कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात प्रथम..सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचाचा सन्मान

 

कराड  - स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आल्याची घोषणा केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाला आहे. मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक मिळवला.

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या अनुषंगाने कराड शहरात विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर सर्वेक्षण सर्वेक्षणच्या अनुषंगाने करावे लागेल तेथे सकारात्मक पद्धतीने केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेला 5366.05 गुण मिळाल्याने स्पर्धेमध्ये अव्वल येण्याचा मान मिळाला आहे. कराड नगरपालिका सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकाकांवर आली आहे.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तन-मन-धन अओतून गेल्या दोन वर्षात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या अनुषंगाने अहोरात्र परिश्रम घेतले आहे. अखेर दुसऱ्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यामुळे कराडचा अव्वल क्रमांक आला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे देशात प्रथम क्रमांकावर असून सासवड दुसऱ्या क्रमांकावर तर लोणावळा नगरपरिषद तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात इंदूर (मध्य प्रदेश) महापालिकेने सलग चौथ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवला. सुरत (गुजरात) या शहराने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

गतवर्षी लोणावळा नगरपरिषद दुसऱ्या क्रमांकावर होती. यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. द्वितीय क्रमांकावर सासवड नगरपरिषदेत यश मिळवले आहे. दरम्यान सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक येण्याचा मान कराड नगरपरिषदेने मिळवलेला आहे. कराड नगरपालिकेचे नगरसेवक, कर्मचारी यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे ऑनलाईन कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.