कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ‘अभियांत्रिकी पदविका समुपदेशन-2019' चे आयोजन
कराड दि.11 ( लक्ष्मीपुत्र ) - शासकीय तंत्रनिकेतन कराड येथे बुधवार दिनांक 12 जून 2019 रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९' चे आयोजन करण्यात आले असून या समुपदेशन कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन ऑनलाईन पध्दतीने तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद म. मोहितकर प्रामुख्याने करणार आहेत.स.१० ते २ वाजता सदरचा कार्यक्रम होणार आहे. सदरील समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते व त्यांचे प्रमुख विषय पुढील प्रमाणे :- श्री. चेतन रायकर स्थापत्य अभियांत्रिकी (Chairman & Managing Director, Stuctwel Ltd.Navi Mumbai), श्री. आर.ए.पांचाळ (Ex.Jt.GM, L&T Mumbai)यंत्र अभियांत्रिकी, श्री. एस. ए. गायकवाड (Sr.Manager, Siemens India विद्युत अभियांत्रिकी limited, Navi Mumbai), श्री. गिरीश दंडोगे (Ex-program DirectorTCS Thano) | संगणक अभियांत्रिकी डॉ. नरेशकुमार हराळे (Sr,Manager, Information Security ) माहिती तंत्रज्ञान Dept. Alti Source Incorpation, New Mumbai), श्री. राजेश सोलंकी (Managing Director, Miraj Industri अ...