पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रकारांचा वाटाडय़ा - गोरख तावरे

इमेज
  दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार व प्रसारमाध्यम साप्ताहिक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांचा आज वाढदिवस. कराडमध्ये गेली 30 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करणारे गोरख तावरे हे दैनिक "सामना"च्या रोखठोक शैलीतील आहेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी "सामना"मध्ये पत्रकारितेस प्रारंभ केला. तत्पूर्वी स्थानिक दैनिकांतून ते पत्रकारिता करत होते. सामनाच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता बहरली. सामनात त्यांची वार्तापत्रे ही सातारा जिल्हय़ाच्या राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण करत असायची. लिहताना हयगय करायची नाही. नाठाळांच्या माथी हाणू काठी या उक्तीनुसार गोरख तावरेंनी पत्रकारितेत वाटचाल केली. आपले स्वत:चे दैनिक असावे, या इच्छेने त्यांनी  राजसत्य या साप्ताहिका ची  निर्मिती केली. या माध्यमातून कराड शहरासह जिल्हय़ातील वृत्त प्रसारित केले. याबरोबरच लक्ष्मीपूत्र हे दैनिक ही सुरू केले.   छोटे, लहान वृत्तपत्र चालवताना गोरख तावरे यांना या वृत्तपत्रांच्या अडचणी लक्षात आल्या. साखळी, बडय़ा वृत्तपत्रांच्या ताकदीपुढे छोटय़ा वृत्तपत्रांचा निभाव ...

कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात प्रथम..सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचाचा सन्मान

इमेज
  कराड  - स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आल्याची घोषणा केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाला आहे. मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक मिळवला. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या अनुषंगाने कराड शहरात विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर सर्वेक्षण सर्वेक्षणच्या अनुषंगाने...

कराडची आण-बाण-शान राहीली पाहिजे

इमेज
जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये "किंतू" नको....येणारा अधिकारी वादात नको येणाऱ्या काळात नगरपालिकेची सत्ता हवी म्हणून बदलीचा आटापिटा                  कराड (लक्ष्मीपुत्र) - नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी भुसावळ येथे असणारे रमाकांत डाके यांना नेमणूक देण्यात आले आहे. यशवंत डांगे यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र यशवंत डांगे यांची कामकाज पद्धती व कार्यक्षमपणा लोकप्रतिनिधींना पसंत पडला नाही. इतकेच काय मंत्रालय स्तरावर "प्रतिष्ठापणाला लावून अखेर यशवंत डांगे यांच्या मुदत वाढीचा आदेश रद्द करून नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून रमाकांत डाके यांच्याकडे पदभार द्यावा. यासाठी ठरावीक महाशयांनी प्रतिष्ठापणाला लावून फारच आटापिटा केला आहे. येणाऱ्या काळात या "प्रतिष्ठित" गटाला कराड नगरपालिकेची सत्ता हवी बर का ? याचसाठी केला बदलीचा अट्टाहास.                   शासकीय अधिकारी आहे. म्हटल्यावर बदली होणारच. यात वेगळेपण असे काहीच न...

मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करावी अन्यथा कोरोना काळात आंदोलन

इमेज
मुदतवाढीने "कोरोना"कामाची शाब्बासकी नंतर १७ दिवसात बदली "कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा बदली मुदतवाढ पुन्हा बदली शासनाचा अजब कारभार            कराड (लक्ष्मीपुत्र) - कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुदतवाढ मिळूनही अचानक झालेली बदली रद्द करावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.कोरोना काळातही याचे तीव्र पडसाद उमटतील व नाईलाजाने कराडकरांना शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक विश्वनाथ ढापरे यांनी दिला आहे."कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा १७ दिवसात बदली करण्यात आली असल्याने शासनाचा अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे.            २३ जुलै रोजी शासन आदेशानुसार कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना शासन आदेश एमसीओ- २०२०/प्र,क्रमांक ४९/नवि १४(७१) व १४(५७) दि,७/७/२०२० नुसार एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या अवघे राज्य कोरोना या भीषण साथीशी मुकाबला करत आहे. या साथी मध्ये कराड शह...

पाटणमध्ये विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरू

इमेज
              मोरगिरी (लक्ष्मीपुत्र) दिपक मांडावकर -  पाटण शहरातील सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसत आहेत. यातून होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण आणत कोरोनाचा संभाव्य पादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व नगरपंचायतीने कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे. आज रविवारी पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात पुन्हा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पोलिस आणि नगरपरिषदेने कारवाईची भुमीका सुरु कसली आहे.                पोलिसांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली असून अनेक नागरिक पाटणमध्ये खरेदीसाठी येत असतात.  सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणे, मास्क न घातलेल्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देणे, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून घेणे, अशांवर ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. चौकट -   व्यवसायिकांन...

कोळेमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार

इमेज
कोळे गावात कोरोनाला प्रवेश करता आला नाही याचा मला अभिमान               कराड (लक्ष्मीपुत्र) - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत राजेंद्र चव्हाण व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावतीने कोळे (ता.कराड) येथे युवा नेते इंद्रजीत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्या शुभहस्ते कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या टिमचा प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.               यावेळी कोरोना कमिटीचे अध्यक्ष व सरपंच सौ.सुष्मा राजेंद्र कांबळे, उपसरपंच अशोक शिनगारे, ए.पी.आय गणेश कड, पोलीस पाटील सौ. सुप्रिया महेंद्र देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अस्लम देसाई, ग्रामविकास अधिकारी माने, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तडाके व त्यांचे सर्व सहकारी, मंडल अधिकारी दी...

अन्यायकारक व भरमसाठ वीज बिल विरोधात आंदोलन करू - फत्तेसिंह पाटणकर

इमेज
             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - कोरोना प्रादुर्भावाच्या तीन महिन्याच्या काळात राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवण्यात आली. आता ज्या भागात शासनाने परवानगी दिली आहे त्या भागात तीन महिन्यांचे प्रत्यक्षात रिडींग घेऊन नागरिकांना बिले पाठवण्यात आली आहेत. ती बिले आकारताना त्यात जुनी बिले भरलेली रक्कम वजा न करण्यात देण्यात आल्याने भरमसाट बिले आली असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.                कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशातच एकदम तीन महिन्याची वीज बिले आल्यामुळे ही एकरक्कमी रक्कम भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झालेली आहे. इकडे ही समस्या असताना दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांची सुद्धा तीच अवस्था आहे. गेले तीन महिने उद्योग बंद असताना सुद्धा त्यांच्याकडून भरमसाठ वीज बिले आकारण्यात येत आहेत, आणि त्यामुळे त्यांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. घरगुती ग्राहक आणि उद्योग यांच्या ...
इमेज
कुसरुंड गावातील युवकांकडून लॉकडाऊनकाळात सामाजिक कार्य               मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - संघर्ष ग्रुप कुसरुंड कोळेकर वाडी येथील युवकांनी लॉकडाउनच्या काळात शाळा परिसर, मंदिर परिसर, कोळेकर वाडी वस्ती येथे झाडे लावून परिसर स्वच्छ, पाण्याची टाकी स्वच्छ करून, अनेक प्रकारची कामे करून सामाजिक कार्य केले आहे.              दरवर्षी महराष्ट्राचे धाकले धनी. छ. धर्मवीर संभाजीराजे भोसले जयंती होते. त्या दिवशी वर्षभर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामे कोणती करायची याचे नियोजन होते. आत्ता सध्या तर कोरोना असल्यामुळे संचार बंदीचे नियम पाळून ग्रुप ने भरपूर कामे केली आहे.             संघर्ष ग्रुप कुसरुंड चे माजी अध्यक्ष श्री. किरण चोपदार, अध्यक्ष कु. गणेश चोपदार यांच्या अध्यक्षतेखाली  देवस्थान नाईकबा जवळील साफसफाई करून फुल झाडें लावली आहेत.              कुसरुंड गावातील श्री. मळाई देवी देवस्थान , श्ना.नाईकबा देवस्थान, श्री.मारुती देव...

हुपरी महावितरण कंपनी तक्रार निवारण अधिकारी नेमणार

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनाला यश            हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - हुपरी शहर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेस आणि हातकणंगले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनाला उत्तर देतांना सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब यांनी तसे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना दिले.              लॉकडाऊन काळातील घरगुती वीज वापराची बिले वाढून आल्यामुळे ग्राहकांच्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या विषई असणारी नाराजी व असंतोष याचा विचार करुन ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज हुपरी वीज वितरण कंपनीकडे निवेदन देण्यात आले.               यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ म्हणाले की, ग्राहकाला काम नाही. त्याच्या 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. आणि अवाच्या सव्वा बिले पाठवून ग्राहकाचे कंबरडे मोडले आहे.वितरण कंपनीने सदरची बिले दुरुस्त करून द्यावीत व बिले भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. वीज जोडणी तोडण्यात ...

महावितरण कंपनीचा ग्राहकांना मनस्ताप

इमेज
  ग्राहकांची पिळवणूक थांबवावी - एकनाथ बागडी                कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. महावितरण कंपनी मनमानी कारभार करत असल्याने बीलामुळे ग्राहकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे.              महावितरणने अंदाजे रिडिंग घेऊन बिले देण्यापेक्षा चालू रीडिंग बिले घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. वाढीव विज बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कर...

सर्वसामान्यांचा असामान्य नगरसेवक मोहसीन आंबेकरी

इमेज
श्रावणबाळ योजनेमधून 29 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप..... 390 पेक्षाही जास्त महिलांना पेन्शन सुरू                कराड (लक्ष्मीपुत्र) - संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेमधून वार्ड क्रमांक 14 मधील गरीब, गरजू व निराधार 29 महिलांना सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी व नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नाने पेन्शन चालू करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम झाल्याने निराधार महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.             अनेक गरीब, गरजू व निराधार महिलांना पेन्शन मिळवून देण्यास नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आले असून श्रावण योजनेमधून शासन मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप महिलांना करण्यात आले.              गरजू व निराधार महिलांना श्रावणबाळ योजनेमधून पेन्शन चालू करून आत्तापर्यंत 390 पेक्षाही जास्त लोकांना याचा लाभ गोरगरीब लाभार्थींना पोहोचवले असून औषधोपचार, प्रवास, जीवनावश्‍यक वस्तूंना नक्कीच याचा हातभार लागतो आहे याचा मला मनापासून आनंद होत असून ह...

सातारा जिल्ह्यात २८ जून पासून सलून पार्लर चालू करणार

इमेज
स्वाभिमानी नाभिक संघटनेचा एल्गार                 मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - कोरोनाच्या  संकटकाळात व्यवसायिकांची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली आहे. या सर्व व्यवसायिकांनी नवीन दुकान टाकले आहेत त्यांचा तोटा मोठ्या प्रमाणात झाला आहे. लपून छपून व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःची व गिऱ्हाइकांची काळजी घेऊन व्यवसाय चालू करण्यासाठी 28 जून पासून सलून पार्लर चालू करणार आहेत.                स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मा मुख्यमंत्री साहेब यांना  निवेदन  सातारा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे शुक्रवार दि. १२ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुक आंदोलन करुन राज्य अध्यक्ष मा श्री शंकरराव गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हा अध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या उपस्थित निवेदन दिले आहे. व सोमवार दि.१५ जून रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार साहेब यांच्या द्वारे  मुख्यमंत्री साहेब यांना निवदने देण्यात आली. तरी आजपर्यंत सरकारने काहीही निर्णय घेतला ना...

कोयना नदीपात्रात बोट चालविण्याचे पथकांना प्रशिक्षण

इमेज
             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - गतवर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवल्याने अनेक गावे पाण्याने वेढली होते. पाटण शहरासह तालुक्यातही पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बोट उपलब्ध नसल्याने बाहेर काढणे कठीण झाले होते. गतवर्षाची पुनरावती यावर्षी उद्‌भवू नये म्हणून ज्या ज्याठिकाणी आपत्ती उद्‌भवते तेथे जिल्हात बोटी देण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यालाही अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दोन बोटी देण्यात आल्या असून बोटी चालवणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.              सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पाटण तालुक्याला आपत्कालीन बोटी व लाईफ जॅकेट देऊन सोमवारी पाटण येथील कोयना नदीमध्ये त्याचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, नायब तहसिलदार प्रशांत थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सपोन...

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

इमेज
कराड नगरपालिका प्रभाग समितीच्या बैठकीत  निर्णय                कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवाव्यात,  असा निर्णय प्रभाग समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे आदेश काढतील.                सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये कराड नगरपालिका शहर स्तरीय सुकाणू समिती व प्रभाग समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स आशा स्वयंसेविका, शहर नागरी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व डॉक्‍टर्स उपस्थित होते.                परराज्यातील मजूर तसेच प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही प्रमाणपत्रे सरकारी दवाखान्यात शिवा...

सातारा तब्लिग जमातीने उच्चांकी रक्तदान करित आदर्श निर्माण केला - महेश भोसले

इमेज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानास प्रतिसाद  बालाजी ब्लड बँक व अक्षय ब्लड बँकेच्यावतीने मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान                सातारा (लक्ष्मीपुत्र) - सातारा तब्लिग जमातीने सातारा जिल्ह्यातील रक्तदानाचा आजपर्यंतचा उच्चांक केला असून सातारा तब्लिग जमातीच्या रक्तदानामुळे थायलेसेमिया व इतर रुग्णांना बलिदान मिळाले आहे. 630 जणांनी रक्तदान करत सातारा तब्लिग जमातीचे कार्य हे इतरांसाठी आदर्शवत आहे, अश्या शब्दात बालाजी ब्लड बँकेचे व्यवस्थापक महेश भोसले यांनी सातारा तब्लिग जमातीचे कौतुक केले.             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी व अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी लाईव्ह मुलाखतीद्वारे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा तब्लिग जमातीचे अमिरसहाब अनिसभाई तांबोळी यांनी हाजी जलालूद्दीन सहाब रहेमतुल्लाही अलईही यांच्या स्मृति प्रित्यर्थ सातारमधील गेंडामाळ कब...

'चिनी बनावटीच्या वस्तूंवर अवलंबून राहू नका, स्वदेशी वापरा'

'क्रेडाई'तर्फे सदस्यांना आवाहन               कराड (लक्ष्मीपुत्र) - गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करीत आणि आपण देशासोबत एकजुटीने उभे आहोत हे दर्शवीत, क्रेडाई या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेने आपल्या सदस्यांना, चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर अवलंबून न राहता स्वदेशी उत्पादनांवर भर द्या, असे आवाहन केले आहे. देशभरातील 20 हजार विकसकांचे प्रतिनिधित्व ही संस्था करते.                या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना, 'क्रेडाई नेशनल'चे अध्यक्ष सतीश मगर म्हणाले, “आमचे सदस्य असणाऱ्या विकसकांना आम्ही आवाहन करतो, की त्यांनी चिनी वस्तूंवर अवलंबून न राहता, स्वदेशी' किंवा 'मेड इन इंडिया' ही संकल्पना आपल्या जीवनशैलीत व व्यवसायात अंगिकारावी. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित सर्व 250 उद्योगांनीदेखील, सध्या चीनमधून आयात होणारी उत्पादने स्थानिक पातळीवरच तयार करावीत आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांना आम्ही करीत आहोत.     ...

20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

इमेज
20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह             कराड (लक्ष्मीपुत्र) -  रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.             यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.             कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय  पुरुष.             पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.               फलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक.              खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.     ...

पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर

इमेज
पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर              मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ  पाटण ते काहीर रस्ता ग्रा. मा. 212 कि. 0/00ते  8/500km ची दुरूस्ती करणे ता. पाटण जि. सातारा ऑनलाईन टेंडर नं. 52395 निविदा क्र B. 1/अ. अ. 8/2016-2017 वर्क ऑर्डर आदेश 5/10/2016 रोजीचा आहे. व हे काम 26/12/2018 ला फायनल केले आहे. व प्रत्यक्षात पैसे मिळायला फेब्रुवारी 2020 रोजी उजाडला असल्याने बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.                 सदर काम करण्यासाठी एक वर्षाची मुदत असताना चार वर्ष लागतात लागत असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. त्यामुळे या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा रंगली आहे. मा.गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यात एकमेव पाटण तालुक्यात 180 कोटीची भरीव विकास कामे केली आहेत. परंतु अधिकारीवर्ग स्वतःच्या स्वार्थापोटी विकासाला रोखण्याचे काम करत असल्याचे उघड झाले अाहे. या अधिका...

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक

इमेज
आजच्या 8 रूग्णांसह आत्तापर्यंत एकूण 206 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज                  कराड (लक्ष्मीपुत्र) - सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे.                  दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिट...

कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी श्री हॉस्पिटल समोरील जागा

इमेज
कराड पालिका विशेष सभेत निर्णय            कराड (लक्ष्मीपुत्र) - गतवर्षीच्या महापुरात कुंभार समाजाचे गणेश मूर्ती बनवताना लाख रुपये नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवासाठी शहरातील कुंभार समाजाला मंगळवार पेठेतील श्री हॉस्पिटल समोरील सुमारे एक एकर मोकळी जागा देण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी करण्यात आला. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.               कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी कोयना नदीकाठी बालाजी मंदिर समोरचे मैदान देण्यात येत होते. मात्र गतवर्षी महापुरामुळे येथील गणेश मूर्ती तसेच कच्च्या मालाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर संत शिरोमणी गोरोबाकाका समाज मंडळाच्या वतीने नगरपालिकेस पत्र देण्यात आले होते  या पत्रात समाजाला दरवर्षी मूर्ती बनवण्यासाठी देण्यात येणारी जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत या बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.               श्री हॉस्पिटल समोर नगरपाल...
इमेज
येराड (बनपेठ) येथे विजेचा शॉक लागून म्हैस ठार          मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) -  बनपेठ (ता. पाटण) येथील पांडूरंग गणपती साळुंखे यांच्या म्हैशीसह मुलगा व पत्नीस वीजेचा शाॅक लागून दहा महिन्याची गाभण म्हैस जागेवर मरण पावली आहे. तर पत्नी व मुलगा या दोघांना विजेच्या झटक्याने दुर फेकले गेले. गत अनेक वर्षापासुन धोकादायक स्थितीत असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे अनेकांना शाॅक लागला असुन याबाबत वीज कार्यालयाला वारंवार सांगूनही याकडे  दुर्लक्ष केले आहे.           याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,   पांडुरंग साळुंखे यांची पत्नी सुनंदा साळुखे (वय 46) व मुलगा श्रीराम (वय 23) हे म्हैशीला चरायला रानात घेऊन जात होते. हे गणेशनगर येथील ट्रान्सफार्मर पासुन सुमारे दहा फुट अंतरावरून जात असताना अचानक या तिघांना वीजेचा शाॅक लागला. यामधे दहा महिन्याची गाभण असलेली म्हैस जागेवरच मरण पावली, तर सोबतच्या दोघांना वीजेचा शाॅक लागुन विजेच्या झटक्याने ते दुर फेकले गेले. यावेळी रस्तावरून जाणार्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उप...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ

इमेज
शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे वाटप               कराड (लक्ष्मीपुत्र) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे होळीचागाव तालुका खटाव येथील महेंद्र नारायण देशमुख व प्रशांत शिवाजी शिंदे यांच्या शेतावर आंबा फळबाग लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते  करण्यात करण्यात आला.              तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  हनुमंत सुखदेव भोसले यांच्या शेतावर गांडूळ खत युनिट या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री भोसले यांच्या बांधावरच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजने मधून व आत्मा योजनेमधून प्रात्यक्षिकासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना बियाणे वाटप  करण्यात आले .             याप्रसंगी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव व मंडळ कृषी अधिकारी मायणी दिलीप दाभाडे, भाऊसाहेब लादे माजी उपसभापती पंचाय...

कराड पालिकेचा नारा वेस्ट टू वेल्थ

इमेज
बारा डबरेत साकारतंय टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, निर्मिती आणि संशोधन केंद्र                  कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गंत बारा डबरे येथे थीम पार्कची निर्मिती केली आहे. येथे ओल्या व सुक्या कचऱयावर प्रक्रिया होणार आहे. याबरोबरच वेस्ट टू वेल्थ धोरण राबवले आहे. सुक्या कचऱयातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी उभारलेल्या 600 चौरस मीटर आकाराच्या शेडच्या क्राँक्रिटीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाला. या शेडमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, निर्मिती आणि संशोधन केले जाणार आहे. याबरोबरच त्याचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.                 काँक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, विरोधी गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक बाळासाहेब यादव, गजेंद्...

संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या - ना. नरेंद्र पाटील

इमेज
माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा               मुंबई (लक्ष्मीपुत्र) - कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि.२९ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी, माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध...

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

इमेज
              कराड (लक्ष्मीपुत्र) - राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.               सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी  संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.               सध्याच्या कोरोना विषाणू (कोव्हीड-19) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्ग टाळण्यासाठी शासनाने  दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे.त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे.अशावेळी राज्यात...
इमेज
पाटण मतदारसंघात विकास कामे कमी पडू देणार नाही - शशिकांत शिंदे                    पाटण (लक्ष्मीपुत्र) - निवडणूकांमध्ये झालेला जय-पराजय स्विकारुन जो नेता जनतेशी, सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ जपतो तोच खरा नेता. विक्रमसिंह पाटणकर दादांनी ही नाळ आजपर्यंत जपली आणि सत्यजितसिंह सुद्धा हेच नातं मोठ्या आपुलकीने जपत आहेत. पाटणकर घराणे आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता येणाऱ्या काळात सत्यजितसिंह यांना आमदार करेल यात शंका नाही. पाटणच्या जनतेने मी म्हणजेच सत्यजितसिंह समजावे. पाटणसाठी विकास कामे कमी पडू देणार नाही,  असे वक्तव्य आ.शशिकांत शिंदे यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना केले.                 नुकतीच शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवड करण्यात आली. जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे आशिर्वाद घेण्यासाठी ते पाटणकर यांच्या शिक्का मेन्शन येथील निवासस्थानी आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, पक्ष संक...

कराड तालुक्यात ६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

इमेज
आज सातारा जिल्ह्यात 21  जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह       कराड (लक्ष्मीपुत्र) - आज आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड  व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 21  नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे. यामध्ये   औरंगाबाद  जिल्यातील  21 वर्षीय तरुण  देहू माळवाडी ता. हवेली  जि. पुणे  येथील 48 वर्षीय महिला. कराड  तालुक्यातील मालखेड  येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका. वाई  तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील  49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष. कोरेगांव  तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण. खटाव  तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष. फलटण   तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला. जावली  तालुकयातील  गांजे येथील 48 वर्षीय महिला...
इमेज
स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पाटणमध्ये मुक आंदोलन              मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने सलून दुकाने चालू करण्यासाठी तसेच सलून व ब्युटी पार्लर कारागिरांना आर्थिक मदत, प्रत्येक सलून व ब्युटी पार्लर कारागिराला 50 लाखांचा आरोग्य मेडिकल इन्शुरन्स व सलून सुरू झाल्यावर सलून व ब्युटी पार्लर कारागिराचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला  20 लाखांची मदत मिळावी, भूमिहीन नाभिक बांधवांना शासकीय जमिनी मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित व पाटण तालुका अध्यक्ष विष्णू सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुक आंदोलन पाटण तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले.          आंदोलनामध्ये पाटण शहर व पाटण तालुक्यातील सर्व विभागाचे कार्यकारणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटण तालुकाध्यक्ष विष्णू सपकाळ, पाटण तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पवार, विक्रम महिपाल, तानाजी झेंडे, रामभाऊ जाधव...