डाॅ.नंदिता पालशेतकर यांची निवड
डॉ. नंदिता पालशेतकर यांची निवड
दक्षिण आशियाई देशांतील स्त्री रोग तज्ञांची परिषद संपन्न
कराड (सावा) - ऑबस्टेरीक्स आणि गायनोकॉलॉजीक सोसायटीच्या (एमओजीएस,मुंबई) नूतन अध्यक्षपदी डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या विश्वस्त डॉ. नंदिता पालशेतकर यांची निवड करण्यात आली. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर, सौ.रश्मी उध्दव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्रँड हयातमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात डाॅ.नंदिता पालशेतकर यांची निवड करण्यात आली आहे.
एमओजीएस ही देशातील सर्वात प्रतिष्ठीत समजली जाणारी स्त्री रोग तज्ञांची संघटना आहे. या संघटनेच्यावतीने 3 दिवसीय वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एमओजीएसने एसएएफओजी म्हणजेच साऊथ एशियन फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजीस्टच्या सहयोगाने या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत हिंदूस्थानसह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगला देशमधील नामांकीत गायनोकॉलॉजीस्ट सहभागी झाले होते. मन जे बरे करते आणि हृदय जे काळजी घेते ही थिम घेऊन एमओजीएसने या परिषदेचे आयोजन केले होते.
डॉ. नंदिता पालशेतकर यांनी भविष्यात अवयव दान करणे अत्यावश्यक बाब असल्याचे मनोगतात सांगितले तर अवयव दान करणे म्हणजे इतरांना जीवदान देणे होय असे सांगून डाॅ.नंदिता पालशेतकर यांनी अवयवदानाबाबत विशेष लक्ष देण्याचा निर्णय जाहीर केला.
परिषदेदरम्यान करिश्मा कपूरने सार्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. अत्याधुनिक पेहरावातही रितूपर्णा सेनगुप्ता तितकीच आकर्षक दिसत होती. त्या सायंकाळसाठी राजीव पॉलने हिरव्या रंगाच्या थिमची निवड केली होती. वैशाली सामंतने सादर केलेले गीत कार्यक्रमाचे वातावरण जल्लोषी बनवून गेले. विवेक शेट्टी आणि डॉ. संदेश मयेकर यांचे दीर्घकाळ संभाषण सुरुच होते. यावेळी अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील,डी.वाय.फाटील विद्यापीठाचे चेअरमन डाॅ. विजय डी.पाटील,उद्योजक प्रदीप पालशेतकर,अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री अदिती गोवित्रीकर,कोरीओग्राफर लाँगीनस फर्नांडीस,इंडस कम्यनिकेशनचे एमडी विवेक शेट्टी,रंजन नेगी,विनिता नेगी,उदयोजक विठ्ठल कामत आदी उपस्थित होते.
गोरख तावरे,कराड
9423502355
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा