मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते
"कृष्णा"निवडणूक भाग - 3 मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते (गोरख तावरे) कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारणीत जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते व सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे.त्याचबरोबर या दोन्ही बंधूंच्या खांदयाला खांदा लावून तत्कालीन संस्थापक संचालकांचाही वाटा आहे.हा इतिहास आता कोणी विसरणार नाहीत कारण कृर्षीमहर्षी आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी गतकाळातील कृष्णा निवडणूकीत संस्थापक पॅनेल उभे करून कृष्णेत सत्तांतर घडवले आणि अख्या महाराष्ट्राने "हे अंचिबीत व विपरीत काय घडले"असा प्रश्न केला."कोण आहे हा अविनाश मोहिते" मोहिते-भोसले ताकदीला आव्हान देणारा म्हणून अविनाश मोहिते यांना पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. शांत,संयमी,मृदू भाषीक असे अविनाशदादांचे व्यक्तीमत्व आहे.घराण्याला परंपरा असूनही कराड तालुक्याच्या राजकारणात आबासाहेब मोहिते घराण्याला काही महत्व नव्हते.कृष्णा कारखाना उभारणीत आबासाहेबांचाही पुढाकार होता मग आमचे मोहिते घराणे कराडच्या व कृष्णा कारखान्याच्या दैनंदिन कामकाजापासून लांब का ? असा प्रश्न अविनाशदादांन...