मित्रांच्या घोळक्यातील परममित्र विलास जाधवचे अभिष्टचिंतन. . . . ! ( 9823335544)
आमचा बालपणापासूनचा परममित्र विलास बजरंग जाधव याचा आज वाढदिवस. यानिमित्ताने परममित्र विलास जाधव यांच्या स्वभाववैशिष्ट संबंधाने थोडेसे चार शब्द . . . .गोरख तावरे विलास जाधव, सुभाष होगाडे,दादा उर्फ एकनाथ तावरे यानी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या तिघांचे एकत्रित झाले आहे. त्रिमूर्ती म्हणून तीन मित्रांचा गौरव केला जातो. मित्र असावेत तर असे, हे अभिमानाने सांगितले जाते. एकमेकांच्या सुखदु:खाला हे मित्र एकत्रित असतात. विलास बजरंग जाधव याला कौटुंबिक सुसंस्कृत पार्श्वभूमी आहे. जाधव कुटुंबीयांना राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा आहे. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय जयवंतराव जाधव व युवानेते अरुण जाधव यांचा विलास हा चुलत भाऊ आहे. विलास जाधव याला वाचनाची प्रचंड आवड आहे. दररोज किमान पाच ते सात दैनिकांचे वाचन तो करीत असतो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपल्या घरातील उमेदवाराच्या प्रचारात विलास जाधव सक्रिय सहभाग घेत असतो. उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन, आपल्या कुटुंबाचा व उमेदवारांबाबत सकारात्मक प्रचार करीत असतो. नगरपालिका निवडणुकापुरताच राजकारणात विला...