पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योगगुरु रामदेव बाबांची योगसाधना कराडकरांना लाभदायक

इमेज
 एप्रिल महिन्यामध्ये रामदेवबाबा कराडमध्ये येणार आहेत. ही आनंदवार्ता कराड कराडकरांसाठी म्हणता येईल. रामदेवबाबांनी संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आहे. योगसाधनेमुळे अनेक आजार बरे होतात, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. योगसाधनेमुळे दुर्धर आजार बरे होतात, त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये उत्साह राहण्यासाठी योगसाधवा महत्त्वाची आहे. अनेक सामान्यजन रामदेवबाबांचे योगसाधवा पाहून नियमीत योग करीत आहेत, यामुळे अनेकांचा उत्साह वाढतो आहे. तर अनेकांचे आजार बरे झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी रामदेवबाबांना कराडमध्ये येण्याचे निमंत्रण दिले, आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. प्रत्यक्ष रामदेवबाबांच्या सानिध्यात राहुल योगविद्या अनेकांना शिकता येणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये योगविद्येला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग विद्येमुळे अनेक व्याधी बर्या होतात, त्याचबरोबर मन प्रसन्न, ताजेतवाने राहण्यासाठी योग विद्या महत्त्वाचीच आहे. संपूर्ण जगात रामदेवबाबांचे भक्त मोठय़ा प्रमाणात आहेत. योगविद्या शिकवण्यासाठी व प्रबोधनासाठी रामदेवबाबा संपूर्ण देश...

विश्‍वास नांगरे - पाटील कारवाई कराच !

इमेज
बैलगाडी शर्यतीवर सध्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे .या बंदीमुळे अनेक बैलगाडी शोकिन नाराज आहेत. बैलगाडी शर्यत पुन्हा पूर्ववत करावी, यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लढा न्यायालयीनस्तरावर लढला जात आहे. शासन शासनस्तरावर संमती द्यावी म्हणून अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात गावांच्या जत्रा असतात, यावेळी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात होते. प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार बैलगाडी शर्यतीमुळे बैलांच्यावर (प्राण्यावर) अन्याय होतो, यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी घालावी, ही त्यांची प्रमुख मागणी असल्याने सध्या बैलगाडी शर्यतींवर महाराष्ट्रात बंदी आहे.दरम्यान ऊस वाहतूक करताना बैलांना प्रचंड यातना होतात, याबाबत प्राणीमित्र का काही बोलत नाहीत ? असे बोलले जात होते. बैलगाडी शर्यतीपेक्षा ऊस वाहतूक करताना मुक्या बैलांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात, ही खरी वस्तुस्थिती आहे. याची दखल प्राणी मित्रांनी घेतली नसली, तरी सातारा जिल्हा पोलिसांनी बैलगाडीची दखल घेतली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चसलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. बैलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी हावरे ! म्हणूनच केली जाहिरातींवर उधळपट्टी

इमेज
केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिरातींवर केलेला खर्च पाहिला की, आवाक् होण्याजोगे आहे.साडेतीन वर्षांमध्ये ३ हजार ७५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. वास्तविक हा सर्व पैसा देशातील नागरिकांनी कररूपाने भरलेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंटमीडिया, रेडिओ, वेब, बॅनर्स या माध्यमांवर सरकारने केलेल्या कामाची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "मन की बात" सांगण्यासाठी केलेला खर्च आहे. गतकाळातील सरकारने पाच वर्षांमध्ये किमान एक हजार ते दीड हजार कोटी खर्च केले होते. भाजप सरकारने जाहिरातबाजीवर केलेली उधळपट्टी नक्कीच निषेधार्थ आहे. जाहिरातबाजीवर केलेल्या खर्चातून देशातील गरीब जनतेसाठी एखादी महत्त्वपूर्ण योजना राबवता आली असती िकंवा देशातील शेतकऱ्यांना मदत करता आली असती, दरम्यान जनतेच्या हितासाठी पैशांची उधळपट्टी शासन करीत नाही. तर स्वहिताकरितस जाहिरातीसाठी भाजप सरकार व नरेंद्र मोदी पैशांची उधळपट्टी करतात,हे विपरीत आक्रीतच आहे. माध्यमे हे लोकशाहीचा चौथास्तंभ आहे. यासाठी खर्च करायला काही हरकत नाही, मात्र खर्च कोणासाठी ? कसा ? का ? केला हे पाहणे महत्त्वाचे आहे. केंद्र श...

स्त्री जन्माचे स्वागत ही समाजाची नैतिक जबाबदारी - लक्ष्मीकांत देशमुख मसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्याहस्ते सत्कार

इमेज
कराड (प्रतिनिधी) - स्त्री  जन्माचे  स्वागत करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी समाजाने व शासनाने आवश्यक ती जबादारी घेणे आवश्यक आहे असे उद्गार ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले.मसापच्या कराड ग्रामीण शाखेच्यावतीने लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविल्याबद्दल यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेला ग्रंथ व रोप देवून मसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.     यावेळी मसाप कराड ग्रामीण शाखेचे प्रमुख कार्यवाहक डॉ.बसवेश्‍वर चेणगे, सहकार्यवाहक शरद गाडे, खजिनदार मंगेश हिरवे, विश्‍वस्त सचिन देशमुख, उदय थोरात, सदस्य गजानन चेणगे आदी उपस्थित होते.     यावेळी पुढे बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजातील स्त्रीचा जननदर कमी होत चालला असून त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.समलैंगिकता, बलात्कार अशा स्वरुपाची गुन्हेगार व अनैतिकतता वाढीस लागेल.त्यामुळे शासनस्तरावर याबा...

दुसरा राहुल नको

इमेज
  नोटाबंदी व जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. बरेच व्यवसाय बंद पडले आहेत तर अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांना नैराशाचे गर्तेने व्यापले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी व जीएसटीचा घेतलेला निर्णय हा विकासाभिमुख नाही. याचे ज्वलंत उदाहरण कराड तालुक्यात घडले आहे. कराडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय करणारा राहुल फाळके याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी, सोन्या चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी फेसबुक अकाऊंटवर जे, मनोगत व्यक्त केले आहे. ते विदारक व भीषण आहे.  सोने चांदीचा व्यवसाय हा काही प्रमाणात रोख तर काही प्रमाणात उधारीवर चालतो, अनेक लोकांना राहुल फाळके यांनी विविध प्रकारची मदत केली असल्याचे त्यांनी मनोगतात म्हटले आहे. दरम्यान राहुल फाळके यांचा आक्षेप कोणाही मित्र अथवा उधारी धारकांच्यावर नाही. हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने प्रथमता नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू केल्यानंतर राहुल फाळके यांचा व्यवसाय चालेनासा झाला, सोन्या चांदीला ग्राहक मिळेना आणि उधारी होती ती...

दुसरा राहुल नको

इमेज
नोटाबंदी व जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. बरेच व्यवसाय बंद पडले आहेत तर अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांना नैराशाचे गर्तेने व्यापले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी व जीएसटीचा घेतलेला निर्णय हा विकासाभिमुख नाही. याचे ज्वलंत उदाहरण कराड तालुक्यात घडले आहे. कराडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय करणारा राहुल फाळके याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी, सोन्या चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी फेसबुक अकाऊंटवर जे, मनोगत व्यक्त केले आहे. ते विदारक व भीषण आहे.  सोने चांदीचा व्यवसाय हा काही प्रमाणात रोख तर काही प्रमाणात उधारीवर चालतो, अनेक लोकांना राहुल फाळके यांनी विविध प्रकारची मदत केली असल्याचे त्यांनी मनोगतात म्हटले आहे. दरम्यान राहुल फाळके यांचा आक्षेप कोणाही मित्र अथवा उधारी धारकांच्यावर नाही. हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने प्रथमता नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू केल्यानंतर राहुल फाळके यांचा व्यवसाय चालेनासा झाला, सोन्या चांदीला ग्राहक मिळेना आणि उधारी होती ती वस...

सह्याद्री आघाडीवर

इमेज
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारी खोलवर रुजली आहे. सहकारी साखर कारखान्यांच्यामुळे शेतकऱयांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपैकी सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेतकर्यांना ऊस दर देण्याबाबत अग्रक्रमाकांवर राहिला आहे. याच पद्धतीने उसाचे गाळप करणे व साखर निर्मिती करण्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना अग्रस्थानी म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विद्यमान कराड उत्तर सभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कामकाज चालते आहे. योग्य नियोजन, सुसूत्रपणा, कर्मचाऱयांचे वेळेत काम करण्याचे नियोजन, यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वबाबतीत अग्रक्रमावर नेहमी राहतो आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन गेल्यावर्षी झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी मोठ्...

भूमिका बदलताहेत नारायण राणे

इमेज
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, कोकणचे मसीहा म्हणून प्रसिद्ध असणारे नारायण राणे यांच्या सततच्या बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे, त्यांच्यावर विविध माध्यमातून टिका होऊ लागली आहे. वास्तविक पाहता नारायण राणे हे मूळचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची प्रतिमा चांगली निर्माण झाली होती. शिवसेनेने नारायण राणे यांना अनेक संधी दिल्या, इतकेच काय पण, राज्याचे मुख्यमंत्रीपद ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. शिवसेनेमुळे नारायण राणे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झाले हे विसरता उपयोगाचे नाही. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात काही प्रसंगांमुळे नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देतो. असे आश्वासन दिले होते. मात्र अखेरपर्यंत काँग्रेसने त्यांना झुलवत ठेवले. मात्र मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रिपद देऊन सन्मान केला. मात्र या सन्मानाने नारायण राणे खुश झाले नाहीत. सातत्याने दिल्लीवारी करीत मला मुख्यमंत्री करा ! असा आग्रह करीत राहिले. मात्र नारायण राणेंना मुख...

भूमिका बदलताहेत नारायण राणे

इमेज
 महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, कोकणचे मसीहा म्हणून प्रसिद्ध असणारे नारायण राणे यांच्या सततच्या बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे, त्यांच्यावर विविध माध्यमातून टिका होऊ लागली आहे. वास्तविक पाहता नारायण राणे हे मूळचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची प्रतिमा चांगली निर्माण झाली होती. शिवसेनेने नारायण राणे यांना अनेक संधी दिल्या, इतकेच काय पण, राज्याचे मुख्यमंत्रीपद ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. शिवसेनेमुळे नारायण राणे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झाले हे विसरता उपयोगाचे नाही. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात काही प्रसंगांमुळे नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देतो. असे आश्वासन दिले होते. मात्र अखेरपर्यंत काँग्रेसने त्यांना झुलवत ठेवले. मात्र मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रिपद देऊन सन्मान केला. मात्र या सन्मानाने नारायण राणे खुश झाले नाहीत. सातत्याने दिल्लीवारी करीत मला मुख्यमंत्री करा ! असा आग्रह करीत राहिले. मात्र नारायण र...

राजभवन गंगटोक येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीला त्यांचे १०५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

इमेज
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - माझ्या बालपणी ज्यांची माया मला लाभली व  त्यांचेच प्रोत्साहनाने मला पुण्या-मुंबईत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत मी १९६५ साली कोल्हापूर येथे सेवारत झालो आणि पुढे १९७९ पासून भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्र भर वेगवेळ्या पदावर जून १९९९ पर्यंत मी सेवा बजावली. १९९९ साली भारतीय प्रशासकीय सेवेतून मी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली व पुढे १९९९ आणि २००४ साली दोनवेळा कराड लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून देश पातळीवर प्रतिनिधित्व केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी पंडित नेहरूंच्या हाकेला प्रतिसाद देऊन भारताचे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी १९६२ साली स्वीकारली. पुढे त्यांना भारताच्या गृहमंत्री पदाची धुरा पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे आग्रहावरून, आवाहन म्हणून स्वीकारावी लागली. सिक्किमच्या जनतेने १४ एप्रिल १९७५ रोजी सिक्किममध्ये झालेल्या सार्वमताचे ( Referendum )  आधारावर सिक्किमला भारतामध्ये सामील करून घेण्याची विनंती पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा ...

अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची का कमी केली ? पृथ्वीराज चव्हाण, यांचा सवाल

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची का कमी केली? असा सवाल माजी मुख्यमंत्री  आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा देखावा केला पण अजूनपर्यंत काम सुरु झालेले नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे बदलण्यात आलेला प्रकल्प आराखडा असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १९२ मीटर वरून वाढवून २१० मीटर इतकी करण्यात आली आणि हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरेल अशी जाहिरातदेखील विद्यमान सरकारने केली. परंतु दोन्ही प्रकल्प आराखड्यातील तरतुदींमध्ये बारकाईने पहिले असता स्मारकाची उंची वाढवण्याच्या नावाखाली शासनाने प्रत्यक्षात महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली आहे तर पुतळ्याखालील चौथऱ्याची उंची वाढवली आहे. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्र...

शतावधान जादूचा खेळ नव्हे तर आध्यात्म सिद्ध शक्ती - अभिनंदनचंद्र सागर

इमेज
कराड (ललक्ष्मीपु) - जैन धर्मातील शतावधान हा जादूचा खेळ नसून आध्यात्म साधनेद्वारे कोणालाही सिद्ध करता येऊ शकले अशी सिद्धशक्ती आहे. ज्याठिकाणी साधनांद्वारे वैज्ञानिक सिद्धांत शक्ती निरस्त होते. त्याच ठिकाणी आध्यात्म साधनेतून सिद्ध शक्ती उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन युवा शतावधानी आचार्य नयनचंद्र सागरसूरीजी यांचे  शिष्य अभिनंदनचंद्र सागर यांनी केले.  जैन समाज बांधवांच्या वतीने बाबुभाई पदमसी हॉलमध्ये आध्यात्म व ध्यान साधनेच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या अंशीक शक्ती या विषयी अभिनंदनचंद्र सागर यांचे मार्गदर्शनपर चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुळे बालमुनी नमीचंद्र सागर, नेमीचंद्र सागर उपस्थित होते. आजचे शतावधान मुनि सुपार्श्वचंद्र सागरजी यांनी केले. अभिनंदनचंद्र म्हणाले, भारत देशाने संपूर्ण जगाला आध्यात्माची शिकवण दिली आहे. तप, त्याग व साधन यातून साधू संत आत्मिमक समाधान मिळवत असतात. यातून त्यांना आध्यात्मिक शक्ती मिळत असते. यातील अंशीक शतावधान हा एक प्रकार आहे. डॉक्टर, शास्त्रज्ञ यांचे या विषयाकडे आर्कषण असते. यावर अनेकजण संशोधन करून पीएचडी मिळवत आहेत....

यशवंतनगर ग्रामपंचायत निवडूक बिनविरोध युवा नेते जशराजबाबा पाटील यांनी केले अभिनंदन

इमेज
    कराड (लक्ष्मीपुत्र) - यशवंतनगर, ता.कराड येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निडणूक बिनविरोध झाली असून,  जनतेतून थेट सरपंचपदासाठी तुळशीराम किसन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड झालेले सदस्यांमध्ये सौ.संजिवनी बाळासाो माळवे, सौ.विरश्री गणपती करांडे, अनिल दौलत यादव, रघुनाथ विष्णू येडगे, सौ.लीना निवासराव जाधव, हणमंत गोपाळ काळेबाग, सौ.अरूणा शशिकांत देशमुख, सौ.दीपाली पांडुरंग स्वामी, विकास रविंद्र चव्हाण, प्रकाश शिवाजीराव सोनवणे यांचा समावेश आहे.दरम्यान नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी युवा नेते जशराज पाटील बाबा यांची भेट घेतली, त्याप्रसंगी जशराज पाटील बाबा यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गर्शनाखाली यशवंत-नगर ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडीनंतर आमदार श्री बाळासाहेब पाटील यांनीही सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, सर्व सदस्यांसह सह्याद्रि कारखान्याचे कामगार व कल्याण अधिकारी एन.आर.जाधव...

वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत लवकरच तोडगा काढणार - नाम. चंद्रकांतदादा पाटील मुंबईत डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली भेट

इमेज
कराड,(लक्ष्मीपुत्र) -  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस आणि श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली उंडाळे विभागातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन, वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली. यावेळी वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याची ग्वाही, मंत्री पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली. भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या शिष्टमंडळात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, संजय शेवाळे, सर्जेराव थोरात, हंबीरराव पाटील, शिवाजी चिबडे, संपतराव पाटील यांच्यासह उंडाळे विभागातील शेतकर्‍यांचा सहभाग होता. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर मांडणी केली. कराड दक्षिण मतदारसंघातील काले, ओंड,...

शेतकर्‍यांना न्याय देणेस कटीबध्द - आ.बाळासाहेब पाटील

इमेज
    कराड (लक्ष्मीपुत्र) - स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या कल्पक दृष्टीकोनातून सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली.व आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी योग्य नियोजन व दुरदृष्टीतून महाराष्ट्रामध्ये हा कारखाना आदर्शवत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकर्‍यंाना न्याय देण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी नलवडेवाडी येथे केले.     नलवडेवाडी ता.कोरेगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून व विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुुनिल माने होते. याप्रसंगी कोरेगाव पंचायत समितीेचे सभापती राजाभाऊ जगदाळे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदिप मांडवे, कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले, कोरेगाव प.स चे उपसभापती संजय साळंखे, बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव प.स चे माजी उपसभापती कांतीलाल पाटील (तात्य...