सातारा जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला शकीला शेख ही 89 बटालियनमध्ये दाखल

सातारा जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला शकीला शेख ही 89 बटालियनमध्ये दाखल 

शकीला शेख याचे आज कोळे गावांमध्ये जंगी स्वागत करत मिरवणूक मोठ्या उत्साहात

कराड (लक्ष्मीपुत्र) - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली.  2019 मध्ये कोरोनोचा प्रादुर्भाव वाढल्याने रिझल्ट दोन वर्षे पुढे करण्यात आले.व तोच रिझल्ट जानेवारी 2021 मध्ये लागला, आणि कोळे येथील शकीला शेख उत्तीर्ण झाली, त्याच बरोबर मार्च 2021 मध्ये जोईनिंग लेटर प्राप्त झाले. जोईनिंग लेटर प्राप्त होताच रिपोर्टिंगसाठी (ट्रेनिंग) पंजाबला बोलवण्यात आले. 1 एप्रिल 2021 मध्ये पंजाबमध्ये ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण करून 89 बटालियनमध्ये पंजाब येथे पोस्टिंग मिळाले आणि पंधरा दिवसांच्या सुट्टीवर बारा महिन्यांनी शकीला शेख ही आपल्या कर्मभूमी कोळे येथे परतली.आणि कोळेगावच्या आन-बान-शानमध्ये एक मानाचा तुरा रोवला गेल्याने शकीला शेख हिची सर्व धर्म समभाव अशी ओळख असलेल्या कोळेगावांमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. शकीला शेख ही  सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजामधील पहिली महिला बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होणारी विद्यार्थिनी आहे.

शकीला शेख हिने 2018 मध्ये बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सची परीक्षा दिली व त्याचे जानेवारी 2021 मध्ये सिलेक्शन झाले, आणि मार्च 2021 मध्ये जोईनिंग लेटर प्राप्त होताच 1 एप्रिल 2021 ला रिपोर्टिंगसाठी (ट्रेनिंग) पंजाबमध्ये गेल्यानंतर 12 महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण करत शकीला हिला 89 बटालियन पंजाबमध्येच पोस्टिंग मिळाले आहे. शकीला यांचा शपथविधी पंजाबचे राज्यपाल यांच्या उपस्थित खडका कॅम्प पंजाब येथे झाला. तर महाराष्ट्रातून 62 महिला व इतर असे एकूण 451 महिलांचा शपथविधी पार पडला.

शकीला शेख याचा योगायोग म्हणजे 23 मार्चला शकीला शेख हिचा वाढदिवस आणि मार्च 2021 मध्येच शकिला हिला जोईनिंग लेटर प्राप्त झाले व शपथविधी सुद्धा 21 मार्च 2022 ला झाला आहे.

शकीला शेख ही सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील आमिन शेख हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपली मुलगी शकीलाचे बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील अमिन व बंधू आमिर तसेच कुटुंबाचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. प्रथमपासून शकीला हिला देशसेवा करण्याची आवड असल्यामुळे सामान्य परिस्थितीतही बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होण्यासाठी तिने केलेले प्रयत्न हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता अपार कष्ट करून रनिंग, फिजिकल, मेडिकल अशा अनेक परीक्षांना सामोरे गेली, आणि यशस्वीही झाली. त्या यशस्वीतेच्या जोरावर 89 बटालियन पंजाबमध्ये दाखल झाली आहे.

शकीला शेख ही आज सकाळी 9 वाजता माय भूमीमध्ये परतल्यानंतर कोळेगावच्यावतीने ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ओपन जीपमधून शकीला शेख हिची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली. तसेच देशभक्तीपरचे गीत वाजवत शकीला शेख यांची गावातून मिरवणूकला सुरुवात झाली आणि प्रत्येक चौका-चौकांमध्ये महिलांनी व नागरिकांनी शाल श्रीफळ व नारळ शाल देऊन शकीला शेख हिचा सत्कार केला.ग्रामीण भागातील कोळे गावात राहुन शकीला शेख हिने मिळवलेले यश हे अभिमानास्पद असून या यशामुळे कोळे गावाचा लौकिक वाढविला आहे.

टिप्पण्या

  1. शकीलाचा संपुर्ण वांग व्हॅलीला अभिमान आहें . सावित्रीच्या लेकी तुझा आदर्श इतरांनी घेण्यासाररया आहे . अनेक शुभेच्छा :

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.