निरोगी जीवन जगण्याचा नवीन मूलमंत्र
समाजामध्ये दोन वर्ग सुरुवातीपासून एकसारखेच आहेत. एक श्रीमंत आणि दुसरा गरीब. श्रीमंतांना भरपेट दोन वेळचे खाण्यास मिळते तर गरिबांना एक वेळचे खाणे मुश्कील आहे. श्रीमंतीत वाढलेले लोकाना खाण्यापिण्याची भ्रांत नसते, दरम्यान गरिबीमध्ये जीवन कंठणार्याना एक वेळचे अन्न मिळवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. श्रीमंतीत वाढणारे खाऊन, खाऊन गलेलठ्ठ होतात, तर गरीब बिचारे खायला नसल्यामुळे सडपातळ असतात.समाजामध्ये गरीब - श्रीमंतांमध्ये असणारी दरी काही केल्या कमी होत नाही. वास्तविक देशातील गरिबी हटावचा नारा यापूर्वी दिला गेला मात्र, काही केल्या गरीबी हटली नाही. गरीब बिचारे प्रारब्धाचे भोग म्हणून कष्टमय जीवन जगत आहेत.
परमेश्वराच्या कृपेने आपला जीवनक्रम श्रीमंत व्यथित करणारे ऐशोराम जीवन जगत आहेत. ढेरपोटे व अस्ताव्यस्त शरीराने गब्बर असणारे शरीराने बारीक होण्यासाठी उपाशी राहतात दरम्यान उपाशी राहणे योग्य नाही. आहारशास्त्रानुसार शरीरामध्ये आवश्यक घटक जाणे आवश्यकच आहे. आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमी होणार नाही याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.अलीकडच्या काळामध्ये डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या सल्ल्यानुसार मोठ्या प्रमाणात दोन वेळचे खाण्याचे प्रमाण व मध्यंतरीच्या काळामध्ये काहीही अन्नग्रहण न करण्याची नवीन वैद्यकीय प्रथा पडलेली आहे. ही प्रथा शरीरासाठी पोषक आहे का ? घातक ! हे निश्चित झालेले नसले तरी, डॉ. दीक्षितांच्या सल्ल्यानुसार आहाराचे नियोजन अनेकजण करीत आहेत. डॉ. दीक्षितांच्या सल्ल्याने दिनक्रम राबवणार्यांना बऱ्याच प्रमाणात चांगल्या प्रकारचा फरक जाणवतो आहे.
अन्नधान्य पिकवताना होणाऱ्या पिकांवरील फवारणी होणाऱ्या कीटकनाशकांच्या औषधांचा वापर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा दुष्परिणाम अन्नाद्वारे अनेकांच्या जीवनाचा बदल घडतो आहे. रोजच्या आहारातून 'पोषणमूल्य' किती मिळतात याचा हिशोब केला तर शून्य. असे उत्तर मिळते, कारण आहारातून पोषणमूल्य जितक्या प्रमाणात शरीरात जाणे आवश्यक आहे. तेवढे जात नाही, हे निरीक्षणातून स्पष्ट झालेले आहे. पूर्वीसारखे कसदार अन्नधान्य निर्माण होत नसल्याने भेसळयुक्त अन्नधान्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या व्याधी येताहेत. भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या व्याधींवर उपाय शोधले जात आहेत. आपणाला दैनंदिन जीवन जगताना अधिक व्याधी होऊ नयेत. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक जण दिनक्रम राबवतात व कसदार अन्नघटक मिळवून पोषणमूल्य अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्न जात असल्यामुळे याबाबत जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीमुळे अनेकांना व्याधीमुक्त अथवा व्याधी होण्यापूर्वी घ्यावी लागणारे दक्षता घेता येत आहे.
पोषणमुल्यांचे धडे वेळीच मिळाले तर भविष्य काळातील अनेक तक्रारी दूर होतील. पौष्टिक आहार'' म्हणजे ''निरोगी आरोग्यासाठी वरदान ठरते आहे.चांगला पौष्टिक आहार प्रभावी औषधाप्रमाणेच असतो,शरीराचे कार्य नीट चालवायला त्याची मदत होते, तो योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत गेला नाही तर आपले आरोग्य बिघडते. यासाठी प्रक्रिया केलेले अन्न न खाता आपल्या मातीत उगवलेल्या पारंपारिक धान्यांचा समावेश आहारामध्ये करणे आवशयक आहे. सध्या बाजारामध्ये विविध प्रक्रिया केलेले अनेक प्रकारचे अन्न उपलब्ध आहे. आणि नवीन पिढी ही प्रक्रिया केलेले अन्न खाण्यावर अधिक जोर देत असल्यामुळे व्याधीला निमंत्रण दिले जात आहे. हे थांबवण्यासाठी शेतामध्ये कसदार पिकलेले अन्नाचे सेवन केले गेले पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्नामध्ये क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. तसेच जीवनसत्वे आणि इतर पोषकतत्वेही यामध्ये असतात. मोडविलेले कडधान्य पचण्यासही हलके असते यामुळे मोडवलेले कडधान्य खाण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. म्हणजे आरोग्याची दक्षता क्षमपणे आपण घेत आहोत याचे समाधान निश्चितपणे मिळेल.
प्रक्रिया केलेले अन्न खाणे अथवा सटरफटर अवेळी खाण्यामुळे शरीरांमध्ये अतिरिक्त चरबी वाढत असते, ही चरबी कमी करावयाची असेल तर मोडविलेल्या कडधान्याच्या सेवनाने शरीरामध्ये चरबी वाढत नाही.हे ध्यानी घेऊन दररोज मोडवलेल्या कडधान्याचे सेवन प्रत्येकाने थोड्या अधिक प्रमाणात केले पाहिजे. अन्य जीवनसत्वे व प्रथिने यामध्ये भरपूर मात्रेमध्ये असल्याने ह्याचे सेवन डोळे, त्वचा, केस यासर्वांच्याच आरोग्यासाठी लाभकारीआहे. मोडविलेल्या कडधान्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा कमी होऊन धमन्यांमध्ये अडथळे दूर होतात याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. चला तर मग नियमित आपण मोडवलेले कडधान्याचे सेवन करू या ! आणि आरोग्यदायक जीवन जगण्याचा नवीन मुलमंत्रांचा स्वीकार करू या ! कारण आपले निरोगी जीवन आपल्याच हातामध्ये आहे.
गोरख तावरे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा