कराड नगरपालिका राजकारणातील नशीबवान विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (दादा)



कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या वेगळ्या कामकाज पद्धतीने कराडकरांच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण केले आहे. कराड नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जयवंत पाटील यांना अनेक प्रकारच्या संधी मिळालेल्या आहेत. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न जयवंत पाटील यांनी केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग असो अथवा वॉर्ड यामधून निवडून येण्याची किमया सातत्याने जयवंत पाटील यांनी करून दाखवलेली आहे. कराड नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील कार्यरत आहेत.नगरपालिका राजकारणातील नशीबवान जयवंत पाटील (दादा) म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सहज अनेक पदे जयवंत पाटील यांच्याकडे चालून आलेली आहेत.

कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. मात्र जयवंत पाटील हे नशीबवान आहेत. गतकाळामध्ये जयवंत पाटील यांच्याकडे चालून नगराध्यक्षपद आले आणि या पदावर असताना जयवंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. कराड एसटी स्टँडला लागून असणारा खोकीधारकांचा प्रश्न आणि कराडचा मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा निर्णय जयवंत पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळांमध्ये घेतलेला आहे.कराडमधील जटील व अनेक वर्षे गुंतागुंतीत अडकून पडलेले प्रश्न जयवंत पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून यातून मार्ग काढून प्रश्न मार्गी लावलेले आहेत.कराडमधील विकासाच्या कामांमध्ये आपले योगदान असावे यासाठी जयवंतराव पाटील सातत्याने प्रयत्न करीत असतात. आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब व कराड अर्बन कुटुंबप्रमुख स्वर्गीय द.शि.एरम यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची किमयाही जयवंत पाटील यांनी करून दाखवलेली आहे.

शांत स्वभाव, मृदूभाषा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, निर्णय घेण्याची क्षमता, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक विचारांची पेरणी करणारे, कराड तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी ऋणानुबंध मैत्रीपूर्ण जपणारे,आपल्या बरोबर नगरपालिका राजकारणात काम करणाऱ्या सहयोगी नगरसेवकाच्या विचारांची दखल घेणारे,नगरपालिका राजकारणात सर्व पदे सहज मिळालेले नशीबवान जयवंत पाटील गेल्या पंचवीस वर्षांपासून कराड नगरपालिकेच्या राजकारणात सकारात्मक काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून लोकप्रिय आहेत.नगरसेवक, सभापती, स्थायी समिती सदस्य, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी सर्व पदे जयवंत पाटील यांना मिळालेली आहेत.

वाढदिवस म्हटला की, बॅनरबाजी, जाहिरातबाजी व कार्यकर्त्यांच्या समूहामध्ये दिवस व्यतीत करणे असा राजकीय नेत्यांचा वाढदिवस साजरा होत असतो या सर्वांपासून लांब राहण्याची मनस्वी इच्छा बाळगणारे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. मात्र कोणताही गाजावाजा न करता, कोणालाही वाढदिवसाची कल्पना न देता, घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची मनस्वी इच्छा बाळगणारे जयवंत पाटील यांना अनेकांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या समवेत पत्रकार गोरख तावरे, सचिन देशमुख, देवदास मुळे,उमेश शिंदे, राजू पाटील यांनीही उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (दादा) यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गोरख तावरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.