मोर कावळा

(गोरख तावरे)

पाण्याचा वाहता प्रवाह अन् हिरवीगार झाडी मनाला मोहीत करत असते.श्रावन संपला आणि बरेच दिवस रखडलेली पार्टी कुठे करायची याचे चर्वित चर्चा झाली.अखेर चांदोली धरणाच्या पायथ्याशी जाण्याचे निश्चीत आहे.कडक श्रावणाच्या पर्वनीला पुर्णविराम देवून रंगीत संगीत पार्टीत मनमुराद आनंद लूटता आला.यात काय विशेष. असेच वाटेल,विशेष तर आहे म्हणूनच तर अनुभव सांगणेचा मोह आवरता येत नाही.चांदोली परिसरात गेल्यानंतर गर्द हिरव्या झाडीने मन आनंदी तर झालेच पण मोरांच्या दर्शनाने आनंद द्विगुणीत झाला.चांदोलीच्या निसर्गात मन प्रसन्न झाले.वाहत्या पाणी प्रवाहाच्या कडेला आमची मैफील स्थानापन्न झाली आणि मोर मनाच्या हिंदोळयावर नाचत असतानाच आमच्या सहभोवती काळया कावळयांनी रिंगणच केले.काव काव करीत राहिल्याने आम्हा सर्वांचे लक्ष त्यांचेकडे गेले.अरे वा पहा कावळे .....इकडे तिकडे चोहीकडे पहावे तिकडे कावळेच कावळे..! तेव्हा हे कावळे पुराण होते असे.

तसा हा अनुभव वेगळा,कावळेच कावळे आपल्या शेजारी असताना त्यांचे कोण बरे कौतुक करेल.आमचेकडे फरसाना होता.एका मित्रांने उत्सुकते कावळयांना फरसाना खाण्यासाठी फेकला तर सर्वच कावळे त्यावर तुटून पडले.आणि खाऊ मिळतो आहे म्हटल्यावर कावळयांची संख्याही हळूहळू वाढू लागली.मग मित्रांसह कावळयांबाबत बरीच चर्चा झाली.कराडमध्ये मध्यतंरीच्या काळात एक कावळा एका कराडकराचा पाठलागच करीत होता आणि प्रितीसंगमावर एक पक्षीप्रेमी कावळयांसह येणा-या पक्षांना असाच खाऊ देतो  हे किस्से ही पुढे आले.या दोन्ही घटनांच्या बातम्या वृत्तपत्रात झळकल्या होत्या.जीवनाच्या चढ - उतारात मनुष्य अनेक अनुभवांनी आनंदी - दुःखी होतो अखेर पृथ्वीतलावावरील यात्रा संपवताना शेवटचा श्वास घेवून जीवन यात्रा संपवतो. प्रत्येक धर्मकांडाप्रमाणे प्रत्येकाचा विधी केला जातो.हिंदू धर्मियांमध्ये बाॅडीला अग्नी दिल्यानंतर तीस-यादिवशी  दशक्रिया विधी हा कार्यक्रम असतो स्मशानातील विधी झाल्यावर सर्वांच्या नजरा खिळतात, ते म्हणजे कावळा कोठे आहे ? याकडे....नजरा असतानाच कावळयांने नैवैद्य शिवला की स्मशानातील सर्वच आप्त नातेवाईक सुसकारा सोडतात. कारण मृत मनुष्यचा "शेवट गोड" झाला असे म्हटले पाहिजे पण "नाही राहिली काय इच्छा ! "हे अनेक जण बोलत असतात.

राष्ट्रीय पक्षी मोर पाहिला, खुल्या निसर्गात आपल्याच नांदात खुल्लेपणाने वावरताना..... मात्र मनुष्याची जाणीव झाली की मोर  लांब जातात.16 मोर एक कच्चा रस्ता पार करताना एका पाठोपाठ एका रांगेत जाताना पाहिल्यावर शिस्तप्रिय पक्षी म्हणून  बरं वाटलं.फोटो काढायला जवळ जाण्याचा प्रयत्न केला की मोर दूर जातो.कावळयागत जवळ येत नाही आणि हो बरं कावळा तरी कुठे शहरात जवळ येतो म्हणा."चला हवा येवू दया" या मराठीतील हास्याचा मनमुराद कार्यक्रमात सेल्फीबाबत नुकतेच विविध  विनोद होते.विडंबनात्मक विनोदाचा तो भाग होता.मी मात्र कावळयांसोबत सेल्फी काढला अन मोबाईलवर सुटींग ही केले आहे.एकाच दिवसात मोर अन कावळयांचा अनुभव चांगलाच होता कारण दोन्ही ही पक्षीच ते.एक कौतुकाचा तर दुसरा नैवैद्याचा धनी, तरी देखील दोघांच्या सहवासाबाबत एक शुभ दुसरा अशुभ मानला जातो. जीवनाच्या वाटचालीत त्या मुक्या पक्षांना काय माहिती की,या मायाजाल दुनियेत जाती-पाती प्रमाणे त्यांनाही विविध सणवार,प्रथा , रीतीरीवाज ,धर्म शास्त्रात उच्च - निच स्थान आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.