कराड दक्षिणमध्ये "विकास" वेडा झाला पृथ्वीराजबाबा आणि अतुलबाबा यांचा निधीसाठी सकारात्मक प्रयत्न
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नेहमीच राजकीय संघर्ष पाहावयास मिळतो. स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांच्याकडील आमदारकी विलासकाका पाटील त्यांनी खेचून घेतली. तर पस्तीस वर्ष आमदार असणारे विलासकाका पाटील यांच्याकडील आमदारकी पृथ्वीराज चव्हाण यांनी सहज मिळवली. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असणारी आमदारकी डॉ. अतुल भोसले यांना हवी आहे ! आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघासाठी विकास निधी मिळवण्यासाठी सर्वच राजकीय व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करताहेत. कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी 1 कोटी 79 लाखांचा निधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आणला आहे तर कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून १ कोटी 2० लाखाचा विकास निधी मंजूर झाला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अनेक जणांचा हात लागतो आहे. हे निदर्शनास येत आहे. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून विकास निधी घेऊन येत आहेत. दरम्यान येथे श्रेयवादाचा कुठलाही मुद्दा उपस्थित होत नाही हे विशेष आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराजबाबा व अतुलबाबांनी जो निधी मिळवला तो ग्रामविका...