राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी दीक्षांत सोहळा 558 विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान


कराड, (लक्ष्मीपुत्र ) -  कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा 8 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहेया सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सीविद्यासागर राव उपस्थित राहणार असूनकृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉवेदप्रकाश मिश्रा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या सोहळ्याला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसलेकृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.सौनीलिमा मलिक आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेया सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील 558 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉएमव्ही.घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉसौआरके.गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहेकी स्थापना सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पायांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची केलीग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावेया उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1982 साली जयवंतराव भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केलीत्यानंतर1983 साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व1984 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. 2005 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आलास्वजयवंतराव आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉसुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कृष्णा अभिमत विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे.

कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविल्या जाणार्या या उच्च गुणवत्ताप्राप्त आरोग्य सोयीसुविधांमुळेच विद्यापीठाला ‘नॅकचे’ श्रेणीचे अव्वल मानांकनतसेच ‘आयएसओमानांकन प्राप्त झाले आहेविद्यापीठाशी संलग्न असणार्या कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राला ‘एनएबीएचचे राष्ट्रीय मानांकन लाभले आहेकृष्णा हॉस्पिटलमधील बालरोग विभागाच्या अतिदक्षता कक्षाला भारतीय राष्ट्रीय नवजात मंचाचे (नॅशनल निओनॅटल फोरम ऑफ इंडिया)मानांकन मिळाले आहेरूग्णालयाच्या रक्तपेढीलाएनएबीएच’ या राष्ट्रीय संस्थेचे मानांकन लाभले असूनकृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रोगनिदान प्रयोगशाळेलाही ‘एनएबीएल’ या राष्ट्रीय संस्थेकडून मानांकन मिळाले आहे.

गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धतीएकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल ख्यातकीर्द असणार्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या यंदाच्याव्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (276), नर्सिंग (114), दंतविज्ञान(86), फिजिओथेरपी (58) आणि अलाईड सायन्स अधिविभाग (24) अशा पाच अधिविभागांतून एमबीबीएसएमएसबीडीएस,एमडीएसबीपीटीएचएमपीटीएचबीएस्सी.नर्सिंगएमएस्सीनर्सिंगएमएस्सी.बायोटेक्नॉलॉजीएमएस्सीमायक्रोबायोलॉजी पदवी प्राप्त केलेल्या एकूण 558 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान केली जाणार आहे.यापैकी 14 विद्यार्थ्यांना पीएच.डीपदवीने सन्मानित करण्यात येणार आहेतसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध 20 पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहेअशी माहिती कुलसचिव डॉएमव्हीघोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉसौआरकेगावकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.