पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

इमेज
कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९-२० सालामधील ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, विद्यमान खासदार मा.श्री श्रीनिवासजी पाटीलसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार रामराजे नाईक निंबाळकरसाहेब, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.आमदार श्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री मा.प्रा.डॉ.एन.डी.पाटीलसाहेब यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०१९ रोजी दुपारी २.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला आहे.अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती उद्योगाला अधिक विकसित करणारे तंत्रज्ञान व संशोधन यासाठी कृष...

दैनिक लक्ष्मीपुत्र दिवाळी अंक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांना भेट देण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब सोळसकर,  दैनिक सामनाचे पत्रकार गोरख तावरे, दैनिक सकाळचे पत्रकार सचिन देशमुख, संपादक सुलतान फकीर

इमेज

कोल्हापूर येथे वीरशैव लिंगायत तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधुवर व पालक परिचय स्नेहमेळावा

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - कोल्हापूर लिंगायत तेली समाज अंतर्गत भव्य राज्यस्तरीय वधुवर व पालक परिचय स्नेहमेळावा रविवार दि. २२-१२-२०१९ रोजी सकाळी ९ वाजलेपासून सायं. ५ वाजेपर्यंत केशवराव भोसले नाटयगृह, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे असे कोल्हापूर अध्यक्ष गजानन शंकर सावर्डेकर, उत्सव कमेटी अध्यक्ष बाळासाहेब सि. साव्यान्नावर (सी.ए.), कार्याध्यक्ष सुनिल गाताडे, सेक्रेटरी सदाशिव शंकर माळकर, भुपाल रंगमाले, शिवमुर्ती झगडे यांनी कळविले आहे. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे. यंदा ज्यांना कर्तव्य आहे अशा तरूण-तरूणांनी त्यांचे घरातील आणि समाजातील जेष्ठांच्या आर्शिवादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजाची प्रगती हेच आमचे ध्येय असल्याने समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त तरूण, तरूणींनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. सुधाकर बेंद्रे, सातारा जिल्ह...

मलकापुर येथील विकास लाखेचा गोळया घालुन खुन टोळी युद्धाचा भडका, मलकापूर परिसरात वातावरण तंग

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - आगाशिवनगर-मलकापूर येथे बुधवारी रात्री एका युवकाचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ माजली असुन बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर (ता.कराड) येथील जॅकवेलकडे जाणा-या रस्त्यावर हा खून झाला. विकास उर्फ विकी रघुनाथ लाखे (रा. दांगटवस्ती मलकापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून ही भिषण घटना घडल्याची चर्चा आहे. दोन दुचाकीवरून आलेल्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये सुमारे चार ते पाच गोळ्या विकास लाखे याला लागल्या होत्या. गोळीबारानंतर विकास लाखे याला तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा रुग्णालयांत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव पोलीस फोजफाटा घेवुन दाखल झाले. टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे आगाशिवनगर मलकापूरला मोठा तणाव निर्माण झाला आहे. कराड तालुक्यात काही महिन्यांपासून टोळीयुद्धातून खुनासारख्या घटना घडल्या आहेत तालुक्यात वर्चस्ववादातून अधूनमधून अशा घटना घडतात ऑगस्ट महिन्यात मध्...

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची स्थापना

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड येथील श्री हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेटरमध्ये भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची स्थापना करणेत आली आहे. प्रशासनास वेतन वाढीसंदर्भात नुकतेच मागणी पत्र देण्यात आले. श्री हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. वाढती महागाईमुळे कर्मचाऱ्यांना काम करणे परवडत नाही. आस्थापनामधील वेतन श्रेणी, सेवा सुविधा तसेच संस्थेत काम करीत असलेल्या कर्मचान्यामध्ये आलेली कुशलता याचा विचार करावा. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मध्ये चर्चा होऊन कायदेशी करार व्हावा व वेतन वाढ करावी अशी मागणी करणेत आली आहे. मागणी पत्रावर संघटनेचे सरचिटणीस आमदार भाई जगताप सचिव दिलीप जगताप यांच्या सह्या आहेत. संघटनेचे जिल्हा कार्याध्याक्ष अनिल घराळ, सागर निकम, नितीन शिर्के, स्वप्नील, श्री हॉस्पिटल युनिट अध्यक्ष तरुन्नम नदाफ, उपाध्यक्ष दिपक यादव यांच्यासह पदाधिका-यांनी याबाबतचे निवेदन हॉस्पिटलचे डॉ. अविनाश गरगटे व डॉ. प्रकाश सप्रे यांच्याकडे सुपूर्द केले.

मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा करणार - आ.बाळासाहेब पाटील "सह्याद्री" च्या शेती विभागाकडून आ.बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने  ऐतिहासिक विजय संपादन केला, त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाकडून आमदार बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाचव्यांदा म्हणजे रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल "सह्याद्री"च्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, डे. ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस.साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तसेच विधानसभा सदस्य या नात्याने मतदार संघात अधिकच्या संबंधामुळे व सर्वांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुखर झाला. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल...

श्रीनिवास पाटील यांची नवी ओळख जनतेचा राजा, आपला राजा

इमेज
                             (गोरख तावरे) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले श्रीनिवास पाटील या "लोकमान्य राजा"चे स्वागत व सत्कार करुन अभिनंदन केले. कर्मचारी सेवकांनी सोबत सेल्फी घेण्याचा आग्रह केला. कर्मचाऱयांच्या विनंतीला मान देऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला  त्यांचा सन्मान स्वीकारत विविध विषयांवर चर्चा देखील केली. टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना आपुलकीची वागणूक देणारे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांचा बोलबाला सुरू झाला आहे. आपणाला भेटणारा कोणीही लहान - मोठा असा भेदभाव श्रीनिवास पाटील यांनी संपूर्ण जीवनात कधी केलेला नाही. श्रीनिवास पाटील यांच्या याच स्वभावामुळे सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम जनता "आपला राजा" म्हणून श्रीनिवास पाटील यांना स्वीकारतात. नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये छ. उदयनराजे भोसले व जनतेचा राजा श्रीनिवास पाटील यांच्यात लढत झाली होती. यामध्ये श्र...

न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा . . . असोसिएशन स्मॉल अॅण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत मागणी

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अॅण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष केशव दत्त चंदोला म्हणाले. लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मॅकबार्टच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीत छोट्या व मध्यम वर्तमानपत्रातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. राजस्थानचे अशोक चतुर्वेदी यांनी विषयपत्रिका वाचून प्रत्येक सदस्याची याबाबत सहमती घेऊन अहवाल सादर करण्याचे आवाहन केले. बैठकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करीत उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शामसिंग पंवार म्हणाले की, जीएसटी वृत्तपत्राच्या कागदावरुन काढून टाकले जावे, छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या कागद खरेदीवर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करण्यांत यावा याबाबत केंद्र शासन विचार करीत आहे. याबाबतची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची मागणी देशातील प्रत्येक राज्यातून केंद्र शासनाकडे करणे...

भाजपचाच मुख्यमंत्री होणार कसा ? कोण आमरपट्टा घालून आलाय ? काळ कोणाला माफ करीत नाही

इमेज
नम्रता व सौजन्यशीलतेने जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट साध्य करता येते, हे आतापर्यंतच्या तत्त्वज्ञानाने स्पष्ट केले आहे. मात्र सत्तास्थानाचा अमरपट्टा माझ्याकडे आहे. असा अहंभाव भाजपच्या मनामध्ये निर्माण होणे ही धोक्याची घंटा आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरामध्ये अनेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली. देशाच्या व राज्याच्या प्रमुख स्थानावर विविध पक्षांच्या राजकीय लोकांनी काम केले मात्र सत्तेचा अहंभाव व सत्तेच्या मस्तीत कोणताही राजकीय पक्ष यापूर्वी राहिला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाला केंद्रात व देशातील अनेक राज्यात सत्ता दिली मात्र सत्तेचा अहंभाव, सत्तेच्या मस्तीत राहायचे हा एक नवीन पायंडा भाजपाने देशासमोर ठेवले आहे असे दिसून येत आहे. कोणत्याही क्षेत्रात कोणाचाही अहंभाव फारकाळ चालत नाही, मस्ती फार काळ राहत नाही, सौजन्य व संयम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो बहुधा भाजप विसरला कि काय ? भाजपाचा देशातील सर्वात प्रथम मित्रपक्ष कोण असेल ? तर तो शिवसेना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान मुद्द्यावर भाजपाशी मैत्री केली आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मैत्रीसाठी शिवसेना ...

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये ५ वर्षात १००० ओपन हार्ट हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - सहयादि हॉस्पिटलने नुकतेच 1000 हृदय शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे, यामध्ये मुख्यतः बायपास व ओपन हार्ट सर्जरी यांचा समावेश आहे.कराड व आसपासच्या तालुक्यांमधील गरजू लोकांना मोठ्या शहरांपर्यंत प्रवास करण्यापेक्षा येथेच दर्जेदार सेवा उपलब्ध व्हाव्यात या सह्याद्रि समुहाच्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे अशी माहिती डॉ.राजेश कौशिश ,डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.धैर्यशील कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहयाद्रि हॉस्पिटल येथे 2013-14 साली हदयरोग शस्त्रक्रिया सुरू झाल्या. तत्पुर्वी हृदयशस्त्रक्रियेसाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागायचे.कराडसारख्या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरी करायची म्हणजे तसे आव्हानात्मकच होते पण 5 वर्षांमध्ये1,000 शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. सह्याद्रि हॉस्पिटल येथील हदयरोग तज्ञ डॉ.राजेश कौशिश म्हणाले की, हदय शस्त्रक्रियेची मुख्यतः 2 गटात विभागणी होते, प्रौढांवर केल्या जाणाऱ्या आणि पेडियाट्रिक शस्त्रक्रिया. पेडियाट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे लहान मुलांमधील जन्मतः असलेले हृदयदोष, प्रामुख्याने हृदयाला छिद्र असणे तसेच...