जनतेच्या प्रश्नासाठी सतत काम करीत राहणार - विश्वजीत पाटील

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात युवासेनेचे काम सकारात्मक द़ृष्या करुन आपल्या भागात विकासगंगा वहात रहावी असा प्रयत्न करणारे युवासेनेचे तालुकाप्रमुख विश्वजीत पाटील यांच्याबरोबर केलेली बातचीत...

प्रश्न :- समाज कार्यात कसा प्रवेश केला?
विश्वजीत :- सातारा जिल्ह्याच्या उंडाळ्े या गावचा मी रहिवाशी आहे. या गावाला स्वातंत्र्यसंग्राम असो वा राजकारण असो याचा खूप मोठा इतिहास आहे.मात्र मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र मी संघटक कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली आहे.माझा जन्म उंडाळे येथे सर्वसामान्य कुटुंबात 18 जुलै रोजी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंडाळे येथे झाले, तर मुंबई येथे बी. एसस्सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्पेसलायझेशन इन नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे शिक्षण पूर्ण केले आहे.माझा उद्योग व्यवसाय सांभाळत2010 पासून सामाजिक व राजकीय कामास सुरुवात केली.तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम पुढाकार घेतला. आणि 2014 मध्ये मनसेत प्रवेश केला. पण तेथे माझे मन रमले नाही, यामुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालो, आणि 2015 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर सामाजिक, सार्वजनिक प्रश्न हाताळायला सुरुवात केली.

प्रश्न :- कराड जिल्हा व्हावा यासाठी काय प्रयत्न केले?
विश्वजीत :- कराड जिल्हा व्हावा ही तर गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र त्याला गती मिळाल्याचे दिसत नव्हते.2018 साली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विभाजनासाठी स्थापन केलेल्या कमेटीने नविन 36 जिल्ह्यांची अहवाल तयार केला होता, यामध्ये कराड जिल्ह्याचा उल्लेख नव्हता ही बाब माझ्या निर्दशनास आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लेखी निवेदन दिले.आणि कराड जिल्हा व्हावा ही मागणी केली.त्याचबरोबर कराड जिल्हा व्हावा यासाठी अमरण उपोषण सुरू केले, याची दखल घेवून सातव्या दिवशी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर यांनी कराड जिल्ह्याचा प्रस्ताव बनवून विभाजन कमिटीकडे सादर करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मी उपोषण सोडलेले आहे. ना.शेखर चरेगावकर यांनी दिलेले आश्वासन लगेच अंमलात आले, आणि आमचा प्रस्ताव यात समाविष्ट झाला आता पुढील प्रक्रिया बाकी आहे.
प्रश्न :- कराड जिल्हा होईपर्यंत आपण कसा लढा देणार आहात?
विश्वजीत :- कराड जिल्ह्याच्या मागणीसाठी मी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.या प्रयनासाठी सुरु केलेले अमरण उपोषण आश्वासनानंतर सोडले हे खरे आहे, पण जोपर्यंत कराड जिल्हा होत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बूट न घालण्याचा निश्चय केला आहे.यामुळे सध्या मी बूट-चप्पल शिवाय अनवानी फिरत असतो.माझा स्वभाव लढवय्या आहे हे समाजाला समजले आहे, यामुळे जोपर्यंत कराड जिल्हा होत नाही तोपर्यंत या निर्धांरापासून मी मागे हटणार नाही.
प्रश्न :- उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तुम्ही काय प्रयत्न केला आहे?
विश्वजीत :- कराड तालुक्यातील 17 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाली मात्र नियोजन कोलमडल्याने ही योजना अनेक वर्षापासून बंद आहे. परिणामी या गावातील लोकांचा पाणी प्रश्न तसाच प्रलंबीत राहिला.यामुळे ही योजना पूर्ववत सुरू करावी, योजनेचे थकीत वीज बिल माफ करावे, यासाठी मी प्रयत्न केला आहे. कारण जखिणवाडी, नांदापूर व कोयना वसाहत या तीन गावांचा यात समावेश आहे.2016 मध्ये पाचवड फाटा येथे या प्रश्नासाठी अमरण उपोषण केले. सुरुवातीला हे उपोषण कोणीच गांभीर्याने घेतले नाही पण वाढता पाठिंबा बघून प्रशासनाने दखल घेतली.आणि प्रस्ताव मागून तो मंजूर करू असे लेखी आश्वासन दिले.तेव्हा मी उपोषण सोडले. याचाच परिपाक म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून या कामासाठी 60 कोटीच्या निधीची तरतूद झाली आहे. पहिल्या टप्प्यात जखिणवाडी, नांदलापूर कोयना वसाहत या गावांना पाणीपुरवठा होईल अशा आहे.हे माझ्या आंदोलनाचे यश म्हणावे लागेल.
प्रश्न :- कराड दक्षिणमधील रस्त्यांसाठी तुम्ही काय काम केले आहे?
विश्वजीत :- कराड-चांदोली रस्ता पाचवड फाटा पासून पुढे खूपच खराब झाला होता.याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.खड्डेमुक्त रस्ता व्हावा यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्याचे फलित म्हणून या रस्त्याचा समावेश सध्या हायब्रीड ऑन ड्युटी या योजनेत झाला असून सध्या त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता मध्यपासून 5 मीटर ऐवजी 7 मीटर असा मोठा होणार आहे, यामुळे सहाजिकच प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रश्न :- कराड तालुक्यातील जनतेला टोलमुक्त करण्यासाठी काय काम केले आहे?
विश्वजीत :- पुणे-बंगलोर महामार्गावर कराडपासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर तासवडे टोल नाका आहे. वास्तविक कराड तालुक्याचा बरसा भाग या टोलनाक्यांच्या पलीकडे महामार्गाच्या दुतर्फा आहे. मात्र या भागातील लोकांना आपली चारचाकी वाहने कराडला घेऊन येताना अन कराड तालुक्यातील इतर लोकांना उंब्रज परिसरात जाताना आरत-परत मिळून 150 रुपयाचा टोल भरावा लागतो आहे.ही बाब गेली 14 वर्षे सुरू आहे, हा 14 वर्षाचा त्रास थांबणार तरी कधी, हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.हा प्रश्न मी काही दिवसांपूर्वी हातात घेतला. कराड तालुक्यातील लोकांच्या वाहनांना टोल माफ व्हावा यासाठी बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. तथापी  अ सुविधांची तक्रार देखील केली आहे.टोल माफी न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबविणार आहे.
प्रश्न :- वाकुर्डे उपसा सिंचन योजनेसाठी तुमचे काय योगदान आहे?
विश्वजीत :- कराड तालुक्याला वाकुर्डे उपसा सिंचन योजना वरदायी आहे. नियोजनाच्या अभावामुळे वाकर्डेचे पाणी दक्षिण मांड नदीत काही येईना. तसेच विज बिल थकल्याने ते भरावयाचे कोणी हा प्रश्न निर्माण झाला होता. 2017 मध्ये कराड तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. वाकुर्डे योजनेचे पाणी कराड तालुक्यात येणे गरजेचे होते, ही गरज ओळखून मी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील व पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. 38 लाख रुपये थकीत वीज बिलापैकी 12 लाख रुपये टंचाई निधीतून भरले. तेव्हा कुठे या भागातील लोकांची उन्हाळ्यात तहान भागली. आता वाकुर्डे चे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून यावे यासाठी शासनस्तराव प्र्रयत्न करीत आहे.
प्रश्न :- युवासेनेच्या माध्यमातुन कराड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी काय काम केले आहे?
विश्वजीत :- विद्यार्थ्यांना एस.टी महामंडळाच्यावतीने प्रवास खर्चात सवलत आहे. मात्र त्यासाठी मिळणारे सवलतीचे शैक्षणिक पास फक्त कराड येथे मिळत होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता, तो दूर व्हावा म्हणून युवासेनेच्या माध्यमातुन संबंधित अधिकार्‍यांना निवेदने देऊन पाठपुरावा केला आणि आज तालुक्यात उंडाळे, मसूर, उंब्रज याठिकाणी विद्यार्थी पास केंद्रे सुरू झाली आहेत. कराड शहर व तालुक्यात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍यांची संख्या मोठी आहे, मात्र जिथे जिथे अशी शैक्षणिक संकुले आहेत, त्याठिकाणी विद्यार्थी एसटी प्रवास करीत असले तरी पिकअप शेडचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऊन-पावसाचा सामना करावा लागत होता.ही गैरसोय दूर व्हावी म्हणून अशा शैक्षणिक संकुलाजवळ पिकअप शेड उभारले जावे अशी मागणी मी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे, याबाबत लवकरच कार्यवाही सुरू होईल अशी आशा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.