पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोरख तावरे यांचे कामम्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने केलेला विचार — श्रीपाल सबनीस

इमेज
कराड (प्रतिनिधी) - पत्रकारीतेच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरख तावरे यांनी केलेले काम हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने केलेला विचार आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कराड येथे व्यक्त केले. गोरख तावरे यांना स्टार आयकॉन पुरस्कार त्यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वेणूताई चव्हाण स्मारक येथे साप्ताहिक भास्कर भूषणच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्टार आयकॉन पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, ज्येष्ठ कलाकार वसंत अवसरीकर, राजू लोहार, '{Zfm लोहार, अभिनेत्री विजया पालव, कमलाकर पाटील भास्कर भूषणच्या मानद संपादिका डॉ. मुग्धा रेठरेकर, मलकापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, डॉ. नरेंद्र माळी, क्रांती मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.उदय ठिगळे उपस्थित होते. यावेळी भास्कर भूषण विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘अठरा पगड जातींची सांगड घालून श...

पत्रकारीतेचे गुरू

इमेज
पत्रकारीतेचे गुरु दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून गेली २५ वर्षे गोरख तावरे हे कराड येथून काम करीत आहेत. तर गेल्या २१ वर्षापासून साप्ताहिक राजसत्य यशस्वीपणे चालवित आहे...

भाऊसाहेब ढेबे यांची यशोगाथा

इमेज
दैनिक लक्ष्मीपुत्र,कराड..28 ऑगस्ट 2016 भाऊसाहेब ढेबे (काका) यांची यशोगाथा अवश्य वाचा...... शेतमजुराने राबवला शेळीपालन प्रकल्प कापिलच्या शेतकर्‍याचा बेरोजगारांसमोर आदर्श, प्रशासनाकडूनही प्रकल्पाचे कौतुक वडिलोपार्जित हक्काची शेतजमिन मिळवण्यासाठी शाळकरी वयापासून झगडणार्‍या कपिलच्या शेतमजुराने संकटावर मात करत शेळीपालन प्रकल्प राबवला. या प्रकल्पाने कराडच्या शेतीक्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून सामान्य शेतकरी या भाऊसाहेब  ढेबे यांच्यासह त्यांच्या शेतमजूर कुटुंबाने बरोजगार तरूणांसमोर आपल्या कष्टाने आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कराडलगतच कापिल हे गाव असून या गावातील ढेबे कुटुंबिय वर्षानुवर्षे शेतात मजुरी करत स्वकर्तृत्वावर उभा राहण्यासाठी धडपतडत होते. वडिलोपार्जित शेतजमिन मिळवण्यासाठी त्यांचा लढा सुरू होता. भाऊसाहेब ढेबे यांनी त्यासाठी शाळकरी वयापासून प्रयत्न सुरू ठेवले होते. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून संघर्षमय परिस्थितीत कुटुंबाला उभा करण्यासाठी त्यांचा झगडा सुरू झाला. मजुरी करून जे कमवायचे ते कोर्टकचेरीच्या फेर्‍यात गमवायचे असा त्यांचा...