गुणात्मक शिक्षण
गुणात्मक शिक्षण
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतीबा फुले,सावित्रीबाई फुले,संत गाडगेबाबा यांनी उपेक्षीत समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले केले.ठराविक व मर्यादित वर्गाने शिक्षण घेणे इतरानी शिक्षण घ्यायचे नाही असा पुर्वापार रित होती मात्र महनीय व्यक्तीनी शिक्षणाबाबत असा भेदाभेद करता येणार नाही सर्वांना शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी चळवळ केली प्रसंगी कठोर प्रसंगाना सामोरे जावे लागले.यामुळे आज समाजातील सर्वच घटकांना शिक्षणाने परिपुर्ण केले आहे.शासकीय शाळा प्रारंभी सुरू झाल्या प्राथमिक शाळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय अशी क्रमवारी शिक्षणाची आहे.सध्या खाजगी शिक्षण संस्थांची मोठी दुकानदारी सुरू आहे.शासन शिक्षणासाठी सवलत देत आहे.तर मॅनेजमेंट कोटयातून खाजगी शिक्षण संस्थाचालक कोट्यावधीची माया गोळा करताहेत.आता नविन फंडा सुरू झाला आहे तो म्हणजे लोकसहभागातून समृद्ध शाळा करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी व शाळांची गुणात्मक वाढ झाली पाहिजे संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ ही महत्वाची आहे. यासाठी लोकसहभागातून समृद्ध शाळा तयार करण्याचा शिवसेना - भाजपाच्या युती शासनाने निश्चित केले आहे.वास्तविक शिक्षणाचे महत्व सातत्याने समाजमनावर बिंबवणे आणि शिक्षण प्रवाहात सर्वांना सामाहून घेत असताना शाळा व विद्यार्थांच्या गुणात्मक वाढीकडे पाहणे आवश्यक आहे याची जाण व जाणीव शासनाला आहे. यानुसार राज्यातील सर्व शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. यासाठी आता शिक्षकांना अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शिक्षक वैचारीक परिपुर्ण असतील तर विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया सक्षम होतील यात शंकाच नाही.उदयाची पिढी सक्षम झाली तर देश बलवान होणार याची जाणीव ठेवून शिक्षकांनी काम केले पाहिजे. सरकारी असो वा खाजगी शाळेने आपल्या पातळीवर गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. राज्यातील सर्वच शाळा समृद्ध होण्याच्या दृष्टीने शासन मदत करते आहे.केवळ शासकीय अनुदानावर लक्ष ठेवून आपले स्वहित पाहणा-या अनेक शिक्षण संस्था आहेत तर केवळ शिक्षणाची गंगोत्री प्रवाहीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणा-या संस्थाही आहे. शेवटी काय तर प्रत्येकाला दर्जेदार,गुणात्मक शिक्षण मिळालेच पाहिजे.एवढीच रास्त अपेक्षा असणे गैर नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा