कराड (प्रतिनिधी) - पत्रकारीतेच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरख तावरे यांनी केलेले काम हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने केलेला विचार आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कराड येथे व्यक्त केले. गोरख तावरे यांना स्टार आयकॉन पुरस्कार त्यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वेणूताई चव्हाण स्मारक येथे साप्ताहिक भास्कर भूषणच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्टार आयकॉन पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, ज्येष्ठ कलाकार वसंत अवसरीकर, राजू लोहार, '{Zfm लोहार, अभिनेत्री विजया पालव, कमलाकर पाटील भास्कर भूषणच्या मानद संपादिका डॉ. मुग्धा रेठरेकर, मलकापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, डॉ. नरेंद्र माळी, क्रांती मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.उदय ठिगळे उपस्थित होते. यावेळी भास्कर भूषण विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘अठरा पगड जातींची सांगड घालून श...