकांन...

कोळेमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार

इमेज
कोळे गावात कोरोनाला प्रवेश करता आला नाही याचा मला अभिमान               कराड (लक्ष्मीपुत्र) - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत राजेंद्र चव्हाण व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावतीने कोळे (ता.कराड) येथे युवा नेते इंद्रजीत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्या शुभहस्ते कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या टिमचा प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.               यावेळी कोरोना कमिटीचे अध्यक्ष व सरपंच सौ.सुष्मा राजेंद्र कांबळे, उपसरपंच अशोक शिनगारे, ए.पी.आय गणेश कड, पोलीस पाटील सौ. सुप्रिया महेंद्र देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अस्लम देसाई, ग्रामविकास अधिकारी माने, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तडाके व त्यांचे सर्व सहकारी, मंडल अधिकारी दी...