गोरख तावरे यांचे कामम्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने केलेला विचार — श्रीपाल सबनीस


कराड (प्रतिनिधी) - पत्रकारीतेच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरख तावरे यांनी केलेले काम हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने केलेला विचार आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कराड येथे व्यक्त केले. गोरख तावरे यांना स्टार आयकॉन पुरस्कार त्यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वेणूताई चव्हाण स्मारक येथे साप्ताहिक भास्कर भूषणच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्टार आयकॉन पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, ज्येष्ठ कलाकार वसंत अवसरीकर, राजू लोहार, '{Zfm लोहार, अभिनेत्री विजया पालव, कमलाकर पाटील भास्कर भूषणच्या मानद संपादिका डॉ. मुग्धा रेठरेकर, मलकापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, डॉ. नरेंद्र माळी, क्रांती मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.उदय ठिगळे उपस्थित होते. यावेळी भास्कर भूषण विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘अठरा पगड जातींची सांगड घालून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. अलीकडच्या काळात ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव चव्हाण यांनीही त्याच स्वरुपाचा प्रयत्न करून आधुनिक महाराष्ट्र घडविला. त्यामुळे सांस्कृतिक लोकशाही बळकट करणारा एकोपा सिद्ध झाला. मात्र अलीकडच्या काळात त्याची वाट लागली आहे. ब्राम्हणशाहीमुळे देशाचे वाटोळे होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या जन्माला कोणी जावू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही अवस्था आली त्यामागे जातीवादाची बिज आहेत. मात्र सेक्युलेरिझमची परंपरा जात धर्मापलीकडची आहे. ती रुजण्याची गरज आहे. सामाजिक, आर्थिक लोकशाही स्थीर झाली तर सांस्कृतिक लोकशाही स्थीर होणार आहे. आता त्याची पूर्ण घडी विस्कटली आहे. जोशींनी कुलकर्णींना पुरस्कार द्यायचा. कुलकर्णींनी जोशींचे गोडवे गायचे. पाटलांनी देशमुखांचे कौतुक करायचे. देशमुखांनी पाटलांना पुरस्कार द्यायचे हे आता बदलले पाहिजे. वरिष्ठ जातीच्या श्रेणी सोडूनही एससी, एनटी, ओबीसी यांच्यामध्येही मानदंडात्मक काम करणारी माणसे आहेत याची जाणीव समाजाला होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये यांनी मोठ्या प्रमाणात संग्राम केला. मात्र ब्राम्हणांच्या लेखनीने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज सामाजिक विषमता दिसून येते. ही विषमता दूर करून सांस्कृतिक लोकशाही बळकट केली पाहिजे. त्याचे पहिले पाऊल अशा समारंभातून निर्माण होते अशी धारणा आहे.’
श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, ‘सरकार फडणवीसांचे असूंदे नाहीतर चव्हाणांचे असूदे. लोक कलावंतांचे प्रचंड हाल होताहेत, ही वस्तुस्थिती कोणीही विसरू नये. लोककला जिवंत ठेवून संस्कृतीचे रक्षण करणारे औषधावाचून मरताहेत. त्यांच्या वेदना सरकार, समाजाने लक्षात घ्यायला हव्यात. वरिष्ठ जातींच्या वर्चस्वाचे बंधन झुगारून अशा लोकांच्या करुणेला सेवा भावी गुणधर्मातून सरकारने पाहिले तर संस्कृती जीवंत राहील. मध्यंतरी प्रगती न झालेल्या भागातील व्यक्ती पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून नेतो ही घटना सर्वांना माहीत आहे. ही वेळ का आली याचा अभ्यास कोणीच केलेला नाही. मात्र तो आपल्या लोकशाहीचा मृतदेह होता. तो मृतदेह लोकशाहीच्या संस्कृतीचा होता. इथे तुमची लोकशाही कुठे गेली, बुद्धाची करुणा कुठे गेली याचा शोध घेण्यासाठी विचारप्रवर्तक कार्यक्रमांची गरज आहे.
माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, आज समाजामध्ये समाजप्रबोधनाची चळवळ गतीमान करण्यासाठी समाजातील विचारवंतांनी पुढे येणे गरजेचे आहे. समाजमनाची मशागत करुन सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र प्रगल्भ झाली तर समाज अधिक गतीने पुढे जाईल. गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक विकासांची कामे केली आहेत. समाजातील सामान्य घटक नजरेसमोर ठेवून त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा नेहमी माझा प्रयत्न राहिला आहे.
डॉ. मुग्धा रेठरेकर यांनी भास्कर भूषण याच्या वाटचालीबद्दल माहिती देवून समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्कार देवून सत्कार करणे म्हणजे, गुणी व गुणवंतांची पूजा करण्यासारखा उपक्रम राबविला जात आहे. प्रसिध्द निवेदीका प्रा. वैजयंती पेटकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी आबासाहेब गावडे, ऍड्. जनार्दन बोत्रे, संजय जाधव, ऋतूराज काळे, अरुण पाटील, एच.ए.मोतीवाला, आनंदराव पाटील, योगेश वाके, विवेक भावे, विजया पालव, डॉ. धनंजय पाटील, मच्छिंद्र चिणे, लक्ष्मण गोर्डे, सागर कहाणे, सुमित डिसोजा, विलासराव पाटील, शुभांगी चौधरी, विजया मोहन, संदीप डाकवे, गोरख तावरे, सुनील साळे, डॉ. उत्तम मदने, अनिता गडदे, राजेश जाधव, डॉ.अमित असलकर, सचिन वाघ, डॉ. रुपेश साळुंखे, रमेश बाळासाहेब पाटील, आनंद द्रविड, अंजली हजारे, ईश्वर गरड, प्रतिक भिडे, श्रीरंग बा. फाटील, डॉ. जी.एम.सुतार, भावना सोळंकी, शाहीद प्रदीप सुतार, समृध्दी काकडे या मान्यवरांना सामाजिक, शैक्षणिक, बांधकाम उद्योग, पर्यटन, लावणी नृत्य, वैद्यकीय, उद्योग, बालशिक्षण, पत्रकारीता, '{hbm विकास, वैद्यकीय, आयुर्वेद, ग्राङ्गर्श्रिींेींशविकास, गोसंवर्धन, युवा विकास, शाहीरी कला, भरतनाट्यम या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्टार आयकॉन पुरस्कार देवून गौरव करुन सत्कार करण्यात आला.
शेवटी कार्यकारी संपादक डॉ.राजू लोहार यांनी आभार मानले. दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभाचे औचित्य साधून भरतनाट्यम समृध्दी काकडे, लावणी नृत्यांगना भावना सोळंकी, मिमीक्री निवास कळसे यांनी मनोरंजनाचा भारदार कार्यक्रम सादर केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.