सातारा जिल्हयाच्या निधीला भाजपा सरकारची कात्री

मनोहर शिंदेमुळे पृथ्वीराजबाबा बदनाम

(गोरख तावरे)

सातारा जिल्हयातील विकास निधीबाबत भाजप सरकार व्देष भावनेतून विकास कामात अडथळा आणून जनतेची गैरसोय करीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेला 24 कोटी विकास निधी व काम थांबविली आहेत.सत्तेची फळे चाखणारा सातारा जिल्हा सध्या सत्तेच्या बाहेर आहे.लोकप्रतिनिधीना विकासकामे करण्यासाठी कॅबिनेट, राज्यमंत्र्यांकडून निधी आणावा लागतो.मात्र, काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करावा लागणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. भाजप, शिवसेनेला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात खिंडार पाडता न आल्याने येथे राष्ट्रवादीने वर्चस्व राखले, तर कॉंग्रेसला फारशे यश आले नाही. केवळ शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केरून शिवसेनेला जागा मिळवून दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने त्यांनी गावोगावी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. यापूर्वी केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्हयाला भरघोष निधी दिला यामध्ये पृथ्वीराज चव्हाण कराडसाठी जादा निधी देताना राष्ट्रवादीने नेहमी आकावतांडव केला. पृथ्वीराज चव्हाण जिल्ह्यातील असल्याने मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनीही विकास निधीची कमतरता भासू दिली नाही. अजित पवार यांना मानणारा आमदारांचा गट येथे असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसाठी भरघोस निधी दिला.मात्र हाच निधी नविन सरकारने रोखला व परत मागविला आहे.जिल्हा परिषदेला स्वनिधीतून मिळणारे उत्पन्न कमी असते. यामुळे शासनाच्या निधीवरच त्यांना अवलंबून राहावे लागते. हा निधी आणण्यासाठी राज्यात सरकार असणाऱ्या पक्षाचे स्थानिक नेते असावे लागतात.

सध्या सातारा जिल्ह्यातील राजकीय आज परिस्थिती बदलली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचे पाच, कॉंग्रेसचे दोन, तर शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेचे देसाई सत्ताधारी आमदार असले, तरी जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या गटाचा कोणताही पदाधिकारी नाही. अवघे दोन सदस्य आहेत.कराड, वाई, पाचगणी, म्हसवड, महाबळेश्वर नगरपालिका, मलकापूर नगरपंचायतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीची खैरात केली. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त कराडमधील टाऊन हॉलसाठी 15 कोटी, संरक्षक भिंत, रस्ते यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. तसेच मलकापूरसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे 67 कोटीचा निधी मिळवून देत कायापालट करण्यात योगदान दिले. दरम्यान मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या संकुचित राजकारणामुळे पृथ्वीराज चव्हानांची मोठी बदनामी झाली,अनेक आरोपांना सामोरे जावे लागले.निवडणूक कालावधीत घारीचे "पिल्लू"अशी टिकाही झाली.अजित पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेला निधी होता होता. विविध कर, उपकरांतून शासनाकडून मिळणारे 27 कोटी रुपये झेडपीला मिळवून दिल्याने गतवर्षी 55 कोटींचे बजेट झाले होते. यंदा मात्र बजेटसाठी चणचण भासणार आहे.

मलकापूर येथे तीन कोटींचा रस्ता होऊनही अवघ्या वर्षभरात खड्डय़ांच्या दुर्दशेत सापडलेल्या ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग कंपनीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी  होऊ लागली आहे.मनोहर शिंदे यांची एकाधिकारशाही,प्रशासनाचा नाकर्तेपणा,पृथ्वीराज चव्हाणांचा आशिर्वाद असल्यामुळे मलकापूर नगरपंचायतीच्या ठराविक सदस्यांचा मुजोरपणा याला जनता वैतागली आहे.गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने खड्डय़ांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकल्यानंतर ही लक्ष न देणे,नविन रस्ते व दुरूस्तीसाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी मिळवून निकृष्ठ दर्जाची काम,टेंडरमधील कमिशन याबाबत मलकापूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

आगाशिवनगर येथील ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील छोटय़ा मोठय़ा खड्डय़ांची संख्या दीडशेवर आहे.खड्डय़ांमुळे नागरिक दररोज प्रशासन व सदस्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत.एवढे होऊनही यावर कायमचा उपाय करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.अनेक खड्डयाना तात्पुरती मलमपट्टी केली मात्र आठवडय़ानंतर ‘जैसे थे’ अवस्था रस्त्याची झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.