पत्रकारीतेचे गुरू

पत्रकारीतेचे गुरु
दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून गेली २५ वर्षे गोरख तावरे हे कराड येथून काम करीत आहेत. तर गेल्या २१ वर्षापासून साप्ताहिक राजसत्य यशस्वीपणे चालवित आहेत. दैनिक सामना व साप्ताहिक राजसत्य या वृत्तपत्रांमधून गोरख तावरे यांनी कराड तालुक्यातील अनेक प्रश्‍नांवर विस्तृत लिखाण केले आहे. समाजातील तळागाळातील सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी गोरख तावरे गेले तीन तप लिखाण करीत आहेत. सामाजिक, राजकीय विषयांंवर सातत्याने विविधांगी लिखाण करीत असल्यामुळे कराड तालुक्यात गोरख तावरे यांचा वाचकवर्ग निर्माण झाला आहे, हे नाकारुन चालणार नाही. राजकीय विश्‍लेषण नेहमी सत्य परिस्थितीवर आधारित असल्यामुळे कराड राजकीय वार्तापत्र यावर कराड तालुक्यात नेहमी चर्चा सुरु असते. गोरख तावरे यांनी पत्रकारीता सुरु केली. त्यावेळी खिळयामोळयांची अक्षरे जुळवून वृत्तपत्र प्रसिध्द होत होती. १९९५ साली सुरु केलेले साप्ताहिक राजसत्य हेही सुरुवातीच्या काळात खिळयामोळयांवरच छापले जात होते. दरम्यान, अलिकडच्या काळामध्ये अत्याधुनिक झालेले बदल स्विकारुन गोरख तावरे कराडमधून सकारात्मक पत्रकारीता करीत आहेत. सत्कार्याला साथ व अन्यायाला लाथ या ब्र्रीदवाक्यानुसार गोरख तावरे यांची आजही सक्षमपणे पत्रकारीता सुरु आहे. अन्यायाबाबत लिखाण करताना गोरख तावरे मागचा पुढचा कशाचाही विचार न करता अन्यायाविरुध्द आवाज लिखाणाच्या माध्यमातून उठवित असतात. समाजातील गुणी जनांचे दखल घेवून त्यांनी केलेल्या सामाजिक व प्रबोधनात्मक कामांचा लेखाजोखा मांडताना हातचे काही राखून ठेवत नाहीत. म्हणूनच गोरख तावरे यांच्या लिखाणाची आजही वाचकवर्ग उत्सुकतेने वाट पाहत असतो. बदलत्या काळानुरुप सोशल मिडीया या नवीन माध्यमामध्ये फेसबुक, वॉट्सअप, ब्लॉग व तत्सम माध्यमांचा गोरख तावरे वापर करुन कराड परिसरातील घटनांचे विश्‍लेषण लिखाण करीत आहेत. वास्तविक सोशल मिडीयाचा खुबीने वापर करण्याची कला गोरख तावरे यांना अवगत झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषद ही पुणे येथे नोंदणीकृत संस्था गोरख तावरे यांनी पुढाकार घेवून स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राची लघु व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी गोरख तावरे प्रयत्न करीत असतात. यामागची त्यांची वृत्तपत्रांबाबत असणारी आस्था स्पष्ट होत आहे. केवळ वृत्तपत्र प्रश्‍न व समस्यांच नव्हे तर राज्यातील पत्रकारांना सन्मानाने जगता यावे यासाठी जे पत्रकार प्रामाणिक पत्रकारीता करतात. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि लघू व मध्यम वृत्तपत्र्ाांना शासनाने जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली पाहिजे, यासाठी गोरख तावरे सातत्याने शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गोरख तावरे यांना आत्तापर्यत हुतात्मा गौरव पुरस्कार, उत्कृष्ट संपादक पुरस्कार, पत्रकार भूषण पुरस्कार, स्नेहीपायन पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले आहे तर कराड येथे झालेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना केलेले काम मुलांच्या प्रबोधनात्मक विचारांसाठी महत्वपूर्ण आहे. मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन कराड येथे संपन्न झाले होते. या संयोजन समितीत गोरख तावरे यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख तत्कालीन राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जगजितसिंह राणा, राजेंद्र शिंगणे यांच्याबरोबर मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेवून वृत्त्ापत्र व पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी गोरख तावरे यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पत्रकारांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी पत्रकार कल्याण निधीची स्थापना राज्यशासनाने करावी ही मागणी सातत्याने शासनस्तरावर मांडल्यामुळे शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना झाली आहे. यामध्ये गोरख तावरे यांचा खारीचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
    भास्कर भूषण यांच्यावतीने दिला जाणारा स्टार आयकॉन पुरस्कराने आज गोरख तावरे यांना सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्त दै. लक्ष्मीपुत्रच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
- सुलतान फकीर
संपादक - दै.लक्ष्मीपुत्र (कराड)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.