पोस्ट्स

मार्च, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"सह्याद्री"च्या गुलालानंतर "कृष्णा"ची रणधुमाळी सुरू

सामना - 25/3/2015 (गोरख तावरे) कराड उत्तरमधील "सह्याद्री"सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमदार बाळासाहेब पाटील यांच्याच हाती कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी सभासदानी घेतला आहे."सह्याद्री"चा गुलाल हे बेरजेच्या राजकारणाचा व यशवंतराव चव्हाण व पी.डी.पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील नेतृत्वावरील विश्वास आहे.दरम्यान दक्षिणमधील "कृष्णा"साखर  कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे.गटा-तटात व सग्यासोय-यातील आता धुमचक्री सुरू होणार आहे.सत्ताधारी अविनाश मोहिते असून मदनदादा माहिते,डाॅ.इंद्रजीत मोहिते आणि डाॅ.अतुल भोसले,माजी आमदार विलासकाका पाटील अशा तीन पॅनेलमध्ये सत्ता संघर्ष होण्याची शक्यता आहे. "सह्याद्री" शांत झाला असून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. तिरंगी लढत निश्‍चित मानली जात आहे. यासाठी कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.भौगोलीक परिस्थिती विभिन्न् असली तरी शेतकरी सभासदांच्या हितासाठी आमदार व ताकदवान राजकीय नेते "कृष्णा"च्या आखाड्यात उतरत अ...

कराडचा कलंक पुसायचाय - पृथ्वीराज चव्हाण

कराड दि.23(सावा)संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कराडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहू कराड दि.23(सावा)संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कराडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे असे मत माजी मुख्यमंत्री,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड शहर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कराडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कराडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्य...

सह्याद्रीची सांगता सभा

कराड-केंद्र व राज्य सरकार साखर उदयोगाला मदत करत नाही.साखर कारखानदारी अडचणीत आहे.ऊसाला दर मागणारे आता देणारे झाल्याने शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या आहेतःआमदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी पी.डी.पाटील पॅनलचा प्रचार सांगता सभा मसूर (कराड) येथे पार पडली.आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा घेवून विरोधकांच्या आरोपांची उत्तरे दिली.तर काहींचा खरपूस समाचारही घेतला.माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार आमदार आनंदराव पाटील यांनी पी.डी.पाटील पॅनलला पांठीबा तर दिलाच आहे.पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मसूरच्या सभेला उपस्थितीत राहून त्यांनाही विरोधकांच्या कामकाजावर आसूड ओडले. 17 मार्चला मतदान होणार असून 19 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

सोपानराव घोरपडे यांचा सन्मान होणार

कराड - गंगारामजी गुजर उर्फ भाई यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त स्वा.सै.सोपानराव घोरपडे यांना "स्वा.सेनानी भाई गुजर पुरस्कार" देवून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे डाॅ.अशोक गुजर यांनी सांगितले. डाॅ.दौलतराव आहेर काॅलेज ऑफ इंजिनिअरींग,बनवडी-कराड येथे 15मार्च रोजी 11 वाजता समारंभ होणार आहे.

महाराष्ट्राला गरज स्वतंत्र पत्रकारिता विद्यापीठाची

पत्रकारितेचे सर्वोच्च शिक्षण घेवून या क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करणारे अनेक इच्छुक तरुण या महाराष्ट्रात आहेत. पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवानारे १९ विद्यापीठ महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, या विद्यापीठांच्या अंतर्गत शंभरपेक्षा अधिक महाविद्यालये आणि अभ्यासकेंद्रतुन पत्रकारिता पदविका,पदवी आणि पदविवोत्तर स्तरावरचे शिक्षण दिले जाते. विद्यापीठातील पत्रकारिता शिक्षण अभ्यासक्रमास अनुदान आहे, परंतू राज्यातील १९ विद्यापीठा अंतर्गत पत्रकारिता अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान उपलब्द नाही. तंत्र विद्यापीठ,कृषी विद्यापीठ,कायदा (लॉ) विद्यापीठ,आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासह महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ” स्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी अनेक वेळा शासनाकडे मागणी केली आहे. पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी, पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये व...

"सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग

दैनिक सामना   13/3/2015-गोरख तावरे "सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग कराड दि.11(सावा)सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आदरणीय पी.डी.पाटील पॅनेलला म्हणजे सत्ताधारी गटाला   ‘कपबशी’ तर यशवंतराव चव्हाण शेतकरी पॅनेलला ‘विमान’ चिन्ह मिळाले आहे.सत्ताधारी व विरोधकांनी प्रचार सभांवर जोर दिला आहे. १७ मार्चला मतदान व 19 मार्चला निकाल लागणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील हे शांत व संयमाने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. साखर कारखान्यांची निवडणूक असूनही दोन्ही बाजूने आक्रमक प्रचार केला जात नाही पण आपली भूमिका व शेकत-यांचे हित कसे पाहतो ?हे मुद्दे सभासदांपर्यंत कसे पोहचतील हे पाहिले जात आहे.आ. बाळाहेब पाटील यांचे पारंपारीक विरोधक पहिल्यांना एकत्र आले आहेत. प्रस्थापितांविरोधात दंड थोपटणारांमध्ये धैर्यशील कदक,मनोज घोरपडे,विठ्ठतात्या जाधव आणि लालासाहेब यादव हे चार नेते सह्याद्रीचे कार्यक्षेत्रात प्रचारसभांच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत. पी.डी.पाटील पॅनेलला आमदार बाळासाहेब पाटील यांचा चेहरा आहे तर यशवंतराव चव्हाण पॅनेलला ...