जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे कराडचा ही झाला सन्मान !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वाळव्याचे आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. कारण जयंत पाटील यांनी आतापर्यंत राजकारण व समाजकारणात केलेले काम उल्लेखनीय व दिशादर्शक आहे. यामुळे भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असेही बोलले जात आहे. कराडला लागून वाळवा तालुका असल्यामुळे कराड - वाळवा तालुक्यात राजकीय सुंदोपसुंदी तसेच बेरजेचे राजकारण दोन्ही तालुक्यात चालत असते. गतकाळातील कराड लोकसभा मतदार संघांत वाळवा तालुका होता, यामुळे कराडमधील राजकीय लोकांचे वाळवा तालुक्यात अतिशय चांगले संबंध आहेत. तर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रही वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. अतिशय पारदर्शक, काटकसरीने संस्था चालवण्याचा आमदार जयंत पाटील यांचा हातखंडा आहे. अनावश्यक खर्च टाळून संस्थांचा आर्थिक विकास करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भुसविली आहेत. आणि प्रत्येक मंत्रीपद भूषवताना त्यांनी त्यांच्या खात्याचा दर्जा उंचावला आहे. राष्ट्रीय काँग्र...