प्रांताधिकाऱ्यांच्याहस्ते सर्वेबद्दल गौरव, डॉक्टरांचाही झाला सन्मान कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड तालुक्यात पहिला कोरोनाबाधीत रुग्ण तांबवे गावात सापडला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या गावात आरोग्य विभागाच्यावतीने 28 दिवस सुपने आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, आरोग्य करमचारी, पर्यवेक्षक यांनी सर्वेचे काम पुर्ण केले. त्याबद्दल तांबवे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, कराड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, तांबवेचे उपसरपंच धनंजय ताटे, माजी सरपंच आबासाहेब पाटील, निवासराव पाटील, संतोष कुंभार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, इंदुताई पाटील, आनंदराव ताटे, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष धोंडीराम पवार, सचिव सुनिल पाटील, निवासराव पवार, संदीप...