आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र....
साहेब.......आज तुमची प्रकर्षाने आठवण येत आहे.कारण तुमची व सामान्य जणांची अशी एकत्रीत असणारी "शिवसेना"ही संघटना मा.उध्दव ठाकरे चांगल्या व तुमच्याच विचाराने ,त्याचपध्दतीने चालवित आहेत.याबाबत काळजी नसावी,पण ज्या भाजपाला आपल्या महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते,शिवसेना जोषात व मराठी माणसाच्या मनामनात,आक्रमकपणे वाटचाल काल -आज-उद्याही करीत आहे व राहील.यात कोणीही कमी पडणार नाही व मागे हटणार नाही.ज्या भाजपाकडे कोणी ढुंकुन पाहात नव्हेते,त्यावेळी "साहेब"तुम्ही भाजपाला मैत्रीचा हात देवून महाराष्ट्रात भाजपाची ओळख निर्माण करून दिलीत."भगवा" महाराष्ट्र विधानसभेवर फडकावयाचाच हा तुमचा प्रबळ आत्मविश्वास होता,तो "साहेब"तुम्ही एक वेळ खरा करून दाखविलात याचा रास्त अभिमान व स्वाभिमान आहे.भाजपाला सोबत घेवूनच युतीचे सरकार केले होते.
दुस-या वेळीही विधानसभेवर "भगवा"फडकावयाचाच याची "साहेब" तुम्ही घोषणा केली होती.शिवसेना-भाजप यांची एकत्रित सत्ता असावी ही तर आपली इच्छा.यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले,अपार कष्ट,परिश्रम घेतले यात शंकाच नाही.पण तुमच्या गैरहजेरीत भाजपाचे जादा आमदार निवडून आले की, यांची नियत बदलली.शिवसेना म्हणजे भाजपाने सांगावे तसे वागावे,दिल्लीश्वरांपुढे नतमस्तक व्हावे,काॅग्रस व भाजपाच्या नितीमध्ये काही बदल नाही हे महाराष्ट्र पाहात आहे.
भाजप आपले वेगळेपण विसरला.पण शिवसेना आपला मार्ग व तुम्ही दाखविलेली वाट सोडायला तयार नाहीत. हे दिसून येत आहे. भाजपाचा हा दुगलीपणा मा.उध्दव ठाकरे व शिवसैनिक मान्य करायला तयार नाहीत. बरे .....जे आपणास अपेक्षीत आहे तसेच शिवसेना वागत आहे.बहुमत नसताना भाजप असे कसे वागत आहे हेच समजत नाही.सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,पण ज्या शिवसेनेमुळे भाजपाची ओळख महाराष्ट्राला झाली त्या भाजपाला तुमच्या उपकाराची जाण राहीली नाही,याला काय म्हणावे.
दक्षिण भारतीयानी गतकाळात महाराष्ट्रात काय तरी आगावपणा केला आणि तुम्ही "उठाव लुंगी बजाव पुंगी"असा नारा दिला होता.हे ऐकीवात आहे पण हा प्रकार काय होता.याचे विस्मरण झाले आहे.कोणीतरी हा काय प्रकार व प्रकरण होते ते आजच्या परिस्थितीत सांगणे आवश्यक आहे.शेवटी काय "साहेब" तुमची व सामान्यांच्या शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही. हे शहाण्यास न सांगावे लागू नये.बस्स.
● गोरख तावरे ●

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा