कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ‘अभियांत्रिकी पदविका समुपदेशन-2019' चे आयोजन
कराड दि.11 ( लक्ष्मीपुत्र ) - शासकीय तंत्रनिकेतन कराड येथे बुधवार दिनांक 12 जून 2019 रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९' चे आयोजन करण्यात आले असून या समुपदेशन कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन ऑनलाईन पध्दतीने तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद म. मोहितकर प्रामुख्याने करणार आहेत.स.१० ते २ वाजता सदरचा कार्यक्रम होणार आहे.
सदरील समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते व त्यांचे प्रमुख विषय पुढील प्रमाणे :- श्री. चेतन रायकर स्थापत्य अभियांत्रिकी (Chairman & Managing Director, Stuctwel Ltd.Navi Mumbai), श्री. आर.ए.पांचाळ (Ex.Jt.GM, L&T Mumbai)यंत्र अभियांत्रिकी, श्री. एस. ए. गायकवाड (Sr.Manager, Siemens India विद्युत अभियांत्रिकी limited, Navi Mumbai), श्री. गिरीश दंडोगे (Ex-program DirectorTCS Thano) | संगणक अभियांत्रिकी डॉ. नरेशकुमार हराळे (Sr,Manager, Information Security ) माहिती तंत्रज्ञान Dept. Alti Source Incorpation, New Mumbai), श्री. राजेश सोलंकी (Managing Director, Miraj Industri अणुविद्युत अभियांत्रिकी Servises India pvt.ltd, Thane)
श्री, आनंद लिमये (Managing Director, India Printing ) मुद्रण तंत्रज्ञान Works (P) Ltd. Wadala Mumbai. श्री. विनायक ठकार (Director Green Acre chemichal ) वस्त्र अभियांत्रिकी pri.ltd, Mumbai) श्री. विवेक इंगळे (Vice President Reliance Industrial ltd | रसायन अभियांत्रिकीMumbai) श्री. व्ही. जी, तांबे सहाय्यक संचालक (तां.) तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई) शंकाचे निराकरण.
तरी सदरील अभियांत्रिकी पदविका समुपदेशन-2019' या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमास इच्छुक विद्यार्थी व पालक वर्ग यांनी तसेच तंत्रशिक्षण पदविकामध्ये प्रवेशित विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा