पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महावितरण कंपनीचा ग्राहकांना मनस्ताप

इमेज
  ग्राहकांची पिळवणूक थांबवावी - एकनाथ बागडी                कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. महावितरण कंपनी मनमानी कारभार करत असल्याने बीलामुळे ग्राहकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे.              महावितरणने अंदाजे रिडिंग घेऊन बिले देण्यापेक्षा चालू रीडिंग बिले घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. वाढीव विज बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कर...

सर्वसामान्यांचा असामान्य नगरसेवक मोहसीन आंबेकरी

इमेज
श्रावणबाळ योजनेमधून 29 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप..... 390 पेक्षाही जास्त महिलांना पेन्शन सुरू                कराड (लक्ष्मीपुत्र) - संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेमधून वार्ड क्रमांक 14 मधील गरीब, गरजू व निराधार 29 महिलांना सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी व नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नाने पेन्शन चालू करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम झाल्याने निराधार महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.             अनेक गरीब, गरजू व निराधार महिलांना पेन्शन मिळवून देण्यास नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आले असून श्रावण योजनेमधून शासन मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप महिलांना करण्यात आले.              गरजू व निराधार महिलांना श्रावणबाळ योजनेमधून पेन्शन चालू करून आत्तापर्यंत 390 पेक्षाही जास्त लोकांना याचा लाभ गोरगरीब लाभार्थींना पोहोचवले असून औषधोपचार, प्रवास, जीवनावश्‍यक वस्तूंना नक्कीच याचा हातभार लागतो आहे याचा मला मनापासून आनंद होत असून ह...

सातारा जिल्ह्यात २८ जून पासून सलून पार्लर चालू करणार

इमेज
स्वाभिमानी नाभिक संघटनेचा एल्गार                 मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - कोरोनाच्या  संकटकाळात व्यवसायिकांची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली आहे. या सर्व व्यवसायिकांनी नवीन दुकान टाकले आहेत त्यांचा तोटा मोठ्या प्रमाणात झाला आहे. लपून छपून व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःची व गिऱ्हाइकांची काळजी घेऊन व्यवसाय चालू करण्यासाठी 28 जून पासून सलून पार्लर चालू करणार आहेत.                स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मा मुख्यमंत्री साहेब यांना  निवेदन  सातारा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे शुक्रवार दि. १२ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुक आंदोलन करुन राज्य अध्यक्ष मा श्री शंकरराव गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हा अध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या उपस्थित निवेदन दिले आहे. व सोमवार दि.१५ जून रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार साहेब यांच्या द्वारे  मुख्यमंत्री साहेब यांना निवदने देण्यात आली. तरी आजपर्यंत सरकारने काहीही निर्णय घेतला ना...

कोयना नदीपात्रात बोट चालविण्याचे पथकांना प्रशिक्षण

इमेज
             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - गतवर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवल्याने अनेक गावे पाण्याने वेढली होते. पाटण शहरासह तालुक्यातही पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बोट उपलब्ध नसल्याने बाहेर काढणे कठीण झाले होते. गतवर्षाची पुनरावती यावर्षी उद्‌भवू नये म्हणून ज्या ज्याठिकाणी आपत्ती उद्‌भवते तेथे जिल्हात बोटी देण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यालाही अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दोन बोटी देण्यात आल्या असून बोटी चालवणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.              सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पाटण तालुक्याला आपत्कालीन बोटी व लाईफ जॅकेट देऊन सोमवारी पाटण येथील कोयना नदीमध्ये त्याचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, नायब तहसिलदार प्रशांत थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सपोन...

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

इमेज
कराड नगरपालिका प्रभाग समितीच्या बैठकीत  निर्णय                कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवाव्यात,  असा निर्णय प्रभाग समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे आदेश काढतील.                सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये कराड नगरपालिका शहर स्तरीय सुकाणू समिती व प्रभाग समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स आशा स्वयंसेविका, शहर नागरी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व डॉक्‍टर्स उपस्थित होते.                परराज्यातील मजूर तसेच प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही प्रमाणपत्रे सरकारी दवाखान्यात शिवा...

सातारा तब्लिग जमातीने उच्चांकी रक्तदान करित आदर्श निर्माण केला - महेश भोसले

इमेज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानास प्रतिसाद  बालाजी ब्लड बँक व अक्षय ब्लड बँकेच्यावतीने मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान                सातारा (लक्ष्मीपुत्र) - सातारा तब्लिग जमातीने सातारा जिल्ह्यातील रक्तदानाचा आजपर्यंतचा उच्चांक केला असून सातारा तब्लिग जमातीच्या रक्तदानामुळे थायलेसेमिया व इतर रुग्णांना बलिदान मिळाले आहे. 630 जणांनी रक्तदान करत सातारा तब्लिग जमातीचे कार्य हे इतरांसाठी आदर्शवत आहे, अश्या शब्दात बालाजी ब्लड बँकेचे व्यवस्थापक महेश भोसले यांनी सातारा तब्लिग जमातीचे कौतुक केले.             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी व अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी लाईव्ह मुलाखतीद्वारे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा तब्लिग जमातीचे अमिरसहाब अनिसभाई तांबोळी यांनी हाजी जलालूद्दीन सहाब रहेमतुल्लाही अलईही यांच्या स्मृति प्रित्यर्थ सातारमधील गेंडामाळ कब...

'चिनी बनावटीच्या वस्तूंवर अवलंबून राहू नका, स्वदेशी वापरा'

'क्रेडाई'तर्फे सदस्यांना आवाहन               कराड (लक्ष्मीपुत्र) - गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करीत आणि आपण देशासोबत एकजुटीने उभे आहोत हे दर्शवीत, क्रेडाई या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेने आपल्या सदस्यांना, चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर अवलंबून न राहता स्वदेशी उत्पादनांवर भर द्या, असे आवाहन केले आहे. देशभरातील 20 हजार विकसकांचे प्रतिनिधित्व ही संस्था करते.                या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना, 'क्रेडाई नेशनल'चे अध्यक्ष सतीश मगर म्हणाले, “आमचे सदस्य असणाऱ्या विकसकांना आम्ही आवाहन करतो, की त्यांनी चिनी वस्तूंवर अवलंबून न राहता, स्वदेशी' किंवा 'मेड इन इंडिया' ही संकल्पना आपल्या जीवनशैलीत व व्यवसायात अंगिकारावी. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित सर्व 250 उद्योगांनीदेखील, सध्या चीनमधून आयात होणारी उत्पादने स्थानिक पातळीवरच तयार करावीत आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांना आम्ही करीत आहोत.     ...

20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

इमेज
20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह             कराड (लक्ष्मीपुत्र) -  रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.             यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.             कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय  पुरुष.             पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.               फलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक.              खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.     ...

पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर

इमेज
पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर              मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ  पाटण ते काहीर रस्ता ग्रा. मा. 212 कि. 0/00ते  8/500km ची दुरूस्ती करणे ता. पाटण जि. सातारा ऑनलाईन टेंडर नं. 52395 निविदा क्र B. 1/अ. अ. 8/2016-2017 वर्क ऑर्डर आदेश 5/10/2016 रोजीचा आहे. व हे काम 26/12/2018 ला फायनल केले आहे. व प्रत्यक्षात पैसे मिळायला फेब्रुवारी 2020 रोजी उजाडला असल्याने बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.                 सदर काम करण्यासाठी एक वर्षाची मुदत असताना चार वर्ष लागतात लागत असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. त्यामुळे या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा रंगली आहे. मा.गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यात एकमेव पाटण तालुक्यात 180 कोटीची भरीव विकास कामे केली आहेत. परंतु अधिकारीवर्ग स्वतःच्या स्वार्थापोटी विकासाला रोखण्याचे काम करत असल्याचे उघड झाले अाहे. या अधिका...

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक

इमेज
आजच्या 8 रूग्णांसह आत्तापर्यंत एकूण 206 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज                  कराड (लक्ष्मीपुत्र) - सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे.                  दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिट...

कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी श्री हॉस्पिटल समोरील जागा

इमेज
कराड पालिका विशेष सभेत निर्णय            कराड (लक्ष्मीपुत्र) - गतवर्षीच्या महापुरात कुंभार समाजाचे गणेश मूर्ती बनवताना लाख रुपये नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवासाठी शहरातील कुंभार समाजाला मंगळवार पेठेतील श्री हॉस्पिटल समोरील सुमारे एक एकर मोकळी जागा देण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी करण्यात आला. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.               कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी कोयना नदीकाठी बालाजी मंदिर समोरचे मैदान देण्यात येत होते. मात्र गतवर्षी महापुरामुळे येथील गणेश मूर्ती तसेच कच्च्या मालाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर संत शिरोमणी गोरोबाकाका समाज मंडळाच्या वतीने नगरपालिकेस पत्र देण्यात आले होते  या पत्रात समाजाला दरवर्षी मूर्ती बनवण्यासाठी देण्यात येणारी जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत या बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.               श्री हॉस्पिटल समोर नगरपाल...
इमेज
येराड (बनपेठ) येथे विजेचा शॉक लागून म्हैस ठार          मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) -  बनपेठ (ता. पाटण) येथील पांडूरंग गणपती साळुंखे यांच्या म्हैशीसह मुलगा व पत्नीस वीजेचा शाॅक लागून दहा महिन्याची गाभण म्हैस जागेवर मरण पावली आहे. तर पत्नी व मुलगा या दोघांना विजेच्या झटक्याने दुर फेकले गेले. गत अनेक वर्षापासुन धोकादायक स्थितीत असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे अनेकांना शाॅक लागला असुन याबाबत वीज कार्यालयाला वारंवार सांगूनही याकडे  दुर्लक्ष केले आहे.           याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,   पांडुरंग साळुंखे यांची पत्नी सुनंदा साळुखे (वय 46) व मुलगा श्रीराम (वय 23) हे म्हैशीला चरायला रानात घेऊन जात होते. हे गणेशनगर येथील ट्रान्सफार्मर पासुन सुमारे दहा फुट अंतरावरून जात असताना अचानक या तिघांना वीजेचा शाॅक लागला. यामधे दहा महिन्याची गाभण असलेली म्हैस जागेवरच मरण पावली, तर सोबतच्या दोघांना वीजेचा शाॅक लागुन विजेच्या झटक्याने ते दुर फेकले गेले. यावेळी रस्तावरून जाणार्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उप...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ

इमेज
शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे वाटप               कराड (लक्ष्मीपुत्र) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे होळीचागाव तालुका खटाव येथील महेंद्र नारायण देशमुख व प्रशांत शिवाजी शिंदे यांच्या शेतावर आंबा फळबाग लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते  करण्यात करण्यात आला.              तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  हनुमंत सुखदेव भोसले यांच्या शेतावर गांडूळ खत युनिट या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री भोसले यांच्या बांधावरच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजने मधून व आत्मा योजनेमधून प्रात्यक्षिकासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना बियाणे वाटप  करण्यात आले .             याप्रसंगी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव व मंडळ कृषी अधिकारी मायणी दिलीप दाभाडे, भाऊसाहेब लादे माजी उपसभापती पंचाय...

कराड पालिकेचा नारा वेस्ट टू वेल्थ

इमेज
बारा डबरेत साकारतंय टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, निर्मिती आणि संशोधन केंद्र                  कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गंत बारा डबरे येथे थीम पार्कची निर्मिती केली आहे. येथे ओल्या व सुक्या कचऱयावर प्रक्रिया होणार आहे. याबरोबरच वेस्ट टू वेल्थ धोरण राबवले आहे. सुक्या कचऱयातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी उभारलेल्या 600 चौरस मीटर आकाराच्या शेडच्या क्राँक्रिटीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाला. या शेडमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, निर्मिती आणि संशोधन केले जाणार आहे. याबरोबरच त्याचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.                 काँक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती महेश कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, विरोधी गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक बाळासाहेब यादव, गजेंद्...

संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या - ना. नरेंद्र पाटील

इमेज
माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा               मुंबई (लक्ष्मीपुत्र) - कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि.२९ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी, माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध...

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

इमेज
              कराड (लक्ष्मीपुत्र) - राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.               सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी  संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.               सध्याच्या कोरोना विषाणू (कोव्हीड-19) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्ग टाळण्यासाठी शासनाने  दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे.त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे.अशावेळी राज्यात...
इमेज
पाटण मतदारसंघात विकास कामे कमी पडू देणार नाही - शशिकांत शिंदे                    पाटण (लक्ष्मीपुत्र) - निवडणूकांमध्ये झालेला जय-पराजय स्विकारुन जो नेता जनतेशी, सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ जपतो तोच खरा नेता. विक्रमसिंह पाटणकर दादांनी ही नाळ आजपर्यंत जपली आणि सत्यजितसिंह सुद्धा हेच नातं मोठ्या आपुलकीने जपत आहेत. पाटणकर घराणे आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता येणाऱ्या काळात सत्यजितसिंह यांना आमदार करेल यात शंका नाही. पाटणच्या जनतेने मी म्हणजेच सत्यजितसिंह समजावे. पाटणसाठी विकास कामे कमी पडू देणार नाही,  असे वक्तव्य आ.शशिकांत शिंदे यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना केले.                 नुकतीच शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवड करण्यात आली. जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे आशिर्वाद घेण्यासाठी ते पाटणकर यांच्या शिक्का मेन्शन येथील निवासस्थानी आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, पक्ष संक...

कराड तालुक्यात ६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

इमेज
आज सातारा जिल्ह्यात 21  जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह       कराड (लक्ष्मीपुत्र) - आज आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड  व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 21  नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे. यामध्ये   औरंगाबाद  जिल्यातील  21 वर्षीय तरुण  देहू माळवाडी ता. हवेली  जि. पुणे  येथील 48 वर्षीय महिला. कराड  तालुक्यातील मालखेड  येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका. वाई  तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील  49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष. कोरेगांव  तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण. खटाव  तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष. फलटण   तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला. जावली  तालुकयातील  गांजे येथील 48 वर्षीय महिला...
इमेज
स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पाटणमध्ये मुक आंदोलन              मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने सलून दुकाने चालू करण्यासाठी तसेच सलून व ब्युटी पार्लर कारागिरांना आर्थिक मदत, प्रत्येक सलून व ब्युटी पार्लर कारागिराला 50 लाखांचा आरोग्य मेडिकल इन्शुरन्स व सलून सुरू झाल्यावर सलून व ब्युटी पार्लर कारागिराचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला  20 लाखांची मदत मिळावी, भूमिहीन नाभिक बांधवांना शासकीय जमिनी मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित व पाटण तालुका अध्यक्ष विष्णू सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुक आंदोलन पाटण तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले.          आंदोलनामध्ये पाटण शहर व पाटण तालुक्यातील सर्व विभागाचे कार्यकारणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटण तालुकाध्यक्ष विष्णू सपकाळ, पाटण तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पवार, विक्रम महिपाल, तानाजी झेंडे, रामभाऊ जाधव...

मास्कची विक्री करून एक हजार सातशे रुपयांरु धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

इमेज
मास्कची विक्री करून एक हजार सातशे रुपयांरु धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोपर्डे हवेली येथील विजय चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी घरी शिलाई मशीनवर मास्क बनऊन दोन रुपयांना विक्री करून मदत  पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद               कराड (लक्ष्मीपुत्र) - करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19 ) च्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदाना द्यावे असे आवाहन केले होते.या आवाहनास प्रतिसाद देत कराड उत्तर मतदार संघात असणाऱ्या कोपर्डे हवेली ता. कराड येथील विजय चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी त्यांच्या घरी असणाऱ्या शिलाई मशीनवर मास्क बनऊन त्यांनी दोन रुपये प्रमाणे मास्कची विक्री केली व त्यातून जमा होणारी रक्कम रुपये १७००/- चा धनादेश  मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड 19) साठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केली.   ...

तुळसणच्या 6 जणांची कोरोनावर मात

इमेज
कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 9 जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज             कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.          कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, वडगाव-उंब्रज येथील 49 वर्षीय महिला, कोळकी-फलटण येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.           या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुक...

विदेशी पाळीव प्राण्यांची माहिती 6 महिन्यांच्या आत घोषित करा

इमेज
विदेशी जनावरांच्या आयात नियंत्रणासाठी विदेशी पाळीव प्राण्यांची माहिती 6 महिन्यांच्या आत घोषित करा पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकार            कराड (लक्ष्मीपुत्र) - समुद्री कासव, मार्मोसेट अथवा आफ्रिकन ग्रे पोपट अथवा अन्य इतर कोणत्याही विदेशी प्रजातीचे मालक आहेत ? राज्यातील प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे एक फॉर्म सबमिट करावा लागेल व रीतसर त्यांच्याकडून ना हरकत घ्यावी लागेल. कशी माहिती मानद वन्यजीव रक्षक आणि वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण विभागाचे सदस्य रोहन भाटिया यांनी दिली.            केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पहिल्यांदाच, थेट विदेशी प्राण्यांच्या आयात व मालमत्तेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक आदेश  जारी केला आहे. विदेशी प्रजातींच्या मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांची माहिती स्वेच्छेने सहा महिन्यांत जाहीर करण्यास सांगितले आहे. सरकारच्या परिवेश पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आदेशात स्वदेशी स्वेच्छेने प्रकटीकरण, नोंदणी आणि आयात केलेल्या विदेशी जिवंत...

पाटणमध्ये महिला कोरोना योद्ध्यांचा सत्कार

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम             पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - कोविड -19 चा प्रसार रोखण्याचे आव्हान माझ्या भारत देशातील माता-भगिनींनी स्वीकारले, त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात यशस्वी आपण ठरतो आहोत. या सर्व माता-भगिनींनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून या 'माऊली' संपूर्ण देशवासियांच्या अभिनंदनास पात्र आहेत असे गौरव उद्गार सत्यजितसिंह पाटणकर यांनी महिला कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना काढले.          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. या महिला कोरोना योध्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेसाठी, आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले.          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त १० जुन रोजी दरवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जातात. परंतु यावर...

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी पाटणमध्ये वृक्षारोपण

इमेज
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी पाटणमध्ये वृक्षारोपण           मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष व देशाचे नेते खा. शरद पवार यांनी नेहमीच वटवृक्षाची भुमिका ठेवत राज्यासह देशाच्या हितासाठी सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उज्वल परंपरा जपत नेटाने वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापनदिन निमित्ताने वृक्षारोपण करून आपण पर्यावरण रक्षक बनूया. पक्ष आणि जनता यासह आपल्या भावी पिढ्यांसाठी याच चांगल्या शुभेच्छा ठरतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.         राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापनदिन निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. हा वर्धापनदिन 'वृक्षारोपणा'सारखा एक स्तुत्य उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर आणि मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर या वृक्षांच्या संगोपनाचीही जबाबदारी पक्षाच्यावतीने घेण्यात आली. यावेळी पाटण पं...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते तळबीड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

इमेज
इमारतीचे काम हे वेळेत व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे              कराड (लक्ष्मीपुत्र) - तळबीड (ता.कराड) येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन ना. बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.             लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण होण्याच्यादृष्टीने, सोशल डिस्टन्स बाबत शासनाचे सर्व नियम पाळून सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.              प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीसाठी रुपये ४९.८३ लक्ष मंजूर झाले आहेत. सदरची इमारत १२.५५ मी. बाय ६.९९ मीटर आकाराची दोन मजली आर.सी.सी इमारत, यामध्ये क्लिनिक रूम, वेटिंग रूम, एक्झामीन रूम, लेबर रूम, लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, टॉयलेट आदी.सोयी सुविधा असून अत्यंत सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे.               सदर इमारतीचे काम...

अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

इमेज
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी  बि - बियाणे, खत दिले बांधावर    कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जगाबरोबर देशाला आणि राज्याला झळ सोसावी लागली आहे. या मुळे  अर्थ चक्र थांबले, याचा फटका शेतकऱ्यांपासून ते उद्योगपती यांनाही बसला.  पहिल्या लॉकडाऊन पासून शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यावर शासनाने भर दिला असून शासन खंबीरपणे पाठीशी आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज केले.    पाटण तालुक्यातील गिरेवाडी येथील शिवारात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना   बि-बयाणे व खतांचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, गिरेवाडीच्या सरपंच सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.     शेतकऱ्यांपासून ते उद्योगांनाही कोरोना झळ सोसावली लागली ...

2 वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात

इमेज
कृष्णा हॉस्पिटलमधून 8 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज              कराड (लक्ष्मीपुत्र) - येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 8 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 2 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही समावेश होता. या कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 185 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.             जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 वर्षाचा मुलगा, खराडे-हेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, कालेवाडी-पाटण येथील 46 वर्षीय पुरूष, मारूल-दिवशी येथील 27 वर्षीय युवक, सळवे-पाटण येथील 45 वर्षीय महिला हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.              यावेळी आकाश चौगले,...

कोयना धरण व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा - विक्रमबाबा पाटणकर

कोयना धरण व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा - विक्रमबाबा पाटणकर           मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - जलसंपदा विभागाचे माजी सचिव वडणेरे यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली वडणेरे  समिती स्थापन झाली त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील (आबा), मंत्री जयंत पाटील यांनी अलमट्टीधरणामुळे पुर आला. असे भाकीत केलेले होते. परंतु यावेळी महाराष्ट्र राज्याचे अभियंता व कर्नाटक राज्याचे अभियंता यांच्या अलमट्टी धरण व कोयना धरणाच्या पाणी व्यवस्थापनावर  संयुक्तिक रित्या बैठका झाल्या यामध्ये पुरपरस्थितीवर अभ्यास करून तसे परिपत्रक संबंधित विभागांना लागू केले होते. तरीसुध्दा गतवर्षी २०१९ रोजी या परिपत्रकाचे पालन न झाल्ल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व धरण व्यवस्थापनाच्या गच्छाळ कारभारामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात जलप्रलय निर्माण झाला. यामध्ये प्रंचड जिवीत हानी व वित्त हानी झाली. याला संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. अशा स्वरुपाची मागणी गतवर्षी  केलेली होती. मात्...
इमेज
कराड येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे काहीप्रमाणात कामकाज सुरू - संजय राऊत          कराड (लक्ष्मीपुत्र) -  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशान्वये परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज यापूर्वीच सुरू केलेले आहे. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण व्यतिरिक्त इतर कामकाज १० जून २०२० पासून काही प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. सदर कामकाजाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.         परिवहन विभागाच्या बहुतांश सेवा www. parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध असलेल्या सेवांबाबत ऑनलाईन पध्दतीनेच केलेले अर्ज स्विकारण्यात येतील. अशा सेवांबाबत हस्तलिखीत अर्ज स्विकारले जाणार नाहीत. वाहनाचे हस्तांतरण, बैंक बोजा नोंद, नाहरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत, वाहनात फेरबदल, अनुज्ञप्ती नुतनीकरण/दुय्यम प्रत, इत्यादी कामकाजाची कागदपत्रे कार्यालयीन इमारतीच्या तळमजल्यावरील खिडक...