साहेबांचे भक्त
आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब यांनी केलेले काम दीपस्तंभासारखे उभे आहे. कराड शहर व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय व पुढील पिढीला मार्गदर्शक आहे. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी समाजकारणाला अग्रक्रम देऊन कामापुरते राजकारण केले आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून कराडकरांना सर्व सुखसोयी व प्राथमिक सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत. भुयारी गटार योजनेमुळे कराडकरांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा केलेला प्रयत्न इतिहास विसरणार नाही. प्राथमिक शाळांच्या उभ्या केलेल्या टोलेजंग इमारती आजही अभिमानाने उभ्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेपेक्षा कराड नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचे काम एका पाऊल पुढे आहे. कराड नगरपालिकेची शाळा क्रमांक ३ ही राज्यात सर्व बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. कराड शहरातील प्रशस्त रस्ते, विद्युतीकरण, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन समस्यांना सामोरे जावाे लागू नये यासाठी केलेले काम आजही दीपस्तंभासारखे उभे आहे. केवळ विद्यमान नगरपालिका सदस्यांनी त्या पायवाटेवरून चालून, उभ्या केलेल्या सुविधांची देखभाल ...