पेड न्यूज - खंडणी वसुली

पत्रकारितेत सध्या काय चालले आहे ? पेड न्यूज ,खंडणी वसुली ,बातमी छापायला  आणि न छापायला भिकार्डी  पत्रकारांची फौज निर्माण करणारी संपादक मंडळी कशाचाही मुलाहिजा न ठेवता ,गावो -गावी  खंडणी वसुली करणारी माणसांची पत्रकार म्हणून नेमणूक करीत आहेत. टीळक - आगरकरांची पत्रकारिता राहिली नाही . हे मान्य, मात्र अलीकडच्या काळातील एखाद्या चांगल्या संपादकाचा वारसा सांगावे  , असे नाव नाही ,असे नाही पण वारसदारानीच   खंडणी वसुलीचा धंदा सुरु केल्यावर नाव घ्यायला प्रामाणिक पत्रकारांना  लाज वाटते आहे . प्रामाणिक पत्रकारिता करणारे स्वाभिमानाने काही पत्रकार  टीळक - आगरकरांचे नाव घेतात ही चांगली  बाब होय .समाजातील गुन्हेगारीतेवर लिहिताना आपण काय करतो आहोत याचे भान खंडणी वसुली करणारी वृत्तपत्र ठेवत नाहीत ,आपणाकडील खंडणीबाबतचे  लक्ष विचलित करण्यात हे संपादक - पत्रकार माहीर आहेत .गुन्हेगारीचे मी समर्थन करीत नाही, पण उखळ माथ्याने पत्रकारितेचा वापर करीत  खंडणी वसुली करणारे विकृत संपादक - पत्रकार समाजाची दिशाभूल करीत आहेत ,हि घातकवृत्ती स्वहितासाठी काहीही करतात .याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. सर्व प्रथम साक्ष देतील राजकीय मंडळी ,कारण निवडणुका लागल्या रे लागल्या की , खंडणी वसुली करणारी  संपादक - पत्रकार मंडळी पेड न्यूजच्या नावाखाली वसुली सुरु करतात .हे सत्य समाजासमोर आले पाहिजे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.