पृथ्वीराजबाबांनी जेवढी कामे केली नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त कामे अतुलबाबांनी केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या खिशातली डायरी माझ्याच्याकडे, पृथ्वीराजबाबांना डॉ. अतुल भोसले याचा इशारा



कराड (लक्ष्मीपुत्र) - खासदारकीच्या पोटनिवडणुकीमध्ये छ. उदयनराजे महाराज राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणार अाहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी जेवढी कामे पाच वर्षांमध्ये केली नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त कामे अतुलबाबांनी केली असून, जनतेची पाच वर्षांमध्ये आम्ही काय सेवा केली ते सांगण्यासाठी महाजनदेश यात्रा निघाली आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष अाहे. बाबा तुम्ही आवाज दिल्यावर वीस हजार जनसमुदाय आज येथे पुढे उभा आहे व माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला आधे उधर जाओ, आधे इधर अशी अवस्था निर्माण झाल्याचा टोला पृथ्वीराजबाबा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

कराड येथील शिवाजी स्टेडियम महाजनदेश यात्रा आल्यानंतर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ना.डॉ. अतुलबाबा भोसले, ना. शेखर चरेगावकर, ना. नरेंद्र पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. सुरेशबाबा भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला आधे इधर, आधे इधर अशी अवस्था झाली आहे. रोजगार निर्मितीचे आकडे मला विचारांना मी सांगतो असे जाहीर आव्हानच पृथ्वीराज चव्हाण यांना देत ज्यांचे नाव घेऊन तुम्ही राजकारण आजपर्यंत करत आला. त्यांच्या समाधीस्थळाची संरक्षण भिंत तुम्हाला पूर्ण करता आली नाही हे तुमचे कर्तृत्व असून ते काम आम्हाला करावे लागले व आम्ही पूर्ण केले याचा अभिमान आहे. सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भागाचा कलंक कायमचा दूर करणार असून सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तन दाखवायचे आहे.महाराजांची फौज तुमच्या पाठीशी उभी आहे. अतुलबाबा तुम्ही निस्वार्थपणे पांडुरंगाची सेवा केली आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी ठामपणे सांगितले.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कराडसाठी भरभरून दिले असून कराड नगरीसाठी ७५ कोटींचा निधी दिला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची संरक्षण भिंत पूर्ण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांना लाभले आहे. पाच वर्षांमध्ये कराड दक्षिण मतदारसंघासाठी ७० कोटींची कामे केली असून माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात ४८ कोटींची फक्त विकासकामे केली आहे. आता इथून पुढे अशा भूलथापांना जनता भुलणार नसून तुमच्या खिशातली डायरी आमच्याकडे आली असल्याचाही टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना डॉ.अतुल भोसले यांनी लगावला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.