आघाडीकडे बारा वाजविण्याची ताकद आम्हाला कोणी गृहीत धरु नये - राजेंद्रसिंह यादव


कराड (लक्ष्मीपुत्र) - जन-मन-धनाने कराड शहरासह तालुक्याचा विकास करण्याची यशवंत आघाडीचे ध्येय काल-आज आणि उद्या राहणार आहे.दिखावा आम्हाला कधी जमला नाही, आणि जमणारही नाही.आम्हाला जेथे मान-सन्मान मिळेल तेथ आम्ही राहणार असून लवकरच आमचा निर्णय जाहिर करु, असे सांगत राजेंद्रसिंह यादव म्हणाले, संघर्ष आमच्या पाचवीला पूजला असून, लढणे हे आमच्या रक्तात आहे. आम्हाला कोणी गृहीत धरु नये, आमच्या आघाडीकडे एखाद्याचे बारा वाजवण्याची ताकद आहे असा टोला कार्यकर्ता निर्धार मेळाव्यानिमित्त्त  विरोधकांना लगावला.
राजेंद्रसिंह यादव मित्र मंडळ व यशवंत जनशक्ती विकास आघाडी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात राजेंद्रसिंह यादव बोलत होते.यावेळी बांधकाम समिती सभापती हणमंतराव पवार, नियोजन समिती सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान, आरोग्य समिती सभापती गजेंद्र कांबळे, नगरसेवक अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, सुप्रिया खराडे, आशा मुळे, संगिता देसाई उपस्थित होत्या.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड ही यशवंतराव चव्हाणसाहेबांची कर्मभूमी आहे.कराड शहरातील नागरीकांनी यशवंत विचारांची पाठराखन नेहमीच केली आहे.आम्ही माणसातले माणूस आहोत. श्री.छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत.विद्यार्थीदशेपासून आजपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय आहे.माझे स्वप्न एन.डी.ए.मध्ये जाण्याचे होते असे सांगून पुढे म्हणाले, यशवंत आघाडीने 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण आजपर्यंत केले आहे.कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कधीच राजकारण केले नाही.राजकारणामध्ये आमच्यावर अनेक टीका झाल्या, पण टीका झाल्या की आपली वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याचे गृहीत धरुन पुढे वाटचाल करीत आलो आहे.तुमच्या सहकार्‍यामुळेच आज हे यश संपादन करु शकलो आहे. कार्यकर्ते हीच माझी संपत्त्ती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नेतृत्व हलक्या कानाचे नसावे. मी दोन वर्षे वाट पाहत होतो. ज्यांचे आम्ही असतो त्याचे काम आम्ही प्रामाणिकपणेच करतो आणि गुलालही घेतो.ज्यांना आज आमची आवश्यकता वाटत आहे, त्यांनी थोडे मागे वळून पाहावे, आम्हाला कशी वागणूक मिळाली आहे.दिखावा आम्हाला कधी जमला नाही आणि जमणारही नाही.जेथे आमचा मान सन्मान होईल तेथेच आम्ही काम करणार आहोत.कार्यकत्यार्र्च्या भावना जाणून घेण्यासाठी या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले, लवकरच आमची भुमीका स्पष्ट करु.आमची कायस्वरुपी जनहिताची भूमिका राहिली आहे.संघर्ष आमच्या पाचवीला पूजला असून लढणे हे आमच्या रक्तात आहे.श्री.छ.खा.उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार असून योग्य तो निर्णय 100 टक्के घेणार असून आम्हाला कोणी गृहीत धरु नये, व एखाद्याचे बारा वाजवण्याची ताकत आमच्यात आहे.पुढचा मेळावा लवकरच घेतला जाईल असेही शेवटी राजेंद्रसिंह यादव यावेळी बोलताना म्हणाले.
विजय वाटेगावकर म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांच्याविना कराडसह तालुक्यात कुणालाही गुलाल घेता आलेले नाही.राजकारणामध्ये कोणाताही निर्णय घेताना वेळ लागतो मात्र राजेंद्रसिंह यादव चांगलाच विचार करुन योग्यच निर्णय घेत असतात.प्रत्येक निवडणूकीआधी कार्यकर्त्यांचा मेळवा घेऊन त्यांची मते विचारात घेत असतात.आज कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिणची उमेदवारी जाहीर करण्यास काहीच अडचण नाही.त्यांनी आपली उमेदवारी जाहीर करावी, आम्ही तुमच्याबरोबर सदैव आहोत.

हणमंतराव पवार म्हणाले, आत्त्तपर्यंत अनेक निवडणूकांमध्ये आपला वापर करुन घेतला असून आपल्याला वागणूही सन्मानाची दिलेली नाही.त्यामुळे आपला ताकत दाखविल्याशिवाय उपयोग नाही.राजेंद्रसिंह यादव तुम्ही आमदार व्हावे ही आमची इच्छा असून तुम्ही उमेदवारी जाहीर करावी. 

स्मिता हुलवान म्हणाल्या, नेता कसा असावा तर तो राजेंद्रसिंह यावद यांचा सारखा असावा.यशवंत जनशक्ती आघाडीवर कराड शहरातील नागरीकांनी जो विश्वास दाखविला आहे त्यांला तडा जाऊ न देण्याचे काम आघाडीप्रमुख म्हणून राजेेंद्रसिंह यादव करत असतात. नागरीकांना आधार देण्याची व समजून सांगण्याची ताकत फक्त राजेेंद्रसिंह यादव यांच्यामध्येच आहे.कराड नगरपालिकेत तीन प्रकारची सत्त्ता असतानासुद्धा एकमताने ठराव मंजुर होतात ते राजेेंद्रसिंह यादव यांच्यामुळेच.
अतुल शिंदे म्हणाले, शून्यातुन विश्व निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे राजेेंद्रसिंह यादव आहेत.जनशक्ती आघाडी नेहमीच आपल्या पाठिशी राहिली आहे.व राहणारही आहे.
अख्तर आंबेकरी म्हणाले, सर्वांच्या अडचणींना धावून जाणारा एकमेव नेता म्हणजे राजेेंद्रसिंह यादव हे आहेत.या गावाला आपण नेहमीच मदत करत आलेला आहात.या गावाला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज असून आपली उमेदवारी जाहीर करावी.आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

इरफान सय्यद म्हणाले, कुठल्याही पक्षात आपण प्रवेश करु नये. उत्कृष्ठ अभ्यासक म्हणून तुमची ओळख आहे.सर्वगुण संपन्न नेतृत्व आहेे.
संगिता देसाई म्हणाल्या, आजपर्यंत तुम्ही भावनिक होवून निर्णय घेत आला आहात.यापुढे आपल्या जनसमुदयाला विचारात घेवून आपण कोणाताही निर्णय घ्यावा, त्याचे आम्ही स्वागत करु.

प्रकाश वायदंडे म्हणाले, माझया 25 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये पहिल्याचा राजकीय व्यासपिठावर आलो आहे.तुमच्या निर्णयामुळे आम्हाला आनंद व्हावा असा निर्णय घ्यावा, आम्ही तुमच्या पाठिशी कायम राहू.

प्रास्ताविक व आभार सचिन पाटील यांनी मानले.यावेळी बंडाकाका डुबल, विकास पवार, निशांत ढेकळे, अमिर कटापुरे, जावेद नायकवडी, तुषार खराडे, नरेंद्र लिबे, आबा गावडे, सुधीर एकांडे, रविंद्र थोरात, बापु देसाई, रमेश मोरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.