कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठीच दोन माजी चेअरमनचा आटापिटा. . . . . डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते व इंद्रजीत मोहिते यांच्यावर डागली तोफ


कराड (लक्ष्मीपुत्र ) -  कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याची घाई झालेल्या माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि डॉइंद्रजीत मोहिते यांचा सहकाराचा अभ्यास कच्चा आहेसहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरुस्तीनुसार कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत असतानाविरोधक मात्र राजकीय हेतूने मुद्दे उपस्थित करून सभासदांची दिशाभूल करण्याची धडपड करत आहेतया दोन्ही माजी चेअरमनचा हा आटापिटा निव्वळ कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नाडॉअतुल भोसले यांनी केलीयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूक करार शुभारंभ व सभासद मोफत साखर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर चेअरमन डॉसुरेश भोसले,संचालक गुणवंतराव पाटीलजितेंद्र पाटील,धोंडिराम जाधवसंजय पाटीलपांडुरंग होनमाने,दिलीपराव पाटीलकार्यकारी सूर्यकांत दळवी,बहेचे उपसरपंच मनोज पाटीलसंजय गांधी निराधार योजनचे तालुकाध्यक्ष संजय पवार,कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एमकेकापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरूस्तीनुसार कारखान्याकडून अक्रियाशील सभासदांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेतयावरून विरोधकांनी आरोपांची राळ उडविली असताना त्यांना रोखठोक उत्तर देण्याचे काम डॉअतुल भोसले यांनी केलेसहकार कायद्यानुसार सभासदांनी संस्थेशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजेमात्र अनेक सभासद कारखान्यास अनेक वर्षांपासून ऊसपुरवठा करत नाहीतअशा सभासदांना कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीसा पाठविल्या असताविरोधकांनी मात्र पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे सभासदांचा मताधिकार डावलला जात असल्याचा कांगावा सुरू केला आहेकारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानेच हे दोन्ही माजी चेअरमन आटापिटा करत असल्याचा टोला लगावतडॉ.भोसले यांनी सूज्ञ सभासद मात्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन डॉसुरेश भोसले म्हणालेकी स्थिरता लाभली की अनेक प्रश्न मार्गी लागतातकामगारांचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात निश्चित सोडविले जातील.कारखान्याने तोडणी यंत्रणेत पारदर्शकता आणली असूनशेतकी खात्याने आधुनिक नोंदणी यंत्रणेचा वापर करत तोडणी यंत्रणेत सुसुत्रता आणली आहेत्यामुळे कृणा कारखान्याकडे ऊस घालण्यासाठी शेतकरी सभासदांचा ओढा दिसून येत आहे.

यावेळी संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आलेतसेच तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आलासूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केलेरामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केलेधोंडिराम जाधव यांनी आभार मानलेकार्यक्रमाला सेक्रेटरी मुकेश पवारसरव्यवस्थापक पीडीराक्षेमुख्य अभियंता सुहास घोरपडेअसिडिस्टलरी मॅनेजर प्रतापसिंह नलवडेमुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशीईडीपी मॅनेजर अवधूत रेणावीकर,ऊसविकास अधिकारी पंकज पाटीलकामगार कल्याण अधिकारी अरूण पाटीलवरिष्ठ अभियंता डीव्हीकुंभारपर्चेस ऑफिसर रवींद्र देशमुखसहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे,सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर,स्टोअर किपर जीबीमोहितेकेनयार्ड सुपरवायझर विजय मोहितेवाहतूक अधिकारी गजानन प्रभुणेकार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख यांच्यासह तोडणी वाहतूकदारसभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णाच्या शेतीखात्याची देदीप्यमान कामगिरी

साखर कारखान्यांना ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी मोठ्या प्रमाणात सोसावी लागत असल्याने आर्थिक फटका बसत असतोपण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाने गेल्या 4 वर्षांत देदीप्यमान कामगिरी करत ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी शून्य ठेवली आहेत्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान टळण्यास मदत झाली असून,कारखान्याच्या शेती विभागाने राज्यात आदर्श निर्माण केला आहेअसे गौरवोद्गार नाडॉअतुल भोसले यांनी काढले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.