अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षांना लाल दिवा व राज्यमंत्र्यांचा दर्जा द्यावा - गोरख तावरे
अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षांना लाल दिवा व राज्यमंत्र्यांचा दर्जा द्यावा - गोरख तावरे
कराड (प्रतिनिधी) - राज्य शासनाचे विविध महामंडळे व विविध समित्यांच्या अध्यक्षांना लाल दिव्याची गाडी व राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला जातो, त्याच पद्धतीने वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षालाही लाल दिवा व राज्यमंत्र्यांच्या दर्जा द्यावी अशी मागणी प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी केली आहे.
वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक कोल्हापूर येथे झाली.यावेळी वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील, गोरख तावरे, तेजस्विनी सुर्ंयवंशी, आदिराज पाटील, स्वस्तिक पंडीत, अनिल आपटे, मारुती नवलाई, संजय पाटील, ए.ए.सनदी, विलास चव्हाण, छाया कुंभोजकर, यशवंत कुंभार, अशोक सावळे यांच्याहस्ते करण्यात आला.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी व अधिस्वीकृती मागणी अर्जावर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठक कोल्हापूरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या छत्रपती शाहू सभागृहात समितीचे अध्यक्ष यदू जोशी व सदस्य सचिव शिवाजी मानकर, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आली होती.यावेळी वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती अध्यक्षांना लाल दिव्याची गाडी व राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यासंबंधाने समितीच्या सर्व सदस्यांनी शासनाकडे प्रयत्न करावा अशी विनंती गोरख तावरे यांनी केली.
बैठकीच्या प्रारंभी प्रसार माध्यम संपादक परिषद, लघु मध्यम वृत्तपत्र कृती समिती, असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडियम न्यूजपेपर, महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने अध्यक्ष, सदस्य, सचिव व समिती सदस्य यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.
बैठकीस समितीचे सदस्य योगेश जाधव, चंद्रकांत शिंदे, कृष्णा शेवडीकर, प्रकाश कुलथे, संतोष पवार, बालाजी सुर्यवंशी, विनोद जगदाळे, धनंजय जाधव, उन्मेष पवार, योगेश त्रिवेदी, विलास मराठे, प्रसाद काथे, लक्ष्मीदास इनामदार, रवींद्र बेडकिहाळ, मधु कांबळे, एस.एम.देशमुख, किरण नाईक, चंद्रशेखर बेहेरे, सुधीर महाजन, श्रीमती क्लारा लेवीस, पूजा शहा, नंदकुमार सुतार, प्रसात काथे चंद्रकांत शिंदे, सुधीर महाजन यांच्यासह नागपूरचे संचालक मोहन राठोड, लातूर-औरंगाबादचे प्रभारी संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक सतीश लळीत, गणेश मुळे, ज्ञानेश्वर इगवे यांची उपस्थित होती.
■ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक
व सदस्य सचिव शिवाजी मानकर यांचा सत्कार करताना प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे, व्यासपीठावर राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी.
■ दैनिक पुढारीचे योगेश जाधव यांचा सत्कार करताना प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे, आप्पासाहेब पाटील
■ मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांचा सत्कार करताना प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, गोरख तावरे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा