तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही पाटणला मराठा मोर्चाला प्रतिसाद
पाटण, दि. 21 ( लक्ष्मीपुत्र ) - सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधवानी पाटण येथील झेंडा चौकातून तहसील कार्यालयावर पायी चालत मोर्चा काढला. मोर्चा पाटण तहसील कार्यालयासमोर आला असता सर्वांनी ठिय्या मांडला आणि सरकारचा निषेध व्यक्त करत आपल्या तीव्र भावना मांडल्या. संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. मराठा समाजाचा संयम सुटण्याची वेळ सरकारने पाहू नये. तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता रडायची नाही तर लढाईची वेळ आली असल्याचा निर्वाणीचा इशारा पाटण तालुका मराठा मोर्चाच्यावतीने सरकारला देण्यात आला. दरम्यान, पाटण शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळपासूनच पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधव पाटण शहरातील झेंडा चौकात जमा झाले होते. सकाळी 11 वाजता सर्व मराठा बांधव मोर्चाने तहसील कार्यालयाकडे कूच केली. छ. शिवाजी महाराज की जय, एक मराठा ल...