सोशल मिडीयावर एकच नारा. . . . मतदान मी केले ! तुम्ही ही करा !
आज २३ एप्रिल २०१९ रोजी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये प्रत्येक मतदार मतदान करून आल्यानंतर बोटावर शाई दाखवून मी मतदान केले, आपण ही मदान करा ! असे आवाहन करीत आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा "राजा" असतो आणि तो राजा आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणे आवश्यक आहे. गतकाळात सातारा लोकसभा मतदार संघांमध्ये खासदार म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, याचे अवलोकन मतदारांनी यापूर्वीच केलेले आहे. तेव्हा प्रत्येक मतदाराने त्याचा सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्तरावर व निवडणूक आयोगाने मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी जनजागृती केलेली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला गेलेला आहे.सध्या होऊ घातलेली लोकसभेची निवडणुक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. याचा विसर मतदारराजाला पडता उपयोगाचा नाही. लोकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला गुप्त पद्धतीचा मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे, यावर कुणाचाही अंकूश नसतो. देशातील प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे व स्वतःच्या सतत विवेकबुद्धीने त्याला ज्या पक्षाला, व्यक्तीला मतदान करायचे आहे ते करण्याची मुभा व स्वातंत्र्य आहे.सातारा लोकसभा मतदार संघांमध्ये सध्या जे मतदार बाहेर पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावत आहेत ही आनंदाची बाब म्हणता येईल.मतदान करून आल्यानंतर बोटाला लावलेली शाही असणारे बोटासह फोटो काढून मतदार सोशल मीडियावर तो फोटो व्हायलर करीत असून मी मतदान केले, आपणही मतदान करा असे आवाहन करीत आहेत.
सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान आज 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे, उल्लंघन केल्यास संबंधितावर आदर्श आचार संहितेचा भंग म्हणून कडक कारवाई केली जाणार असल्यामुळे मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी जी आचारसंहिता घालून दिली आहे त्याचे पालन करून मतदान करावे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सातारा लोकसभेचे एकूण बुथ 2296 एवढे असून या मतदान केंद्रांवर 11 हजार 772 कर्मचारी प्रत्यक्ष काम करीत आहेत. तसेच 2 हजार 959 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे 14 हजार 731 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन मतदानाचा टक्का वाढावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा